Infinix Note 12 Series

Infinix Note 12 सीरिज: Infinix Note 12 सीरिज ज्यामध्ये Infinix Note 12 आणि Note 12 Turbo यांचा समावेश आहे, भारतात २० मे रोजी फ्लिपकार्टवर डेब्यू करण्यास सज्ज आहे . Infinix Note 12 आणि Note 12 Turbo मध्ये फुल-HD+ रिझोल्यूशनसह ६.७ -इंचाचा डिस्प्ले असेल. Vanilla Note 12 MediaTek Helio G88 चिपसेटद्वारे समर्थित असेल. तर, Infinix Note 12 Turbo हे Helio G96 चिपसेटद्वारे समर्थित असेल. ते दोघेही MediaTek च्या Hyper Engine 2.0 गेमिंग सूटला सपोर्ट करतील.
वाचा : Cooler Tips : जुना कूलर बनेल चकाचक, देणार AC सारखा थंड वारा, फॉलो करा ‘या’ कूल टिप्स
iQOO Neo 6

iQOO निओ 6: iQOO Neo 6 लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. मात्र, कंपनीने याच्या लाँच डेटबद्दल माहिती दिलेली नाही. कंपनीने फोनला टिझ करणे सुरु केले आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर दिला जाईल. हा प्रोसेसर OnePlus 9R मध्ये देखील आहे. कंपनीने Neo सीरिज अंतर्गत लाँच करण्यात आलेल्या iQOO Neo 5s या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८८८ SoC आहे स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी १२ GB पर्यंत RAM, ६६ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० mAh ची शक्तिशाली बॅटरी देण्यात आली आहे.
वाचा :Smartphone Offers: iQOO चा ‘हा’ जबरदस्त 5G स्मार्टफोन स्वस्तात होऊ शकतो तुमचा, मिळतेय बेस्ट डील
One Plus Nord 2T

OnePlus Nord 2T भारतात १९ मे रोजी एन्ट्री करेल. ३२,००० रुपयांची किंमत अपेक्षित आहे. स्मार्टफोनमध्ये ६.४३ -इंचाचा फ्लॅट AMOLED डिस्प्ले असेल. जो ९० Hz रिफ्रेश रेट आणि FHD+ रिझोल्यूशन ऑफर करेल. हे MediaTek Dimensity 1300 चिपसेटद्वारे समर्थित असेल आणि आउट-ऑफ-द-बॉक्स Android 12 आधारित ऑक्सिजन 12 OS वर चालेल. फोटोग्राफीसाठी, OnePlus Nord 2T ला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळण्याची अपेक्षा आहे. ज्यामध्ये ५० -मेगापिक्सेलचा Sony IMX766 सेन्सर आहे. जो, ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS), ८-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड कॅमेरा आणि २-मेगापिक्सेलचा मोनोक्रोमला सपोर्ट करतो.
वाचा : Drone: स्मार्टफोनपेक्षा स्वस्तात मिळतोय ‘हा’ ड्रोन कॅमेरा, किंमत इतकी कमी की, विश्वासच बसणार नाही
Vivo X80 Series

Vivo X80 आणि Vivo X80 Pro: Vivo X80 आणि Vivo X80 Pro देखील भारतात १८ मे रोजी लाँच करण्यात येणार आहे. हे कंपनीचे प्रीमियम स्मार्टफोन असतील. यामध्ये यूजर्सना चांगला कॅमेरा अनुभव मिळेल. हे डिव्हाइस चीनमध्ये आधीच लाँच करण्यात आले आहेत. चीन आणि मलेशियामध्ये लाँच केलेल्या डिव्हाइसेस प्रमाणेच भारतात लाँच केलेल्या प्रकारांमध्ये देखील समान फीचर्स मिळण्याची अपेक्षा आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, Vivo X80 सीरीज भारतात ५० हजारांच्या वर ठेवली जाऊ शकते.
वाचा: Cooler Tips : जुना कूलर बनेल चकाचक, देणार AC सारखा थंड वारा, फॉलो करा ‘या’ कूल टिप्स
Realme Nazro 50 5G

Realme Narzo 50 Pro सोबत, कंपनी १८ मे रोजी Realme Narzo 50 5G लाँच करेल. हा कंपनीचा परवडणारा स्मार्टफोन असेल. याबाबत कंपनीकडून फारशी माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, अॅमेझॉनवरूनही त्याची विक्री केली जाईल. त्याची 4G आवृत्ती भारतात आधीच उपलब्ध आहे.
Realme Narzo 50 Pro: Realme ने कन्फर्म आहे की ,कंपनी १८ मे रोजी भारतात आपला नवीन स्मार्टफोन Narzo 50 Pro लाँच करणार आहे. ई-कॉमर्स साइट Amazon वर या डिव्हाइसठी एक पेज देखील तयार करण्यात आले आहे. यामध्ये Mediatek Dimensity 920 प्रोसेसर देण्यात येणार असल्याचे लिस्टिंगवरून स्पष्ट झाले आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times