अनुपम भाटवडेकर

युट्यूब
लॉकडाऊनच्या काळात इंटरनेटचा वाढता वापर लक्षात घेऊन युट्यूबने आपली स्ट्रीमिंग क्वालिटी ४८०p वर नियंत्रित केली आहे. व्हिडीओ सेटिंगमध्ये जाऊन हायर क्वालिटीमध्ये व्हिडीओ बघायचा पर्याय उपलब्ध आहे. ४८०p वर नियंत्रित व्हिडीओ बघितल्यास इंटरनेट डेटा वापरामध्ये जवळपास ६० टक्के बचत होत असल्याचं दिसून आलं.

हॅलो

हॅलो अॅप्लिकेशनने करोना व्हायरस असा एक सेक्शन उपलब्ध केला आहे. यामध्ये करोना व्हायरस संबंधीच्या बातम्या, घडामोडी एकाच ठिकाणी बघता येतील. त्याचप्रमाणे आरोग्य खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतात आणि महाराष्ट्रात करोनाची काय स्थिती आहे याची माहिती घरबसल्या या अॅपमुळे मिळू शकते.

शेअर चॅट

या अॅप्लिकेशनमध्ये ‘श्री श्री तत्व’ हे हँडल करोना संबंधित जागरूकता निर्माण करण्यासाठी आहे. मराठीसह अन्य सहा भाषांमध्ये उपलब्ध आहे. करोनासारख्या संकटाला सामोरं जाताना आयुर्वेदाची मदत कशी होते हे सांगण्यात आलं आहे. तसंच रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवता येईल याबाबत मार्गदर्शन केलं जातं. एवढंच नाही तर #AskSriSriTattva हा हॅशटॅग वापरून प्रश्न विचारता येतात. त्याची उत्तरं ग्राहकांच्या भाषेत व्हिडीओ पोस्ट्सद्वारा देण्यात येतात.

स्नॅपचॅट

करोनाच्या पार्श्वभूमीवर स्नॅपचॅटनं कॅमेऱ्याचे डाऊनलोडर्स दहा पटीनी वाढले आहेत. डब्‍ल्‍यूएचओच्या लेन्‍सेससोबत भागीदारी करत या अॅप्लिकेशनमध्ये दोन नवीन लेन्सेस सादर केल्‍या आहेत. या लेन्‍सेस स्‍नॅपचॅटर्सना कोविड-१९च्‍या प्रादुर्भावा दरम्‍यान कशाप्रकारे सुरक्षित राहावं याबाबत माहिती सांगतात. त्याचप्रमाणे करोना संबंधित नवीन फिल्‍टर्स आणि स्टीकर्ससुद्धा उपलब्ध आहेत. यांचा उपयोग करून ग्राहक स्‍वत:ला आणि इतरांना घरामध्‍येच सुरक्षित राहण्‍यासाठी, सोशल डिस्‍टन्सिंगचे पालन करण्‍यासाठी, हात स्‍वच्‍छ धुण्‍यासाठी आणि घरातून काम करण्‍यासाठी प्रोत्‍साहित करू शकतात.

गुगल ड्युओ

ऑगस्ट २०१६ मध्ये सुरु झालेल्या या अॅप्लिकेशननं करोनोच्या काळात आपल्या ग्राहकांना अधिक चांगली सुविधा देण्याच्या दृष्टीनं व्हिडीओ कॉलिंगसाठीची सभासद संख्या आठवरून बारा केली आहे. यामुळे आता ८ ते १२ जण एकाच वेळी व्हिडीओ कॉलिंगमध्ये सहभागी होऊ शकतात आणि सोशल डिस्टंसिंग राखत व्हर्च्युअली एकत्र येऊ शकतात.

व्हॉट्सअॅप

व्हॉट्सअॅप स्टोरीमध्ये आधी ३० सेकंदांची एक स्टोरी ठेवता येत होती, पण करोनाच्या कालावधीत डेटाची बचत व्हावी म्हणून ही मर्यादा आता १५ सेकंदांची करण्यात आली आहे.

एमक्स प्लेअर

एमएक्स प्लेअरनं आपल्या ऑनलाइन कन्टेंटची डिफॉल्ट व्हिडीओ क्वालिटी ४८०p करून ‘डेटा सेव्हर’ मोड आणला आहे. यामुळे आता जवळपास ७० टक्के कमी डेटा वापरला जाणार आहे. हे करताना ग्राहकांना व्हिडीओ बघताना आधी सारखाच अनुभव मिळेल याची खास काळजी घेण्यात आली आहे.

झी ५

झी ५ ने या कठीण काळात इंटरनेट डेटा वाचवण्यासाठी आपल्या अॅप्लिकेशनमधून हाय डेफिनिशन चॅनेल्सचं लाइव्ह स्ट्रीमिंग तात्पुरतं बंद केलं आहे. आता या अॅप्लिकेशनमधील सगळी चॅनेल्स स्टॅंडर्ड डेफिनिशनवर उपलब्ध आहेत.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here