Online Shopping Tips: स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर वाढल्याने सर्वकाही ऑनलाइन झाले आहे. आज प्रत्येक गोष्ट तुम्ही सहज स्मार्टफोनच्या एका क्लिकवर करू शकता. अगदी तुम्ही घरबसल्या जेवण ऑर्डर करण्यापासून ते कपडे खरेदी करू शकता. प्रवासासाठी तिकीट बुक करणे देखील सहज ऑनलाइन शक्य आहे. प्रामुख्याने शॉपिंगसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. घरात उपयोगी येणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, कपडे, स्मार्टफोन्ससह अनेक वस्तू सहज ऑनलाइन उपलब्ध आहे. विशेष म्हणजे बाजारात जावून खरेदी करण्याऐवजी तुम्ही सहज स्वस्तात ऑनलाइन मागवू शकता. मात्र, ऑफर्स आणि डिस्काउंटच्या नादात ऑनलाइन खरेदी करताना नुकसान देखील होऊ शकते. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंग करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. ऑनलाइन खरेदीचे जसे फायदे आहेत, तसे तोटे देखील आहे. त्यामुळे सुरक्षित ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी तुम्ही पुढील टिप्स फॉलो करू शकता.

​वस्तूच्या फीचर्स आणि किंमतीबाबत घ्या माहिती

ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म्सवरून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची प्रामुख्याने विक्री होते. यामध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, व्हिडिओ गेम, इयरफोन्ससह इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे. परंतु, हे प्रोडक्ट्स कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असण्यासोबतच इतर ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म्सवर देखील उपलब्ध असतात. अशावेळी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर प्रोडक्ट्सच्या किंमत आणि फीचर्सबाबत माहिती घ्यावी. त्यानंतर इतर साइट्सवर उपलब्ध असलेल्या प्रोडक्ट्सशी तुलना करून वस्तू खरेदी करावी. जेणेकरून, तुम्हाला प्रोडक्टविषयी सविस्तर माहिती मिळेलच, सोबतच ऑफर्सचा देखील फायदा होईल.

वाचा: Best AC: या उन्हाळ्यात घरी आणा ‘हे’ जबरदस्त ५ स्टार Window AC, फास्ट कुलिंगसह विजेची बचत देखील होणार, पाहा डिटेल्स

​रिव्ह्यू आणि रेटिंग तपासा

ऑनलाइन वेगवेगळ्या कंपन्यांचे एकाच प्रकारचे प्रोडक्ट्स उपलब्ध असतात. अशावेळी आपण कोणत्या कंपनीची वस्तू खरेदी करावी याबाबत गोंधळून जातो. अशा स्थितीमध्ये प्रोडक्ट आणि कंपनीला यूजर्सकडून मिळालेले रेटिंग आणि रिव्ह्यू तपासावे. यूजर्स आपल्या अनुभवानुसार वस्तू चांगली आहे की नाही, हे सांगत असतात. ज्याचा फायदा तुम्हाला वस्तू खरेदी करताना होतो. अनेकदा ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म्सवर प्रोडक्ट्सचे फेक रिव्ह्यू देखील दिले जातात. त्यामुळे वस्तूची संपूर्ण माहिती घेऊनच खरेदी करावे.

​सुरक्षित वेबसाइटवरून करा खरेदी

अनेक अशा ई-कॉमर्स वेबसाइट्स उपलब्ध आहेत, जेथे तुम्हाला डिस्काउंटसह वस्तू मिळतील. मात्र, डिस्काउंट आणि ऑफर्सच्या नादात कोणत्याही वेबसाइटवरून वस्तू खरेदी करणे तुम्हाला महागात पडू शकते. अनेकदा तुम्ही पाहिले असेल की स्वस्तात वस्तू खरेदी करण्याच्या नादात कोणत्याही साइट्सवरून शॉपिंग केली जाते. मात्र, यामुळे पैसे तर जातात व चांगली वस्तू देखील मिळत नाही. तसेच, https असलेल्या वेबसाइटवरून वस्तू खरेदी करावी. यामुळे तुमचे पैसे देखील सुरक्षित राहतील.

वाचा: Smartphone Offers: भारीच! iPhone ला खूपच स्वस्तात खरेदीची संधी, ‘या’ लेटेस्ट मॉडेलवर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट

​पासवर्ड आणि बँकिंग माहिती सेव्ह करणे टाळा

ई-कॉमर्स साइट्सवर शॉपिंग करताना अनेकदा बँकिंग माहिती सेव्ह करण्याची चूक अनेकजण करतात. याशिवाय, पासवर्ड देखील सेव्ह करतात, जेणेकरून पुन्हा लॉगइन करताना पासवर्डची गरज पडणार नाही. तुमचा स्वतःचा लॅपटॉप असल्यास ही मेथड तुम्ही वापरू शकता. परंतु, इतरांच्या मोबाइल अथवा लॅपटॉपवरून शॉपिंग करत असताना बँकिंग माहिती व पासवर्ड कधीही सेव्ह करू नये. तुमच्या माहितीचा चुकीचा वापर होऊ शकतो. पासवर्डऐवजी तुम्ही वन टाइम पासवर्ड म्हणजेच ओटीपीचा वापर करू शकता.

​वस्तूवरील गॅरेंटी-वॉरंटी नक्की पाहा

स्वस्तात उपलब्ध असल्याने अनेकदा आपण कोणतीही वस्तू न तपासताच खरेदी करतो. आपण वस्तूवर उपलब्ध असलेल्या गॅरेंटी व वॉरंटीकडे दुर्लक्ष करतो. मात्र, यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. खासकरून इलेक्ट्रॉनिक वस्तू मागवताना त्यावरील वॉरंटीबाबत जाणून घ्यावे. प्रोडक्टला रिटर्न करण्याबाबत, कॅश ऑन डिलिव्हरीबाबत देखील सविस्तर जाणून घ्यावे. जेणेकरून, तुम्हाला एखादी वस्तू न आवडल्यास परत देखील करता येईल. या टिप्स फॉलो करून तुम्ही सुरक्षित ऑनलाइन शॉपिंग करू शकता.

वाचा: Air Cooler: कडक उकाड्यात मिळेल थंड हवेचा अनुभव, एसीप्रमाणे भिंतीवर टांगता येईल ‘हा’ स्वस्त कूलर; पाहा किंमत

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here