Tecno Pova 5G

Tecno Pova 5G : किंमत – २१,९०० रुपये
Amazon समर सेल २०२२ मध्ये, Tecno Pova 5G २००० रुपयांच्या सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच १० टक्के बँक सवलत दिली जात आहे. हा फोन एकूण ११ जीबी रॅम सपोर्टसह येईल. फोनमध्ये ६००० mAh ची मोठी बॅटरी मिळेल. फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध असेल. फोनमध्ये ऑक्टाकोर मीडियाटेक डायमेंसिटी 900 चिपसेट सपोर्ट देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी DTS स्पीकर, ब्लूटूथ v5.2, GPS/A-GPS, Wi-Fi 802.11 b/g/n, USB Type-C पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
Samsung Galaxy M12

Samsung Galaxy M12: किंमत – ९,९९९ रुपये : Samsung Galaxy M12 वर निवडक बँक कार्ड आणि EMI सह खरेदीवर १० टक्के इन्स्टंट सूट दिली जात आहे. याशिवाय, ९,३०० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. फोनमध्ये ६००० mAh बॅटरी, Exynos 850 SoC प्रोसेसर आणि ४८ -मेगापिक्सेल मुख्य कॅमेरासह क्वाड कॅमेरा सेटअप आहे.या स्मार्टफोन मध्ये ६.५ इंचाचा HD+ Infinity V डिस्प्ले दिला आहे. जो 720×1600 पिक्सल्या रेजोल्यूशन सोबत येतो. हा स्मार्टफोन Android 11 वर बेस्ड One UI3 वर चालतो.
वाचा :AC Tips: बजेटच्या अडचणीमुळे सेकंड हँड AC खरेदी करणार असाल तर ‘या’ गोष्टी नक्की चेक करा, पाहा टिप्स
Redmi Note 11

Redmi Note 11: किंमत – १२,९९९ रुपये
Amazon समर सेल 2022 मध्ये, Redmi Note 11 स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट ४ GB RAM आणि ६४ GB स्टोरेज व्हेरिएंट १३,४९९ रुपयांऐवजी १२,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. Amazon कडून फोन खरेदीवर १२५० रुपयांची सूट दिली जात आहे. ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक कार्डमधून खरेदीवर १,००० सूट. ग्राहक १२,२०० रुपयांच्या एक्सचेंज ऑफरसह फोन खरेदी करू शकतील. फोन ९० Hz AMOLED डिस्प्ले, क्वाड रियर कॅमेरा सपोर्टसह येतो. फोनमध्ये Snapdragon 680 SoC आणि ५००० mAh बॅटरी सपोर्ट देण्यात आला आहे.
iphone 13

iPhone 13 : २८ GB व्हेरिएंट – ६४,९०० रुपये , MRP – ७९,९०० रुपये : Amazon समर सेल 2022 मध्ये १७,००० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. iPhone 13 Apple च्या A15 Bionic चिप सपोर्टसह येतो. यात सिरॅमिक शील्ड सिक्युरिटीसह ६.१ -इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. यात हाय-एंड Apple A१५ Bionic प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. यात १२ मेगापिक्सलचा ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात २० वॉट चार्जिंग सपोर्टसह ३,२४० एमएएचची बॅटरी दिली आहे.
वाचा : स्मार्टफोन चार्जसाठी या टिप्स बेस्ट, कळत-नकळत या चुका करणे टाळाच, बॅटरी आधीपेक्षा जास्त चालेल
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times