वाचाः
या फोनमध्ये ६.०९ इंचाचा डिस्प्ले आहे. या फोनचे ७२०X१५६० पिक्सल आहे. या फोनमध्ये रियरमध्ये ड्युअल कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. फोनच्या मागे १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅप्चर करण्यासाठी दिला आहे. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. कॅमेऱ्यात एलईडी फ्लॅश आणि एवन सीन रेकॉग्निशन यासारखे फीचर दिले आहे. या फोनच्या मागे फिंगरप्रिंट रीडर दिले आहे. याशिवाय फोनमध्ये एन्ट्री लेवल Unisoc SC9863 प्रोसेसर दिला आहे. कंपनीने आता पर्यंत या फोनध्ये किती जीबी रॅम व स्टोरेज असेल यासंबंधी काहीही सांगितले नाही.
वाचाः
या फोनमध्ये ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. या फोनची बॅटरी काढता येवू शकते. हा फोन ४१६ तास स्टँडबाय करू शकतो, असा कंपनीचा दावा आहे. तसेच या फोनमध्ये ड्युअल सिम (नॅनो), वायफाय, ब्लूटूथ, मायक्रो यूएसबी पोर्ट आणि ३.५ हेडफोन जॅक यासारखे कनेक्टिविटीसाठी फीचर दिले आहेत. या स्मार्टफोनची किंमत अधिकृतपणे कंपनीने जाहीर केली नसली तरी काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, या फोनची किंमत १० हजार रुपये असू शकते.
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times