Indian Mission To Venus: चंद्र (Moon) आणि मंगळ (Mars) ग्रहावरील यशस्वी मोहिमेनंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation – ISRO) इस्त्रो लवकरच शुक्र ग्रहावर (Venus) यान पाठवण्याची तयारी करत आहे. हे यान शुक्र ग्रहाच्या चारही बाजूला परिक्रमा घालून सर्वात गरम ग्रहाच्या पृष्ठभागाखाली नक्की काय आहे? येथे जीवनाची शक्यता आहे की नाही? सोबतच, शुक्र ग्रहाच्या रहस्यमयी सल्फ्यूरिक अ‍ॅसिडच्या (Sulphuric Acid) ढगांचे रहस्य काय आहे? याबाबतची माहिती गोळा करेल. इस्त्रोच्या या आगामी मिशनचे नाव शुक्रयान (Shukrayaan) असण्याची शक्यता आहे. ISRO चे चेअरमन एस सोमनाथ यांनी शुक्र ग्रह मोहिमेशी संबंधी झालेल्या एका बैठकीनंतर माहिती दिली की, इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी शुक्र ग्रहाच्या मिशनचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे. या मिशनसाठी किती खर्च येईल, हे निश्चित करण्यात आले आहे. सरकार आणि वैज्ञानिकांचे या मिशनबाबत एकमत आहे. सोमनाथ म्हणाले की, भारतासाठी शुक्र ग्रहाची मोहीम सोपी आहे. जी क्षमता आपल्याकडे आहे, त्याद्वारे कमी वेळेत शुक्र ग्रहाची मोहिम पूर्ण करता येईल.

​वर्ष २०२४ मध्ये मोहिमेचे लक्ष्य

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने शुक्रयानसाठी वर्ष २०२४ हे निर्धारित केले आहे. शुक्रयानाच्या लाँचिंगसाठी डिसेंबर २०२४ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. शुक्र ग्रह (Venus) आणि पृथ्वी (Earth) एकाचवेळी रेषेत असतील व यामुळे कमीत कमी इंधनात शुक्रयान मोहिम यशस्वीरित्या पार पाडणे शक्य होईल, त्यामुळे हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. डिसेंबर २०२४ मध्ये लाँचिंग पार न पडल्यास अशी संधी थेट वर्ष २०३१ मध्ये येईल.

वाचा: Vivo Smartphones: विवोचा धमाका! एकाच वेळी भारतात लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

​ग्रहाशी संबंधित मिळेल नवीन माहिती

इस्त्रोचे प्रमुख एस. सोमनाथ म्हणाले की, अन्य देश व अंतराळ संस्थांनी शुक्र ग्रहावर पाठवलेल्या मिशनची कॉपी करणार नाही. आम्ही त्यांनी केलेले प्रयोग पुन्हा करणार नाही व यामुळे कोणता फायदा देखील होणार नाही. आम्ही एक वेगळा प्रयोग करू. इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी शुक्र ग्रहासाठी (Venus) उच्च गुणवत्तेचे नवीन प्रयोग तयार करावेत, जेणेकरून नवनवीन माहिती मिळेल. जसे, चंद्रयान १ आणि मंगलयानच्या मोहिमे वेळी केले होते. यावेळी जागतिक स्तरावर भारताचा झेंडा फडकेल.

वाचा: Amazon Sale: भारीच! १०८MP कॅमेऱ्यासह येणाऱ्या Samsung च्या फोनवर बंपर डिस्काउंट, खूपच स्वस्तात खरेदीची संधी

​केले जातील नवीन प्रयोग

शुक्रयान (Shukrayaan) मोहिमेदरम्यान ग्रहावरील नवनवीन माहिती मिळवण्याचा इस्त्रोचा प्रयत्न असेल. या मोहिमे दरम्यान इस्त्रो ग्रहाच्या पृष्ठभागाचे परीक्षण करणे, पृष्ठभागाखालील थरांचे परीक्षण करणे, सक्रिय ज्वालामुखीचा शोध लावणे, लावाच्या प्रवाहाची माहिती एकत्र करणे, शुक्र ग्रहाची रचना, आकाराच्या बाह्य व अंतर्गत संरचनेचा अभ्यास, ग्रहाच्या वातावरणाची माहिती मिळवणे व सौर हवेचा शुक्र ग्रहाशी असलेला संबंध इत्यादी गोष्टींची माहिती मिळवली जाईल. तसेच, तेथील वातावरणातील सल्फ्यूरिक अ‍ॅसिडच्या (Sulphuric Acid) ढगांशी संबंधित माहिती गोळा केली जाईल.

वाचा: Recharge plans: Jio चा धमाकेदार प्लान! १ वर्षासाठी Disney+Hotstar फ्री, डेटा-कॉलिंगचाही फायदा; पाहा डिटेल्स

​भारत करणार कोणीच न केलेली कामगिरी

शुक्रयान (Shukrayaan) मोहिमेत सर्वात प्रमुख यंत्र हे पेलोड म्हणजेच हाय रिझॉल्यूशन सिंथेटिक अपर्चर रडार असेल. हे ग्रहाच्या पृष्ठभागाचे परीक्षण करेल. कारण, शुक्र ग्रह हा सल्फ्यूरिक अ‍ॅसिडच्या ढगांनी वेढलेला आहे. त्यामुळे ग्रहाचे पृष्ठभाग सहजासहजी दिसत नाही. इस्त्रोच्या स्पेस सायन्स प्रोग्रामचे अधिकारी टी. मारिया एंटोनिया यांनी सांगितले की, आतापर्यंत पृष्ठभागाच्या खालील थरांचा अभ्यास कोणत्याही देश अथवा अंतराळ संस्थेने केलेला नाही. हे काम जगात भारतच पहिल्यांदा करणार आहे. शुक्र ग्रहावर सब-सरफेस रडार उड्डाण घेईल.

वाचा: Prepaid Plans: जिओने लाँच केले एकापेक्षा एक भन्नाट प्लान्स, मोफत Disney+ Hotstar सह मिळेल बरचं काही

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here