या लेटेस्ट WhatsApp Feature च्या आल्यानंतर यूजर्सना इमोजीच्या मदतीने मेसेजवर आपली प्रतिक्रिया किंवा रिअॅक्शन देता येईल. आता सुरुवातीच्या स्टेजमध्ये तुम्हाला ६ इमोजी मिळतील. ज्यातल लव्ह, लाइक, लॉफ, थँक्स, सरप्राइज, आणि सॅड सारख्या इमोजीचा समावेश करण्यात आला आहे. हे सुरुवातीच्या स्टेजमध्ये मिळतील परंतु, आगामी काळात सर्व इमोजी यूजर्संना या ठिकाणी मिळतील.
कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी इंस्टाग्राम स्टोरीद्वारे सांगितले की, व्हॉट्सअॅप रिअॅक्शन फीचरला आजपासून यूजर्ससाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. आता स्टोरी मध्ये ६ वेगवेगळे इमोजी सुद्धा दिसतील. खाली दिलेल्या फोटोत तुम्ही पाहू शकता.

फोटो क्रेडिटः इंस्टाग्राम
कधीपासून सुरू होती टेस्टिंग
लोकांच्या माहितीसाठी व्हॉट्सअॅप रिअॅक्शनच्या फीचरची टेस्टिंग २०१८ पासून केली जात होती. कंपनी आणखी काही नवीन फीचर्सची टेस्टिंग करीत आहे. आगामी काळात यूजर्संना २ जीबी पर्यंत फाइल्सला व्हॉट्सअॅपवरून पाठवता येवू शकते. तसेच ३२ लोकांना एकाचवेळी ग्रुप ऑडियो कॉल्स करण्याची सुविधा रोलआउट केली जावू शकते.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times