Jio चे २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील प्लान्स

२०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत जिओकडे सर्वात स्वस्त ११९ रुपयांचा प्रीपेड प्लान उपलब्ध आहे. जिओच्या ११९ रुपयांच्या प्लानमध्ये १४ दिवसांसाठी दररोज १.५ जीबी डेटा, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि एकूण ३०० एसएमएसची सुविधा मिळते. प्लानमध्ये संपूर्ण कालावधीसाठी एकूण २१ जीबी डेटाचा फायदा होतो. याशिवाय, प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउड सारख्या अॅप्सचा मोफत अॅक्सेस मिळेल.
जिओचे इतर स्वस्त प्लान्स

जिओकडे २३ दिवसांच्या वैधतेसह येणारा १९९ रुपयांचा शानदार प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा याप्रमाणे एकूण ३४.५ जीबी डेटाचा फायदा मिळतो. याशिवाय, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉल आणि दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा दिली जाते. यात जिओ अॅप्सचा देखील मोफत अॅक्सेस मिळेल. तसेच, कंपनीकडे १७९ रुपये आणि १४९ रुपयांचे प्लान्स देखील आहेत. या प्लानची वैधता क्रमशः २४ दिवस आणि २० दिवस आहे. यामध्ये दररोज १ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएस मिळतात.
Airtel चे २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील प्लान्स

Airtel कडे २४ दिवसांच्या वैधतेसह येणारा १५५ रुपयांचा प्लान आहे. यामध्ये दररोज १ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, ३०० एसएमएस, फ्री हॅलो ट्यून्स, ३० दिवसांसाठी अॅमेझॉन प्राइम फ्री ट्रायल आणि विंक म्यूझिकचे सबस्क्रिप्शन मिळते. कंपनीकडे २८ दिवसांच्या वैधतेसह येणारा १७९ रुपयांचा प्लान देखील असून, यामध्ये एकूण २ जीबी डेटा, ३०० एसएमएस आणि कॉलिंगची सुविधा मिळते. इतर बेनिफिट्स १५५ रुपयांच्या प्लानप्रमाणेच आहेत. तसेच, एअरटेलकडे ९९ रुपयांचा स्मार्ट रिचार्ज प्लान उपलब्ध आहे. यामध्ये ९९ रुपये टॉकटाइम आणि २०० एमबी डेटा मिळतो. कॉलिंगसाठी १ पैसे प्रती सेकंद शुल्क लागते.
Vi चे २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील प्लान्स

Vi कडे २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत १७९ रुपये, १९९ रुपये, १५५ रुपये, १४९ रुपये आणि १२९ रुपयांचे प्लान उपलब्ध आहे. १७९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉल आणि ३०० एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय, Vi Movies and TV चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. तसेच, कंपनीकडे १९९ रुपयांचा प्लान देखील आहे. यामध्ये दररोज १ जीबी डेटा, दररोज १०० एसएमएस आणि २८ दिवसांसाठी Vi Movies and TV चे सबस्क्रिप्शन मिळते.
Vi चे इतर प्लान्स

Vi फक्त १२९ रुपये किंमतीचा शानदार प्लान देखील उपलब्ध आहे. यामध्ये १८ दिवसांसाठी अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, २०० एमबी डेटा दिला जातो. कंपनीच्या १४९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये २१ दिवसांसाठी १ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. यात आउटगोइंग एसएमएस बेनिफिट्स दिले जात नाही. तसेच, एअरटेलकडे २४ दिवसांच्या वैधतेसह येणारा १५५ रुपयांचा प्लान देखील आहे. यात १ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि एकूम ३०० एसएमएस दिले जातात.
वाचा: Aadhaar Updation: आधारवरील जन्मतारीख चुकीची आहे? स्मार्टफोनवरून मिनिटात करता येईल बदल; पाहा प्रोसेस
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times