Redmi Note 10 Pro Max

Redmi Note 10 Pro Max स्मार्टफोन दमदार कॅमेऱ्यासह येतो. या फोनला तुम्ही १९,९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. Redmi Note 10 Pro Max स्मार्टफोनमध्ये रियरला १०८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, ५ मेगापिक्सल सुपर मॅक्रो लेंस आणि ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा दिला आहे. तर सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. यात पॉवर बॅकअपसाठी ३३ वॉट फास्ट चार्जरसह ५०२० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोन ६.६७ इंच FHD+ सुपर AMOLED डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७३२ जी चिपसेटसह येतो.
Realme 9 Pro

Realme 9 Pro स्मार्टफोन १८,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. फोनला ग्रीन, ब्लॅक आणि सनराइज ब्लू कलर व्हेरिएंटमध्ये खरेदी करता येईल. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला असून, यात ६४ मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल सेंसरचा समावेश आहे. तर फ्रंटला १६ मेगापिक्सलचा शानदार कॅमेरा मिळतो. यात ६.६ इंच डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज, रिझॉल्यूशन २४१२x१०८० पिक्सल आहे. तसेच, ३३ वॉट डार्ट चार्जसह ५००० एमएएचच बॅटरी, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६९५ ५जी प्रोसेसर, ८ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज दिले आहे.
IQoo Z3

iQoo Z3 5G स्मार्टफोन १९,९९० रुपये किंमतीत उपलब्ध आहे. फोन ब्लॅक आणि ब्लू कलर व्हेरिएंटमध्ये येतो. यात रियरला ६४ मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तर पॉवर बॅकअपसाठी ४४०० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. फोन ६.५८ इंच फुल एचडी+ डिस्प्लेसह येतो. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७६८ ५जी प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. iQoo चा हा फोन अँड्राइड ११ आधारित फनटचओएस ११.१.१ वर काम करतो.
Realme 9 5G SE

Realme 9 5G SE मध्ये फोटोग्राफीसाठी रियरला ४८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. पॉवर बॅकअपसाठी ३० वॉट डार्ट चार्ज टेक्नोलॉजी सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. यात ६.६ इंच डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १४४ हर्ट्ज आणि रिझॉल्यूशन २४१२ x १०८० पिक्सल आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७७८ ५जी प्रोसेसरसह ८ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज दिले आहे. फोन अँड्राइड ११ आधारित MIUI २.० वर काम करतो. फोनची किंमत १९,९९९ रुपये आहे.
Poco X3 Pro

Poco X3 Pro स्मार्टफोन १९,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. फोन ब्लॅक, ब्लू आणि ब्राँझ कलर व्हेरिएंटमध्ये येतो. यात ६.६७ इंच एलसीडी डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८६० चिपसेटसह ८ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज, फोटोग्राफीसाठी रियरला ४८ मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल आणि फ्रंटला २० मेगापिक्सलचा कॅमेरा व ५१६० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोन अँड्राइड ११ आधारित फनटचओएस ११.१.१ वर काम करतो.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times