भारतात गेल्या काही वर्षात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अगदी गाव खेड्यामध्ये देखील स्वस्त दरात इंटरनेट उपलब्ध झाले आहे. तसेच, वर्क फ्रॉम होमचे प्रमाण वाढल्याने ब्रॉडबँड कनेक्शनची मागणी देखील मोठी आहे. तुम्ही देखील ब्रॉडबँड कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल, तर भारतात अनेक इंटरनेट सर्विस प्रोव्हाइडर्स आहेत, जे १०० एमपीबीएस स्पीडसह येणारे प्लान्स ऑफर करतात. विशेष म्हणजे महिन्याभराच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लान्सची किंमत देखील कमी असते. हाय-स्पीड इंटरनेटद्वारे तुम्ही ऑनलाइन अभ्यास करू शकता. ऑफिसचे काम करू शकता. तसेच, गेमिंग-मनोरंजनाचा देखील आनंद घेता येईल. Jio, Excitel, Airtel आणि BSNL कडे १०० एमबीपीएस स्पीड ऑफर करणारे स्वस्त ब्रॉडबँड प्लान्स उपलब्ध आहेत. या प्लान्सचा फायदा कुटुंबातील इतर सदस्य देखील घेऊ शकतात. या स्वस्त ब्रॉडबँड प्लान्सविषयी जाणून घेऊया.

​JioFiber १०० Mbps ब्रॉडबँड प्लान

jiofiber-mbps-

जिओ देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीपैकी एक आहे. जिओकडे पोस्टपेड आणि प्रीपेड मोबाइल रिचार्ज प्लान्स तर आहेतच, मात्र कंपनीच्या पोर्टफोलियोमध्ये ब्रॉडबँड प्लान्सची मोठी लिस्ट देखील आहे. कंपनीकडे ३० दिवसांच्या वैधतेसह येणारा JioFiber प्लान आहे. ६९९ रुपयांच्या या प्लानमध्ये १०० एमबीपीएस स्पीडने डेटा मिळतो. यात एकूण ३३०० जीबी डेटा मिळेल. यूजर्सला या प्लानमध्ये १०० एमबीपीएसच्या स्पीडने अपलोड आणि डाउनलोड स्पीडचा अ‍ॅक्सेस मिळेल.

वाचा – boAt Earbuds: तब्बल ३५ तासांच्या दमदार बॅटरी लाइफसह येणार boAt चे शानदार इयरबड्स, कमी किंमतीत मिळतील जबरदस्त फीचर्स

​Excitel चा १०० Mbps प्लान

excitel-mbps-

Excitel देखील ब्रॉडबँड सर्विससाठी लोकप्रिय आहे. कंपनीकडे १०० एमबीपीएस स्पीडसह येणारे अनेक प्लान्स उपलब्ध आहेत. कंपनीकडे १ महिन्यासाठी ६९९ रुपयांचा प्लान उपलब्ध आहे. यूजर्स ३ महिने, ४ महिने, ६ महिने, ९ महिने आणि १२ महिन्यांचा प्लान देखील घेऊ शकतात. या प्लान्सची किंमत ५६५ रुपये, ५०८ रुपये, ४९० रुपये, ४२४ रुपये आणि ३९९ रुपये आहे. तसेच, ९ महिन्यांचा प्लान केवळ नवीन ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. या प्लानमध्ये यूजर्सला अनलिमिटेड डेटा मिळतो.

वाचा: Ration Card: घरबसल्या करू शकता रेशन कार्डसाठी अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल फायदा; जाणून घ्या प्रोसेस

​Airtel चा १०० एमबीपीएस प्लान

airtel-

Airtel एक्सस्ट्रीम फायबर १ जीबीपीएसपर्यंत हाय-स्पीड इंटरनेट प्रदान करणारे प्लान्स आहेत. कंपनीकडे ७९९ रुपये किंमतीचा शानदार ब्रॉडबँड प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये १०० एमबीपीएसच्या स्पीडने इंटरनेटचा फायदा मिळेल. या ब्रॉडबँड प्लानमध्ये एकूण ३.३ टीबी म्हणजेच ३३०० जीबी फेयर-यूज-पॉलिसी (FUP) डेटा मिळतो. Airtel च्या या प्लानची वैधता एक महिन्याची आहे. या व्यतिरिक्त देखील कंपनीकडे शानदार ब्रॉडबँड प्लान्स उपलब्ध असून, तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून याची माहिती घेऊ शकता.

वाचा: THOMSON AC: बंपर डिस्काउंट! उकाड्यात घ्या थंड हवेचा अनुभव, खूपच स्वस्तात मिळतायत ‘हे’ शानदार एसी

​BSNL चा १०० एमबीपीएस ब्रॉडबँड प्लान

bsnl-

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL देखील १०० एमबीपीएस ब्रॉडबँड प्लान ऑफर करते. बीएसएनएलकडे सुपरस्टार प्रीमियम १ आणि फायबर वॅल्यू असे दोन प्लान्स आहेत, जे १०० एमबीपीएस स्पीड ऑफर करतात. या प्लान्सची किंमत क्रमशः ७४९ रुपये आणि ७९९ रुपये आहे. या प्लान्सची वैधता १ महिना आहे. BSNL च्या या सुपरस्टार प्रीमियम – १ प्लानमध्ये १००० जीबी आणि फायबर वॅल्यू प्लानमध्ये ३३०० जीबी डेटाचा फायदा मिळतो.

वाचा: Smart TV Offers: आता मोठ्या स्क्रीनवर घ्या चित्रपटाचा आनंद, निम्म्या किंमतीत मिळतोय LG चा ७५ इंच स्मार्ट टीव्ही; जाणून घ्या ऑफर्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here