Smartphones Under Rs. 10000: भारतातील स्मार्टफोन मार्केट खूपच मोठे आहे. दर आठवड्याला नवनवीन स्मार्टफोन्स लाँच होण्याची रांग लागलेली असते. अगदी १० हजार रुपयांपासून १ लाख रुपयांपर्यंत अनेक शानदार स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. अनेक वेगवेगळ्या कंपन्यांचे फोन बाजारात उपलब्ध असल्याने खरेदी करताना गोंधळ निर्माण होतो. तुम्ही देखील नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर १० हजारांच्या बजेटमध्ये काही चांगले फोन्स उपलब्ध आहेत. आम्ही तुम्हाला या बजेटमध्ये येणाऱ्या काही चांगल्या हँडसेट्सची माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्हाला फोन खरेदी करताना मदत होईल. १० हजार रुपयांच्या बजेटमध्ये तुम्ही Redmi 9i Sport, Realme Narzo 50i, Oppo A12 आणि Vivo Y11 सारख्या स्मार्टफोन्सला खरेदी करू शकता. ऑनलाइन खरेदी केल्यास या फोनवर बंपर डिस्काउंटचा फायदा देखील मिळेल. या ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Redmi 9i Sport

redmi-9i-sport

Redmi 9i Sport हा बेस्टसेलर स्मार्टफोन आहे. कमी किंमतीत या फोनमध्ये दमदार फीचर्स मिळतात. Redmi 9i स्मार्टफोनची मूळ किंमत ९,९९९ रुपये आहे. परंतु, Flipkart वर १० टक्के डिस्काउंटनंतर फक्त ८,९९९ रुपयात उपलब्ध आहे. या फोनमध्ये ६.५३ इंच एचडी+ डिस्प्ले, फोटोग्राफीसाठी १३ मेगापिक्सल रियर कॅमेरा, ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, ५००० एमएएच Li-Polymer बॅटरी, MediaTek Helio G१४ Processor सह ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज दिले आहे.

वाचा: ३२ इंचाचा Smart LED TV फक्त ८,६९९ रुपयात खरेदी करण्याची संधी, पाहा डिटेल्स

​Realme Narzo 50i

realme-narzo-50i

Realme Narzo 50i ला देखील बंपर डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी आहे. फ्लिपकार्टवर फोन ६ टक्के डिस्काउंटसह ७,४९९ रुपयात उपलब्ध आहे. याशिवाय, HDFC Bank च्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १ हजार रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंटचा फायदा होईल. Realme Narzo 50i मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसरसह २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज मिळेल. यात ६.५ इंच HD+ डिस्प्ले दिला आहे. यात ८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. तर पॉवरसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे.

​Oppo A12

oppo-a12

Flipkart वर Oppo A12 स्मार्टफोन ९,९९० रुपये किंमतीत उपलब्ध आहे. फोनची मूळ किंमत १०,९९९ रुपये आहे. परंतु, डिस्काउंटसह स्वस्तात खरेदी करू शकता. Bank Offers वर १ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. ही किंमत फोनच्या ३ जीबी + ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. यामध्ये मीडियाटेक हीलियो जी३५ प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. तसेच, ६.२२ इंच एचडी+ डिस्प्ले, फोटोग्राफीसाठी रियरला १३ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल आणि फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. तर पॉवर बॅकअपसाठी ४२३० एमएएचची बॅटरी दिली आहे.

वाचा: WiFi: Jio-Excitel ची झोप उडवायला भारतात लाँच झाले ३००० Mbps स्पीड देणारे WiFi Router, पटापट डाउनलोड होतील मूव्हीज

​Vivo Y11

vivo-y11

Vivo Y11 च्या ३ जीबी + ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला तुम्ही ९,९९० रुपयात खरेदी करू शकता. फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोन ६.५३ इंच डिस्प्लेसह येतो. यात फोटोग्राफीसाठी रियरला १३ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल आणि फ्रंटला सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. यात SDM४३९ Processor चा सपोर्ट दिला आहे. ड्यूल सिम सपोर्टसह येणारा हा फोन Android Pie ९ वर काम करतो.

वाचा: Aadhaar Card: आधार कार्डमधील माहिती अपडेट करायचीय ? पण, डिटेल्स किती वेळा बदलता येतात? UIDAI ने दिली माहिती

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here