Best Prepaid Plans: सरकारी टेलिकॉम कंपन्या भारती एअरटेल (Airtel), रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि वोडाफोन आयडिया (Vodafone idea) आपल्या ग्राहकांसाठी सातत्याने नवनवीन प्लान्स आणत असतात. कंपन्यांकडे प्रत्येक यूजर्सच्या गरजेनुसार प्रीपेड प्लान्स उपलब्ध आहेत. अगदी १४ दिवसांपासून ते ३६५ दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लान्स कंपन्यांकडे उपलब्ध आहेत. याशिवाय, दररोज १ जीबी डेटापासून ते दररोज ३ जीबी डेटा ऑफर करणारे प्लान्स देखील कंपन्यांकडे आहेत. या प्लान्समध्ये केवळ डेटा, कॉलिंग आणि एसएमएसच नाही तर अतिरिक्त बेनिफिट्सचा देखील फायदा मिळतो. अनेक प्लान्समध्ये ओटीटी सबस्क्रिप्शन देखील मिळते. तुम्ही जर दररोज जास्त डेटा वापरत असाल अथवा घरून काम करत असल्यास दररोज ३ जीबी डेटा ऑफर करणारे प्लान्स फायद्याचे ठरू शकतात. Airtel, Reliance Jio आणि Vodafone idea च्या दररोज ३ जीबी डेटा ऑफर करणाऱ्या प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Jio चे दररोज ३ जीबी डेटा ऑफर करणारे प्लान्स

jio-

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे ४१९ रुपयांचा शानदार प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी दररोज ३ जीबी डेटा, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएसचा फायदा मिळतो. याशिवाय, अतिरिक्त ६ जीबी डेटा आणि १ वर्षासाठी Disney+ Hotstar मोबाइलचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. कंपनीकडे ८४ दिवसांच्या वैधतेसह येणारा १,१९९ रुपयांचा प्लान देखील उपलब्ध आहे. या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात.

वाचा: Amazon Sale: बंपर ऑफर! तब्बल ५०% डिस्काउंटसह मिळतायत ‘हे’ शानदार एसी, सेलचा उद्या शेवटचा दिवस

​Jio चे इतर प्रीपेड प्लान्स

jio-

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे वर्षभराच्या वैधतेसह येणारा ४,११९ रुपयांचा शानदार प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये ३६५ दिवसांसाठी दररोज ३ जीबी डेटा, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा मिळते. कंपनीकडे ६०१ रुपयांचा प्लान देखील असून, यामध्ये दररोज ३ जीबी डेटासह अतिरिक्त ६ जीबी डेटाचा फायदा मिळतो. तसेच, कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानची वैधता २८ दिवस आहे. वरील दोन्ही प्लान्समध्ये डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे.

वाचा: Smartphone Offers: ३,५०० रुपये स्वस्तात मिळतोय Samsung चा शानदार ५जी फोन, ५०MP कॅमेरा-५०००mAh बॅटरीसारखे दमदार फीचर्स

​Airtel चे दररोज ३ जीबी डेटा ऑफर करणारे प्लान्स

airtel-

Airtel कडे दररोज ३ जीबी डेटा ऑफर करणारा ५९९ रुपयांचा प्लान उपलब्ध आहे. या प्लानची वैधता २८ दिवस आहे. यामध्ये देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय, १ वर्षासाठी Disney+ Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. कंपनीकडे ५६ दिवसांच्या वैधतेसह येणारा ६९९ रुपयांचा प्लान देखील उपलब्ध आहे. यामध्ये दररोज ३ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते.

वाचा: Elon Musk Tweet: Elon Musk यांचे स्वतःच्या मृत्यूबाबत धक्कादायक ट्विट, म्हणाले…

​Vi चे दररोज ३ जीबी डेटा ऑफर करणारे प्लान्स

vi-

Vi कडे ४७५ रुपयांच्या वैधतेसह येणारा शानदार प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी दररोज ३ जीबी डेटा, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा मिळते. कंपनीकडे ५६ दिवसांच्या वैधतेसह येणारा ६९९ रुपयांचा प्लान देखील आहे. यामध्ये ४७५ रुपयांच्या प्लानची सर्व सुविधा मिळते. तसेच, कंपनीचा ६०१ रुपयांचा प्लान Disney+ Hotstar सबस्क्रिप्शनसह येतो. यामध्ये २८ दिवसांसाठी दररोज ३ जीबी डेटा व १६ जीबी अतिरिक्त डेटा मिळतो. ९०१ रुपयांच्या प्लानमध्ये ७० दिवसांसाठी दररोज ३ जीबी डेटा दिला जातो.

वाचा: Laptop Tips: लॅपटॉपवर स्क्रीनशॉट कसा काढायचा माहितीये? ‘या’ शॉर्टकट Keys येतील कामी; मिनिटात पूर्ण होईल कोणतेही काम

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here