Latest Smartphones in India: गेल्या काही काळात स्मार्टफोन मार्केट वेगाने वाढले आहे. आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन्स असल्याने युजर्सच्या गरजा लक्षात घेत कंपन्या देखील अनेक स्मार्टफोन्स सादर करत असतात. आता दररोज एक स्मार्टफोन लाँच होतो असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार असेल तर, सध्या तुमच्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गेल्या आठवड्यात काही भन्नाट स्मार्टफोन्सने भारतीय बाजारपेठेत दमदार एन्ट्री केली आहे. या लिस्टमध्ये अनेक नामांकित कंपन्यांच्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. ही लिस्ट पाहून तुम्ही तुमच्यासाठी योग्य फोन खरेदी करण्याचा निर्णय देखील घेऊ शकता. OnePlus 10R, Xiaomi 12 Pro सारखे अनेक शक्तिशाली स्मार्टफोन दाखल झाले आहेत. या फोन्समध्ये जबरदस्त कॅमेरापासून ते मजबूत बॅटरी पर्यंत भन्नाट फीचर्स देण्यात आले आहे. ही लिस्ट पाहा आणि खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन .

Infinix Smart 6

infinix-smart-6

फोनमध्ये ६.६ इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन ७२० x १६०० पिक्सेल आहे. फोनमध्ये Octa core Unisoc SC9863A (28nm) प्रोसेसर देण्यात आला आहे. पहिला कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा आणि दुसरा कॅमेरा ०.८ मेगापिक्सल्सचा मागील बाजूस देण्यात आला आहे. समोर ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल. फोनला पॉवर देण्यासाठी ५००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर फोनच्या २ GB रॅम आणि ६२ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत बातमी लिहतपर्यंत ७, ४९९ रुपये आहे.

वाचा : स्मार्टफोन चार्जसाठी या टिप्स बेस्ट, कळत-नकळत या चुका करणे टाळाच, बॅटरी आधीपेक्षा जास्त चालेल

One plus 10 R

one-plus-10-r

फोनमध्ये ६.७ -इंचाचा फ्लुइड AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन १०८० x २४१२ पिक्सेल आहे. स्मार्टफोनला ऑक्टा कोअर मीडियाटेक डायमेंसिटी 8100 मॅक्स प्रोसेसर मिळेल. कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास, मागील बाजूस ५० -मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा आहे. समोर, १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. १५० W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट असलेली ५००० mAh बॅटरी प्रदान केली आहे, जी १७ मिनिटांत पूर्णपणे चार्ज होऊ शकते. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास OnePlus 10R च्या ८GB RAM आणि १२८ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३८,९९९ रुपये आहे.

वाचा ‘या’ डिव्हाइसच्या मदतीने मिळणार तुफान Wi-fi स्पीड, मिनिटांत डाउनलोड होतील मोठ-मोठ्या फाईल्स

Xiaomi 12 Pro

xiaomi-12-pro

फोनमध्ये ६.७३ इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले आहे ज्याचे रिझोल्यूशन १४४० x ३२०० पिक्सेल आणि १२० Hz रिफ्रेश रेट आहे. Qualcomm SM8450 Snapdragon 8 Gen 1 (4 nm) ऑक्टा कोर प्रोसेसर स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी देण्यात आला आहे. मागील बाजूस ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, ५० मेगापिक्सेलचा दुसरा कॅमेरा आणि ५० मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा आहे. समोर,३२ -मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. १२० W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४६०० mAh बॅटरी आहे, जी १८ मिनिटांत पूर्ण चार्ज होऊ शकते. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, बातमी लिहतपर्यंत फोनच्या ८ GB रॅम आणि २५६ GB स्टोरेज वेरिएंटची किंमत ६२,९९९ रुपये आहे.

वाचा : नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास थोडं थांबा, लवकरच सुरु होतोय ‘हा’ सेल, मिळतील भन्नाट ऑफर्स

OnePlus Nord CE 2 Lite 5G

oneplus-nord-ce-2-lite-5g

फोनमध्ये ६.४३ -इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे जो १२० Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. वेग आणि मल्टीटास्किंगसाठी ऑक्टा कोअर क्वालकॉम SM6375 स्नॅपड्रॅगन 695 5G (6 nm) प्रोसेसर देण्यात आला आहे. मागील बाजूस,६४ मेगापिक्सेलचा पहिला कॅमेरा,२ मेगापिक्सेलचा दुसरा कॅमेरा आणि अपर्चरसह २ मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. ५००० mAh ची बॅटरी ३३ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी बटरी आहे. बातमी लिहतपर्यंत, ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर फोनच्या ६ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेजची किंमत १९,९९९ रुपये आहे.

वाचा : तुमच्या नावावर इतर लोकांनी तर SIM कार्ड काढले नाही ‘असे’ करा माहित, ‘या’ साईटची घ्या मदत

Tecno Phantom X

tecno-phantom-x

फोनमध्ये ६.७ -इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. ज्याचे रिझोल्यूशन १०८० x २३४० पिक्सेल आणि ९० Hz चा रिफ्रेश रेट आहे. स्मार्टफोनमध्ये Octa core Mediatek Helio G95 (12 nm) प्रोसेसर देण्यात आला आहे. मागील बाजूस ५० मेगापिक्सल्सचा पहिला कॅमेरा, १३ मेगापिक्सेलचा दुसरा कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे. ४८ मेगापिक्सल्सचा पहिला कॅमेरा फ्रंट ८ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. ३३ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४७०० mAh बॅटरी आहे, जी ३० मिनिटांत पूर्ण चार्ज होऊ शकते. किंमतीबद्दल बोलायचे तर, बातमी लिहितपर्यंत, Tecno Phantom X ची किंमत २५९९९ रुपये आहे.

वाचा: आता घर राहील सुपर कूल ! फक्त १५०० रुपयात घरी न्या ‘हा’ जबरदस्त Split AC, मिळताहेत भन्नाट ऑफर्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here