फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सेल सुरू होणार आहे. ४ मे पासून सुरू होणाऱ्या या सेलमध्ये तुम्हाला अनेक ऑफर्स मिळू शकतात. हा ऑनलाइन सेल ९ मे पर्यंत चालेल आणि ग्राहकांना स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर आकर्षक डील, सूट आणि ऑफर मिळतील. या सेलमध्ये ग्राहकांना Galaxy F12, Realme C20 आणि Poco M3 सारख्या स्मार्टफोन्सवर आकर्षक सूट मिळेल. तुम्ही फ्लिपकार्ट सेलमधून सवलतीत आयफोन देखील खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट प्लस सदस्यांना एक दिवस आधी या सेलमध्ये प्रवेश मिळेल. याशिवाय युजर्सना SBI क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर १० टक्के इन्स्टंट सूट मिळेल. कंपनीने आगामी सेलचे तपशील जारी केले आहेत. या सेलमध्ये Poco, Redmi, Samsung, Vivo, Realme, Infinix आणि इतर ब्रँड्सच्या डिव्हाइसेसवर डिस्काउंट उपलब्ध असतील. सेलमध्ये उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल सविस्तर जाणून घ्या .

Redmi Note 10S

redmi-note-10s

Redmi Note 10 s: Redmi चा हा फोन सध्या Flipkart वर १३,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. आगामी सेलमध्ये तुम्ही Redmi Note 10s फक्त ११,९९९ रुपयांना खरेदी करू शकाल. Redmi Note 10S स्मार्टफोनमध्ये ६.४३ इंचाचा फुल इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन २४०० × १०८० पिक्सल आहे. डिस्प्ले टॉपवर कॉर्निंग गोरीला ग्लास ३ प्रोटेक्टेड दिले आहे. फोनमध्ये मीडियाटेक हेलियो G95 SoC दिला आहे. ज्यात ARM Mali G76 MC4 GPU दिले आहे. हे डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंट आहे.

वाचा : तुमच्या नावावर इतर लोकांनी तर SIM कार्ड काढले नाही ‘असे’ करा माहित, ‘या’ साईटची घ्या मदत

Samsung Galaxy F12

samsung-galaxy-f12

Galaxy F12, Realme C20 आणि Poco M3 सारख्या स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती उपलब्ध असतील. तुम्ही फ्लिपकार्ट सेलमधून सवलतीत आयफोन देखील खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट प्लस सदस्यांना एक दिवस आधी या सेलमध्ये प्रवेश मिळेल. Samsung Galaxy F12 स्मार्टफोन अँड्रॉइड ११ बेस्ड वन यूआय ३.१ कोरसह आला असून फोनमध्ये ६.५ इंच एचडी + इन्फायनाईट -व्ही डिस्प्ले आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेश्यो २०:९ आणि रीफ्रेश दर ९० हर्ट्ज आहे. हँडसेटमध्ये ऑक्टा-कोर एक्सीनोस ८५० प्रोसेसर आणि ४ जीबी रॅम आहे. फोनमध्ये ६४ जीबी आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज पर्याय उपलब्ध आहेत.

वाचा :‘या’ डिव्हाइसच्या मदतीने मिळणार तुफान Wi-fi स्पीड, मिनिटांत डाउनलोड होतील मोठ-मोठ्या फाईल्स

Poco M4 Pro

poco-m4-pro

हा पोको फोन कमी किंमतीत दमदार फीचर्ससह येतो. तुम्ही फोन Flipkart सेलमधून १३,९९९ रुपयां मध्ये खरेदी करू शकता. हँडसेट Android 11 वर आधारित MIUI 12.5 वर काम करतो. Poco M4 Pro 4G स्मार्टफोनमध्ये ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि होल पंच कट-आउटसह ६.४३ इंच एमोलेड डिस्प्ले दिला आहे. यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ स्क्रीन प्रोटेक्शनसह ऑल-प्लास्टिक बॉडी दिली आहे. यात MediaTek Helio G९६ प्रोसेसरसह ८ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबीपर्यंत स्टोरेज मिळते. डस्ट आणि स्प्लॅश रेसिस्टेंटसाठी फोनला आयपी ५३ रेटिंग मिळाले आहे.

वाचा :Jio-Airtel-BSNL: फक्त ३२९ रुपयांमध्ये १००० GB डेटा, ‘या’ स्वस्त ब्रॉडबँड प्लान्सपैकी पाहा तुमच्यासाठी बेस्ट कोणता?

Samsung Galaxy F22

samsung-galaxy-f22

फ्लिपकार्ट सेलमध्ये हा सॅमसंग फोन ९,९९९ रुपयांना उपलब्ध होईल. त्याची लिस्टिंग किंमत १४,९९९ रुपये आहे. सध्या हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ११,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. Samsung Galaxy F22 मध्ये, MediaTek Helio G80 प्रोसेसर आणि 48MP ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. या स्मार्टफोनमध्ये ६.४ इंच (१६००x७२० पिक्सल) एचडी+ इनफिनिटी-यू सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा आस्पेक्ट रेशियो २०:९ आणि रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. फोन ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G८० प्रोसेसरसोबत येतो, जो १२एमएम प्रोसेसरवर आधारित आहे. ग्राफिक्ससाठी यात माली-G52 2EEMC2 GPU मिळेल.

वाचा : आता घर राहील सुपर कूल ! फक्त १५०० रुपयात घरी न्या ‘हा’ जबरदस्त Split AC, मिळताहेत भन्नाट ऑफर्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here