Tips for Taking Better Smartphone Photos: स्वतःचे सेल्फी, फोटो आणि व्हिडिओ काढायला कोणाला आवडत नाही? सोशल मीडियावर लाईक्ससाठी आपण असंख्य फोटो पोस्ट करत असतो. मात्र, चांगले फोटो काढण्यासाठी तुमच्या एक महागडा स्मार्टफोन असायला हवा अशी चुकीची समज आहे. अनेकदा पाहायला मिळते की, लोक चांगल्या कॅमेऱ्यासाठी महागडे स्मार्टफोन्स खरेदी करतात. मात्र, महागडे स्मार्टफोन असले तरी ते फोटो चांगले येतीलच असे नाही. तुम्ही स्वस्त फोनच्या मदतीने अगदी चांगले फोटो काढू शकता व हे फोटो सोशल मीडियावर देखील अपलोड करता येतील. बाजारात सध्या ६४ मेगापिक्सल, १०८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येणारे शानदार स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. मात्र, या फोन्सची किंमत थोडी जास्त असते. तुम्ही अगदी १५ हजारांच्या बजेटमध्ये येणाऱ्या फोनने देखील चांगले फोटो काढू शकता. यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स फॉलो कराव्या लागतील.

​कॅमेरा लेंस साफ करा

फोटोग्राफीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची कॅमेरा लेंस आहे. तुमच्या कॅमेरा लेंसवर स्क्रॅच आले असल्यास चांगले फोटो काढणे शक्य होणार नाही. चांगल्या फोटोसाटी कॅमेरा लेंस एकदम साफ ठेवावे. तुम्ही लेंस साफ करण्यासाठी मऊ कापडाचा वापर करू शकता. याशिवाय, फोनच्या बॅक साइजला कोणत्याही खराब ठिकाणी ठेवू नका, अन्यथा लेंस खराब होईल. नेहमी लक्षात ठेवा की, फोटो क्लिक करण्याआधी लेंस साफ करा. यामुळे फोटो चांगले येतील.

वाचा – Samsung Sale: सुरू झाला खास सेल, Samsung च्या फोन्स, टीव्हीला निम्म्या किंमतीत खरेदीची संधी; पाहा डिटेल्स

​ग्रिड लाइनचा करा वापर

चांगल्या फोटोसाठी फोनच्या ग्रिड लाइनचा उपयोग करायला हवे. ग्रिड लाइनचा वापर करून फोटो क्लिक केल्यास चांगले फोटो येतील. यासाठी फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन ३x३ ग्रिप पर्याय ओपन करा. याशिवाय, रूल ऑफ थर्डचा वापर करायला हवा. यामध्ये मेन ऑब्जेक्टला ग्रिडच्या तिसऱ्या लाइनवर ठेवावे लागते. यामुळे ऑब्जेक्ट अथवा व्यक्तीचा फोटो एकदम व्यवस्थित काढतो येतो. तसेच, तुम्हाला फोटो पोर्ट्रेट काढायचा आहे की लँडस्केप हे देखील लक्षात येईल.

वाचा: Flipkart-Amazon पेक्षा ‘या’ वेबसाइट्सवर मिळत आहे सर्वात स्वस्त सामान, २४ तास करा शॉपिंग; नेहमीच मिळेल डिस्काउंट

​नॅच्यूरल अथवा लाइटमध्ये क्लिक करा फोटो

चांगल्या फोटोग्राफीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रकाश आहे. एकाच फोनद्वारे दिवसा व रात्री काढलेल्या फोटोमध्ये तुम्हाला देखील अनेकदा फरक जाणवला असेल. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे प्रकाश हे आहे. तुम्ही नैसर्गिक प्रकाशात देखील चांगले फोटो काढू शकता. अथवा लाइटिंगच्या मदतीने देखील फोटो काढण्यास मदत होते. रात्री देखील फोटो काढताना चांगला प्रकाश असेल अशा ठिकाणी फोटो काढावेत, यामुळे तुमचे फोटो आकर्षक येतील.

वाचा: महागडा स्मार्टफोन स्वस्तात! २० हजारांच्या Poco च्या दमदार हँडसेटवर मोठी सूट, ६ जीबी रॅमसह मिळतील अनेक फीचर्स

​HDR मोडचा करा वापर

hdr-

सध्या बाजारात १० हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या फोनमध्ये देखील HDR मोड दिला जातो. या मोडचा वापर करून तुम्ही चांगले फोटो क्लिक करू शकता. त्यामुळे तुम्ही फ्लॅशऐवजी एचडीआर मोडचा वापर करू शकता. HDR (high dynamic range) मोडमध्ये कॅमेरा हाय-कॉन्ट्रॅस्टमध्ये चांगला फोटो काढण्यास मदत होते. HDR मोडला तुम्ही कॅमेरा सेक्शनमध्ये जाऊन इनेबल्ड करता येईल. HDR मुळे तुम्ही अगदी डिटेल्ड व चांगल्या कलर्ससह येणारे फोटो काढू शकता.

वाचा: वर्षाला एकदाच करा रिचार्ज! ३६५ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येणाऱ्या Jio च्या या प्लानमध्ये मिळेल तब्बल १०९५ जीबी डेटा-हॉटस्टार फ्री

​पोर्ट्रेट मोडचा करा वापर

तुम्हाला जर फोटोच्या बॅकग्राउंडला ब्लर करायचे असल्यास फोनमध्ये पोट्रेट मोड ऑन करा. ब्लर बॅकग्राउंडच्या मदतीने DSLR सारखे फोटो क्लिक करता येईल. पोट्रेट मोड फोटोग्राफी दरम्यान ६ ते ८ फूटावर फोटो क्लिक करायला हवे. तुम्हाला जर सोशल मीडिया अथवा इतर प्लॅटफॉर्म्सवर फोटो शेअर करायचे असल्यास तुम्ही या मोडचा वापर करू शकता. या टिप्सच्या मदतीने तुम्ही अगदी स्वस्तातल्या फोन्सने देखील अगदी चांगले फोटो काढू शकता.

वाचा: Mi Smart TV: आता ५० इंच स्क्रीनवर घ्या चित्रपट-सीरिजचा आनंद, ६० हजारांचा स्मार्ट टीव्ही फक्त २७ हजारात होईल तुमचा; पाहा ऑफर्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here