दावा

टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष यांच्या नावाने एका वृत्तपत्राच्या बातमी सारखी दिसणारी एक क्लिपिंग शेअर केली जात आहे. यानुसार, रतन टाटा यांनी म्हटले की, जरी तज्ज्ञांनी करोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्था डबघाईला येईल, असा अंदाज वर्तवला असला तरी मला असे वाटत नाही. उलट, भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा एकदा आधीपेक्षा उभारी घेईल, असे म्हटले आहे.

या रिपोर्टमध्ये म्हटले की, ज्याप्रमाणे तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला की, दुसऱ्या महायुद्धानंतर जपानचे कोणतेही भविष्य नव्हते. परंतु, त्याच जपानने आपला बाजार उभारला ज्याने अमेरिकेला घाम फोडला होता. जर तज्ज्ञांचा ऐकले तर अरब यांच्यामुळे इस्रायलचा नकाशा जगातून मिटला असता. परंतु, सत्य याच्या उलट आहे. करोना व्हायरस सुद्धा यापेक्षा वेगळा नाही.

टाइम्स फॅक्ट चेकच्या एका अलर्ट वाचकाने ही क्लिपिंग आमच्या व्हॉट्सअॅप नंबरवर पाठवली आणि यासंबंधीची खरी माहिती जाणून घेण्याची विनंती केली.

खरं काय आहे ?

रतन टाटा यांनी असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. व्हायरल झालेले वक्तव्य फेक आहे.

स्वतः रतन टाटा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या क्लिपिंगला शेअर केले आहे. व लिहिले आहे की, ही पोस्ट मी लिहिली नाही. किंवा मी असे काहीही म्हटले नाही. माझी विनंती आहे की, व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर व्हायरल झालेला मेसेजचा तपास करण्यात यावा. जर मला काही सांगायचे असेल तर मी अधिकृतपणे ते सांगेल. आशा आहे की, तुम्ही सर्व सुरक्षित राहा आणि स्वतःची काळजी घ्या.

निष्कर्ष

टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्या नावाने अर्थव्यवस्थेसंबंधी व्हायरल झालेले वक्तव्य खोटे आहे. स्वतः रतन टाटा यांनी या वक्त्वव्याचे खंडन केले आहे. असे मटा फॅक्टच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here