Double Door Fridge On Amazon: उन्हाळा सुरू झाला की एसी, कूलर, फ्रीज सारख्या वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. फ्रीज हा घरातील अत्यंत महत्त्वाच्या वस्तूंपैकी एक आहे. उन्हाळा असो अथवा नसो, फ्रीजचा वापर हा नियमितपणे केला जातो. थंड पाण्यापासून ते जेवण दीर्घकाळ टिकावे यासाठी फ्रिजचा वापर केला जातो. त्यामुळे घरात चांगला फ्रीज असणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही देखील नवीन फ्रीज अथवा रेफ्रिजरेटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात एकापेक्षा एक शानदार पर्याय उपलब्ध आहे. विशेष म्हणजे यांची किंमत देखील कमी आहे. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर मध्यम आकाराच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या डबल डोर फ्रीजवर शानदार ऑफर्स उपलब्ध आहे. बेस्ट ब्रँडच्या फ्रीजवर तुम्हाला ५० टक्क्यांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. याशिवाय, Bank Of Baroda च्या कार्डने पेमेंट केल्यास १,५०० रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंटचा देखील फायदा मिळेल.

​LG 260L 3 Star Smart Inverter Frost-Free Double Door Refrigerator

lg-260l-3-star-smart-inverter-frost-free-double-door-refrigerator

फ्रीजच्या बाबतीत LG हा चांगला ब्रँड समजला जातो. तुम्ही जर डबल डोर फ्रीज खरेदी करण्याचा विचार करत असाल तर LG चा हा रेफ्रिजरेट एक चांगला पर्याय ठरेल. या फ्रीजची क्षमता २६० लीटर आहे. LG च्या या ३ स्टार फ्रीजची मूळ किंमत ४०,८९९ रुपये आहे. परंतु, Amazon वरून तुम्ही ३४ टक्के डिस्काउंटनंतर फक्त २६,८९० रुपयात खरेदी करू शकता. हा फ्रीज ४-५ सदस्य असलेल्या कुटुंबासाठी चांगला आहे. यामध्ये ऑटो फ्रॉस्ट टेक्नोलॉजी दिली आहे, ज्यामुळे यात बर्फ जमा होत नाही.

वाचा – iPhone 14: आयफोन १४ ची किंमत लीक! ‘या’ फीचर्सचा देखील झाला खुलासा; पाहा डिटेल्स

​Whirlpool 325L 3 Star Frost Free Double Door Refrigerator

whirlpool-325l-3-star-frost-free-double-door-refrigerator

Whirlpool च्या या फ्रीजची मूळ किंमत ५३,१५० रुपये आहे. परंतु, ३१ टक्के डिस्काउंटनंतर तुम्ही फक्त ३६,९३० रुपये किंमतीत खरेदी करू शकता. या फ्रीजवर २,२०० रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील मिळत आहे. याद्वारे फ्रीजची किंमत अजूनच कमी होईल. Whirlpool चा हा फ्रीज फ्रॉस्ट फ्री टेक्नोलॉजीसह येतो. हा फ्रीज थोडा हटके असून, यात फ्रीजर खालील बाजूला आहे. याच्या फ्रीजरला तुम्ही कधीही टेम्प्रेचर सेटिंग्समध्ये बदल करून फ्रिजमध्ये आणि पुन्हा फ्रीजरमध्ये बदलू शकता.

वाचा: Elon Musk: Twitter वर ‘हे’ फीचर का नाही? थेट Elon Musk यांच्या आईनेच केली विचारणा, यूजर्स म्हणाले…

​Samsung 324L 3 Star Inverter Frost Free Double Door Refrigerator

samsung-324l-3-star-inverter-frost-free-double-door-refrigerator

Samsung चा हा बेस्टसेलर फ्रीज आहे. हा कन्वर्टिबल फ्रीज असून, याच्या फ्रीजरला तुम्ही फ्रीजमध्ये बदलू शकता. याशिवाय, याच्या दरवाज्यावर टेम्प्रेचर बदलण्याची सेटिंग्स दिले असून, याद्वारे तुम्ही फ्रीजरला फ्रीजच्या टेम्प्रेचरमध्ये बदलू शकता. हे फीचर फ्रीजचा जास्त व फ्रीजरचा कमी वापर करतात अशा लोकांसाठी चांगले आहे. सॅमसंगच्या या रेफ्रिजरेटरची मूळ किंमत ४१,९०० रुपये आहे. परंतु, १७ टक्के डिस्काउंटनंतर तुम्ही फक्त ३४,५९० रुपयात खरेदी करू शकता.

वाचा: Upcoming Smartphones: धुमाकूळ घालायला येतोय Realme चा ‘हा’ शानदार ५जी स्मार्टफोन, लाँचआधी फीचर्सचा खुलासा

​Haier 258 L 3 Star Inverter Frost-Free Double Door Refrigerator

haier-258-l-3-star-inverter-frost-free-double-door-refrigerator

तुम्ही जर २५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये फ्रीज खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Haier च्या या रेफ्रीजरेटरचा विचार करू शकता. Haier च्या या शानदार फ्रीजची मूळ किंमत २९,७०० रुपये आहे. परंतु, १७ टक्के डिस्काउंटनंतर तुम्ही फक्त २४,६९० रुपयात खरेदी करू शकता. या फ्रीजमध्ये देखील Frost-Free टेक्नॉलोजी दिली असून, हा ३ स्टार रेटिंगसह येतो. या फ्रीजची क्षमता २५८ लीटर असून, तुम्ही अ‍ॅमेझॉनवरून स्वस्तात खरेदी करू शकता.

वाचा: Smartphone Offers: शानदार डील! निम्म्या किंमतीत मिळतोय Motorola चा ८ जीबी रॅमसह येणारा फोन, १०८MP कॅमेऱ्यासह बरचं काही

​Panasonic 338 L 3 Star 6-Stage Smart Inverter Frost-Free Double Door Refrigerator

panasonic-338-l-3-star-6-stage-smart-inverter-frost-free-double-door-refrigerator

Panasonic च्या या फ्रीजची मूळ किंमत ४६,९०० रुपये आहे. परंतु, ३० टक्के डिस्काउंटनंतर Amazon वरून ३२,९९० रुपयात खरेदी करू शकता. हा डबल डोर ३ स्टार रेटिंगसह येणारा फ्रीज आहे. यामध्ये ६ स्टेप स्मार्ट इन्वर्टर फ्रॉस्ट फ्री टेक्नोलॉजी दिली आहे. याशिवाय, याचे व्हेजिटेबल बास्केट देखील मोठे आहेत. तसेच, ९९ टक्क्यांपर्यंत बॅक्टेरिया कमी निर्माण होतात. Panasonic च्या या फ्रीजची क्षमता ३३८ लीटर आहे.

वाचा: Elon Musk : Donald Trump ट्विटरवर परतणार? Elon Musk म्हणाले…

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here