Google Pixel 6a

Google Pixel 6a स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच होणार आहे. हा सर्व पिक्सल ६ डिव्हाइसमध्ये सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल. या फोनमध्ये ६.२ इंच ओलेड डिस्प्ले, ८ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबी ऑनबोर्ड स्टोरेजचा सपोर्ट दिला जाईल. याशिवाय फोनमध्ये ३० वॉट चार्जिंगसह ४८०० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल. फोन ड्यूल रियर कॅमेरा सेटअपसह येईल. यात १२.२ मेगापिक्सल IMX३६३ सेंसर आणि एक अल्ट्रा-वाइड-एंगल लेंससह १२MP IMX३८६ सेंसर दिला जाईल. तर सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. फोनची किंमत ३७,९९९ रुपये असू शकते.
Poco F4 GT 5G

Poco F4 GT 5G देखील लवकरच भारतात लाँच होणार आहे. हा फोन Redmi K50 गेमिंगचे रीब्रँडेड व्हर्जन आणि गेल्यावर्षी लाँच झालेल्या Poco F3 GT चा सक्सेसर असेल. हा एक गेमिंग फोन आहे. यामध्ये ६.६७ इंच FHD+ एमोलेड पॅनेल आणि १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट आहे. याशिवाय, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ झेन १ प्रोसेसरसह ८ जीबी / १२ जीबी रॅम आणि १२८ जीबी / २५६ जीबी स्टोरेज मिळेल. १२० वॉट हायपरचार्ज टेक्नोलॉजीसह ४७०० एमएएचची बॅटरी दिली जाईल. तर फोटोग्राफीसाठी ६४ मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाईल. फोनची संभाव्य किंमत २९,९९९ रुपये असू शकते.
Moto Edge 30

Moto Edge 30 Pro चे स्टॉक व्हेरिएंट लवकरच लाँच होणार आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७७८जी प्लस चिपसेटसह ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळेल. याशिवाय फोनमध्ये फुल एचडी+ रिझॉल्यूशनसह ६.५५ इंच पोलेड पॅनेल डिस्प्ले आणि १४४ हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्ट दिला जाईल. फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, ५० मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड लेंस आणि २ मेगापिक्सल डेप्थ लेंस मिळेल. ४०२० एमएएच बॅटरीसह येणाऱ्या या फोनची किंमत ३५,९९९ रुपये असण्याची शक्यता आहे.
Vivo X80 Series

Vivo X80 Series स्मार्टफोन १८ मे ला भारतात लाँच होऊ शकते. फोनचे प्रो व्हेरिएंट स्नॅपड्रॅगन ८ झेन १ अथवा मीडियाटेक डायमेंसिटी ९००० कोर प्रोसेसरसह येईल. यात QHD+ रिझॉल्यूशनसह ६.७८ इंच LTPO OLED स्क्रीन आणि १२०Hz रिफ्रेश रेट दिला जाईल. तसेच, ८० वॉट वायर्ड चार्जिंग आणि ५० वॉट वायरलेस चार्जिंग सपोर्टसह ४७०० एमएएचची बॅटरी मिळेल. फोन क्वाड रियर खॅमेरा सेटअपसह येईल. तसेच, विवो X८० मध्ये ६.७८ इंच E5 OLED पॅनेल, १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट, ८० वॉट फास्ट चार्जिंगसह ४५०० एमएएचची बॅटरी मिळेल. फोनची सुरुवाती किंमत जवळपास ५० हजार रुपये असू शकते.
वाचा: Elon Musk : Donald Trump ट्विटरवर परतणार? Elon Musk म्हणाले…
OnePlus Nord 2T

OnePlus Nord 2T ला कंपनी यावर्षी लाँच करण्याची शक्यता आहे. फोनमध्ये ६.४३ इंच HD + लिक्विड एमोलेड डिस्प्ले आणि ९० हर्ट्ज रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळेल. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी १३०० प्रोसेसर, रियरला ५० मेगापिक्सल Sony IMX७६६ प्राइमरी सेंसर, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेंस आणि २ मेगापिक्सल मोनोक्रोम सेंसर असेल. फोनमध्ये ८० वॉट SuperVOOC चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची बॅटरी दिली जाईल. या फोनची किंमत जवळपास २८ हजार रुपये असण्याची शक्यता आहे.
वाचा: iPhone 14: आयफोन १४ ची किंमत लीक! ‘या’ फीचर्सचा देखील झाला खुलासा; पाहा डिटेल्स
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times