Moto G30

Motorola G30, किंमत १०,९९९ रुपये: Moto G30 स्मार्टफोन Snapdragon 662 4G प्रोसेसर सपोर्टसह येतो. Motorola G30 फोनमध्ये ६.५ इंचाचा HD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचा रिफ्रेश रेट सपोर्ट ९० Hz आहे. पॉवर बॅकअपसाठी, Moto G30 मध्ये ५००० mAh ची मजबूत बॅटरी देखील प्रदान करण्यात आली आहे. 20W फास्ट चार्जरच्या मदतीने फोन चार्ज करता येतो. फोन ६४ MP क्वाड कॅमेरा सेटअप सह येतो. बजेट बायर्ससाठी Motorola G30 फोन मस्त आहे.
Redmi 10 Prime

Redmi 10 Prime: किंमत – १२,४९९ रुपये: रेडमी 10 प्राइम स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये ५० MP प्रायमरी कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. तसेच, फोन MediaTek Helio G88 SoC चिपसेट सपोर्ट सह येईल. Redmi 10 प्राइम, फोनमध्ये ६००० mAh बॅटरी आहे. Redmi 10 प्राइम, 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. Redmi 10 प्राइम स्मार्टफोनमध्ये ६.५ K फुल एचडी+ डिस्प्ले आहे. जो ९० Hz IPS LCD डिस्प्लेसह येतो. कमी किमतीत हा एक चांगला पर्याय आहे.
वाचा : One Plus Updates: मस्तच ! या One Plus फोनसाठी आले लेटेस्ट अपडेट, मिळणार काही भन्नाट फीचर्स
Moto G40 Fusion

Moto G40 Fusion: किंमत – १४,२८० रुपये : Moto G40 Fusion मध्ये ६.८ -इंचाचा FHD+ HDR10 डिस्प्ले आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 732G सपोर्ट असेल. Moto G40 Fusion ६४ MP प्रायमरी कॅमेरा सपोर्टसह येतो. तसेच, ११८ अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि मॅक्रो लेन्स सपोर्ट असतील. मोटो G40 फ्यूजनमध्ये सेल्फीसाठी ३२ MP कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी मोटो G40 फ्यूजन, फोनमध्ये ६००० mAh ची मजबूत बॅटरी देण्यात आली आहे.गिफ्ट देण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
वाचा: Cooler Tips : जुना कूलर बनेल चकाचक, देणार AC सारखा थंड वारा, फॉलो करा ‘या’ कूल टिप्स
Samsung Galaxy M32

Samsung Galaxy M32: किंमत – ११,९९९ रुपये : Samsung Galaxy M32 स्मार्टफोनमध्ये ६.४-इंचाचा FHD + सुपर AMOLED डिस्प्ले आहे. फोनमध्ये MediaTek Helio G80 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ६४ MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, ८ MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, २ MP डेप्थ सेन्सर आणि २ MP मॅक्रो लेन्स आहेत. Samsung Galaxy M32 समोर २० MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ६००० mAh बॅटरी आहे. जी ,१५ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times