Xiaomi Redmi 9A Sport

Redmi 9A Sport हा ४जी कनेक्टिव्हिटीसह येणारा स्मार्टफोन फक्त ६,९९९ रुपयात उपलब्ध आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी२५ चिपसेटचा सपोर्ट दिला आहे. हा फोन अँड्राइड v८.१ (ओरियो) वर काम करतो. यात ६.५३ इंच की IPS LCD डिस्प्ले दिला आहे. यात २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. यूजर्सला १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. तर पॉवरसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे.
Xiaomi Redmi 7A 32GB

Xiaomi Redmi 7A ४जी स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४३९ प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. यात ५.४५ इंच IPS LCD डिस्प्ले मिळतो. फोन २ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल स्टोरेजसह येतो. यात १२ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोन अँड्राइड वी९.० (पाय) वर काम करतो. यात पॉवरसाठी ४००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. Redmi 7A स्मार्टफोनला तुम्ही ७,४९८ रुपयात खरेदी करू शकता.
Xiaomi Redmi 10A

Redmi 10A स्मार्टफोनमध्ये ६.५३ इंच IPS LCD डिस्प्ले दिला असून, हँडसेट मीडियाटेक हीलियो जी२५ चिपसेट सपोर्टसह येतो. फोन अँड्राइड वी११ वर काम करतो. यात ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळतो. तर फोटोग्राफीसाठी रियरला १३ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोन फक्त ८,४९९ रुपयात उपलब्ध आहे.
Xiaomi Redmi 6 Pro

Xiaomi Redmi 6 Pro देखील बेस्टेसेलर स्मार्टफोन आहे. यात ५.८४ इंच IPS LCD डिस्प्ले दिला आहे. फोन ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल स्टोरेजसह येतो. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६२५ चिपसेटचा सपोर्ट मिळतो. फोन अँड्राइड वी८.१ (ओरियो) वर काम करतो. यात ड्यल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १२ मेगापिक्सल रियर आणि ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे. ४००० एमएएच दमदार बॅटरी लाइफसह येणाऱ्या या फोनला तुम्ही ८,९९९ रुपयात खरेदी करू शकता.
Xiaomi Redmi 8A

Xiaomi Redmi 8A या ४जी स्मार्टफोनमध्ये ६.२२ इंच IPS LCD डिस्प्ले दिला आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४३९ चिपसेटचा सपोर्ट दिला आहे. फोन अँड्राइड वी९.० (पाय) वर काम करतो. यात १२ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोन ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजसह येतो. यात ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोन ९,२९० रुपये किंमतीत उपलब्ध आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times