Best Air Conditioner in India:यावर्षी प्रचंड उकाडा आहे, असे आपण दरवर्षी अनेकांना बोलताना ऐकतो. मात्र, यंदा उष्णतेच्या लाटेने सर्वांनाच हैराण केले आहे. देशातील अनेक शहरांमधील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. अनेक ठिकाणांचे तापमान ४० डिग्रीच्या पुढे गेले आहे. कडक उन्हाळ्यामुळे यावेळी एसी, कूलर आणि पंखे खरेदी करणाऱ्या ग्राहकांची बाजारात गर्दी होताना दिसत आहे. तुम्ही जर नवीन एअर कंडिशनर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात काही चांगले पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, एसीमुळे जास्त वीज बिल येते. अशा स्थितीमध्ये इन्वर्टर एअर कंडिशनर महत्त्वाची भूमिका पार पाडतात. सामान्य एसीच्या तुलनेत इन्वर्टर एअर कंडिशनरमुळे कमी वीज बिल येते. बाजारात ३० ते ३५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणारे चांगल्या कंपनीचे इन्वर्टर एसी उपलब्ध आहेत. या एसींच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सविषयी जाणून घेऊया.

​Voltas Magnum 1 Ton 3 Star Inverter Split AC

voltas-magnum-1-ton-3-star-inverter-split-ac

Voltas Magnum 1 Ton 3 Star Inverter Split AC ला तुम्ही ३१,९९० रुपये किंमतीत खरेदी करू शकता. या इन्वर्टर स्प्लिट एसीमध्ये BLDC रोटरी कंप्रेसर दिला आहे. याची कूलिंग क्षमता ३४४० वॉट आहे व हा कॉपर कंडेंसरसह येतो. Voltas चा १ टन क्षमतेचा एसी असून, हा ३ स्टारसह येतो. यामुळे वीज बिल देखील कमी येते. हा एसी १३० स्क्वेअर फूट खोलीला सहज थंड करतो. या प्रोडक्टवर कंपनी १२ महिन्यांची वॉरंटी आणि १० वर्षांची कंप्रेंसर वॉरंटी देत आहे.

वाचा: Portable Fans: उकाड्यातही मिळेल थंड हवा! विजेशिवाय चालतात ‘हे’ हटके टेबल फॅन, किंमत १ हजार रुपयापासून सुरू

​Lloyd 1.25 Ton 3 Star Split Inverter AC

lloyd-1-25-ton-3-star-split-inverter-ac

Lloyd 1.25 Ton 3 Star Split Inverter AC ला तुम्ही ३२,९९० रुपयात खरेदी करू शकता. या शानदार एसीला तुम्ही ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म्सवरून ऑफर्ससह खरेदी करू शकता. या एअर कंडिशनरमध्ये रोटरी कंप्रेसर, ४४१० वॉट कूलिंगची क्षमता आणि कॉपर कंडेंसरचा समावेश आहे. हा ३ स्टार एसी आहे. यामुळे वीज बिल कमी येण्यास मदत होते. १५० स्क्वेअर फूट रूमसाठी हा एसी चांगला पर्याय आहे. यावर १२ महिन्यांची वॉरंटी आणि १० वर्षांची कंप्रेसर वॉरंटी दिली जात आहे.

वाचा: Prepaid Plans: जिओने लाँच केले एकापेक्षा एक भन्नाट प्लान्स, मोफत Disney+ Hotstar सह मिळेल बरचं काही

​Haier Clean Cool 1 Ton 3 Stars Split AC

haier-clean-cool-1-ton-3-stars-split-ac

Haier Clean Cool 1 Ton 3 Stars Split AC ला तुम्ही ३१,३९० रुपये किंमतीत खरेदी करू शकता. Haier च्या या एअर कंडिशनरमध्ये ड्यूल रोटरी कंप्रेसर, ३६०० वॉटची कूलिंग क्षमता आणि कॉपर कंडेंसर दिला आहे. कंपनी या एसीवर १२ महिन्यांची वॉरंटी देत आहे. तसेच, कंप्रेसरवर १० वर्षांची वॉरंटी दिली जात आहे. हा एस १३० स्क्वेअर फूट रुमला अगदी काही मिनिटात थंड करतो. हा ३ स्टार रेटिंगसह येणारा एसी आहे.

वाचा: POCO Smartphone: पहिल्याच सेलमध्ये फक्त १,४४९ रुपयात खरेदी करता येईल POCO M4 5G स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

​Croma 1.5 Ton 3 Star Split Inverter AC

croma-1-5-ton-3-star-split-inverter-ac

Croma 1.5 Ton 3 Star Split Inverter AC देखील जवळपास ३० हजार रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध आहे. या एसीला तुम्ही प्रमुख ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म्सवरून ३१,९९० रुपयात खरेदी करू शकता. या एअर कंडिशनरमध्ये सिंगल रोटरी इन्वर्टर कंप्रेसर, ५२५० वॉटची कूलिंग क्षमता आणि कॉपर कंडेंसरची सुविधा मिळते. ३ स्टारसह येणारा हा एसी १८० स्क्वेअर फूटला सहज थंड करतो. या प्रोडक्टवर कंपनी १२ महिन्यांची वॉरंटी देत आहे. तर कंप्रेसरवर १० वर्षांची वॉरंटी मिळते.

वाचा: Smartphone Tips: फोनमध्ये नेटवर्क येत नाही? सेटिंगमध्ये त्वरित करा ‘हा’ बदल, मिनिटात दूर होईल समस्या

​Panasonic 1 Ton 3 Star Inverter Split AC

panasonic-1-ton-3-star-inverter-split-ac

Panasonic 1 Ton 3 Star Inverter Split AC तुमच्यासाठी चागंला पर्याय ठरेल. तुम्ही जर चांगल्या कंपनीचा Inverter Split AC खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या एसीला ३५,९९० रुपये किंमतीत खरेदी करू शकता. या एअर कंडिशनरमध्ये देखील रोटरी कंप्रेसर, ३५०० वॉट कूलिंग क्षमता आणि कॉपर कंडेंसरची सुविधा मिळते. या एसीवर कंपनी १२ महिन्यांची वॉरंटी देत आहे. हा एसी १३० स्क्वेअर फूट खोलीसाठी चांगला पर्याय आहे.

वाचा: Amazon Sale: दरमहिना फक्त १ हजार रुपये देऊन खरेदी करता येईल ‘हा’ शानदार एसी, सेलमध्ये बंपर डिस्काउंटचा मिळेल फायदा

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here