नवी दिल्लीः संपूर्ण जगात करोना व्हायरस संसर्गाची संख्या १,६२१,३४८ झाली आहे. तर भारतात करोना व्हायरसचा संसर्ग १० हजार लोकांना झाला आहे. करोना व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी जगातील अनेक जण पुढे आले आहेत. काही दिवसांपूर्वीच गुगलने करोना ट्रॅक्टर वेबसाइट लाँच केली आहे. तर लवकरच आता अॅपल मॅप्सवर करोना व्हायरस चाचणी केंद्राची माहिती मिळणार आहे.

वाचाः

अॅपलने नुकतीच याची माहिती दिली आहे. मॅप्स अॅपमध्ये लवकरच करोना व्हायरस चाचणी केंद्राची माहिती अपडेट करण्यात येणार आहे. त्यानंतर मॅप्सचे एक अपडेट जारी करण्यात येईल. त्यांतर अॅपल मॅप्समध्ये करोना व्हायरसच्या चाचणी केंद्राची माहिती देण्यात येणार आहे. अॅपलने यासाठी एक पोर्टल लाँच केले आहे. आरोग्य सेवा देणाऱ्या आणि हॉस्पिटलसाठी तयार करण्यात आले आहे. या पोर्टलवर हॉस्पिटल आणि आरोग्य संस्था करोना व्हायरस चाचणीसाठी नोंदणी करू शकतील. त्यानंतर अॅपल मॅप्ससाठी काम करीत असलेली टीम याचा तपासणी करतील. त्यानंतर चाचणी केंद्राची अॅपमध्ये अपडेट करण्यात येईल.

वाचाः

९टू५मॅकच्या एका रिपोर्टनुसार, अॅपल मॅप्समध्ये करोना चाचणी केंद्राच्या नावाशिवाय मोबाइल नंबर आणि आरोग्य संस्था सोबत हॉस्पिटलची माहिती मिळेल. तसेच चाचणी लॅब विषयी पूर्ण माहिती देण्यात येणार आहे. या ठिकाणी कशी चाचणी होईल, याची माहिती दिली जाईल. त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे की नाही, हेही कळणार आहे.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here