Coocaa HD Ready LED Smart TV

३२ इंच डिस्प्लेसह येणाऱ्या या स्मार्ट टीव्हीमध्ये दमदार फीचर्सचा सपोर्ट मिळतो. या टीव्हीची मूळ किंमत ३६,९९० रुपये आहे. परंतु, तुम्ही तब्बल ७१ टक्के डिस्काउंटनंतर १०,४९९ रुपयात खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डचा वापर केल्यास टीव्हीची किंमत डिस्काउंटनंतर ९,९७४ रुपये होईल. टीव्हीवर तब्बल ९ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळत आहे. सर्व ऑफर्सचा पूर्ण लाभ मिळाल्यास हा टीव्ही फक्त ९७४ रुपयात तुमचा होईल.
Kodak 7XPRO Series HD Ready LED Smart TV

Kodak 7XPRO Series HD Ready LED Smart TV ची मूळ किंमत १८,४९९ रुपये आहे. परंतु, डिस्काउंटनंतर तुम्ही टीव्हीला ११,४९९ रुपयात खरेदी करू शकता. या ३२ इंच टीव्हीवर एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळत आहे. यावर १०,९७४ रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास स्मार्ट टीव्हीला ५२४ रुपयात खरेदी करू शकता. यामध्ये १३६६x७६८ पिक्सल रिझॉल्यूशन, ६० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा डिस्प्ले, २४ वॉट साउंड आउटपूट दिले आहेत.
Adsun HD Ready LED Smart TV

Adsun HD Ready LED Smart TV सेलमध्ये फक्त ८,७९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. या टीव्हीची मूळ किंमत २१,९९९ रुपये आहे. बँक ऑफरचा फायदा मिळाल्यास या ३२ इंच स्मार्ट टीव्हीला तुम्ही फक्त ८,३५९ रुपयात घरी नेऊ शकता. या स्मार्ट टीव्हीमध्ये Netflix, Disney+Hotstar आणि Youtube सारख्या अॅप्सचा सपोर्ट दिला आहे. टीव्ही अँड्राइड ओएसवर काम करतो. यात २० वॉट साउंड आउटपूटसह अनेक शानदार फीचर्स मिळतात.
वाचा: स्मार्टफोन चार्जसाठी या टिप्स बेस्ट, कळत-नकळत या चुका करणे टाळाच, बॅटरी आधीपेक्षा जास्त चालेल
Croma HD Ready LED Smart Android TV

Croma HD Ready LED Smart Android TV ला ५२ टक्के डिस्काउंटनंतर तुम्ही ११,९९० रुपयात खरेदी करू शकता. या टीव्हीची मूळ किंमत २५ हजार रुपये आहे. Flipkart अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास हा टीव्ही फक्त ११,३९० रुपयात उपलब्ध होईल. यामध्ये ३२ इंच एचडी रेडी डिस्प्ले दिला असून, टीव्ही अँड्राइड ओएस ११ वर काम करतो. यात डॉल्बी ऑडिओ सपोर्टसह २० वॉट साउंड आउटपूट दिले आहे. तसेच, २ यूएसबी २.०, २ एचडीएमआय पोर्ट दिले आहेत.
Infinix X3 HD Ready LED Smart Android TV

Infinix X3 HD Ready LED Smart Android TV ची मूळ किंमत १७,९९९ रुपये आहे. परंतु, ३३ टक्के डिस्काउंटनंतर सेलमध्ये फक्त ११,९९० रुपयात खरेदी करता येईल. बँक ऑफरचा फायदा मिळाल्यास हा टीव्ही फक्त ११,३९० रुपयात तुमचा होईल. इनफिनिक्सच्या या स्मार्ट टीव्हीत Netflix, Prime Video, Disney+Hotstar आणि Youtube चा अॅक्सेस दिला आहे. यात गुगल असिस्टेंट आणि क्रोमकास्ट इन-बिल्टचा सपोर्ट दिला आहे. टीव्ही २० वॉट साउंड आउटपूटसह येतो.
(नोट – वरील स्मार्ट टीव्हींच्या किंमतीत ऑफर्स आणि डिस्काउंटनुसार बदल होऊ शकतो.)
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times