Mi India Mega Sale: लॅपटॉप हा महत्त्वाच्या डिव्हाइसपैकी एक आहे. ऑफिसचे काम असो अथवा कॉलेजचा प्रोजेक्ट, तुमच्याकडे लॅपटॉप असणे अत्यंत गरजेचे आहे. स्मार्टफोनप्रमाणेच लॅपटॉपचे महत्त्व देखील वाढले आहे. तुम्ही देखील तुमचा जुना लॅपटॉप बदलण्याचा विचार करत असाल अथवा नवीन लॅपटॉप खरेदी करण्यासाठी सेलची वाट पाहत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. Mi India ने खास Mega Sale ची घोषणा केली आहे. या सेलमध्ये लॅपटॉपला २२ हजार रुपयांच्या बंपर डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी आहे. Mi India Mega Sale मध्ये तुम्हाला रेडमीबुक आणि एमआय नोटबुक सीरिजच्या लॅपटॉप्सवर आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळेल. सेलमध्ये Redmibook 15 i3, Redmibook 15 Pro, Mi NoteBook Pro आणि Mi Notebook Ultra ला स्वस्तात खरेदी करू शकता. या लॅपटॉप्सवरील ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Redmibook 15 i3

redmibook-15-i3

Redmibook 15 i3 ला ३४,९९९ रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करू शकता. लॅपटॉपवर ५०० रुपये डिस्काउंट कूपन आणि HDFC कार्ड व ईएमआयवर ३,५०० रुपये डिस्काउंटचा फायदा मिळेल. विंडोज ११ वर फ्री अपग्रेड ऑफर देखील आहे. तुम्ही १ वर्षासाठी रेडमीबुकच्या प्रोटेक्शनसाठी Mi Extended Warranty घेऊ शकता. यामध्ये १५.६ इंच फुल एचडी स्क्रीन दिली आहे. लॅफटॉप लेटेस्ट ११th जेन इंटेल टाइगर लेक कोर i३-१११५G४ प्रोसेसरसह येतो. यात ८ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज मिळते. १० तासांच्या बॅटरी लाइफसह येणाऱ्या या लॅपटॉपमध्ये मल्टी-टच ट्रॅकपॅड मिळतो.

वाचा – Smart TV Offers: आता घरीच घ्या थिएटरचा आनंद, स्वस्तात खरेदी करा ‘हे’ ४३ इंच स्मार्ट टीव्ही; फीचर्स जबरदस्त

​Redmibook 15 Pro

redmibook-15-pro

Redmibook 15 Pro ला कंपनीच्य साइटवर ४४,९९९ रुपयात लिस्ट करण्यात आले आहे. लॅपटॉप खरेदीवर थेट १००० रुपये फ्लॅट डिस्काउंट, HDFC कार्ड व ईएमआयवर ४००० रुपये इंस्टंट डिस्काउंटचा फायदा मिळेल. लॅपटॉपला नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करू शकता. तुम्ही १ वर्षासाठी रेडमीबुकच्या प्रोटेक्शनसाठी Mi Extended Warranty घेता येईल. यामध्ये ८ जीबी रॅम, ५१२ जीबी एसएसडी आणि i५ ११th Gen + आइरिस Xe ग्राफिक्स सारखे फीचर्स दिले आहे. लॅपटॉप १५.६ इंच फुल एचडी रिझॉल्यूशन डिस्प्लेसह येतो. यात बॅटरीसह ६५ वॉट पॉवर अडॅप्टर मिळतो.

वाचा: Neckband Earphones: ६० तासांच्या बॅटरी लाइफसह ‘या’ कंपनीचे शानदार नेकबँड इयरफोन्स लाँच, फक्त ९९ रुपयात खरेदीची संधी

​Mi NoteBook Pro

mi-notebook-pro

Mi NoteBook Pro मध्ये १४ इंच ट्रूलाइफ डिस्प्ले, ११th जेन इंटेल कोर i७-११३७०H प्रोसेसर, १६ जीबी रॅम व ५१२ जीबी स्टोरेज, ब्लूटूथ ५.१, विंडोज प्रीसिजन ड्राइव्हर्ससह मल्टी-टच सपोर्टसह येणारा टचपॅड सारखे फीचर्स मिळतात. यात पॉवर बटनमध्ये विंडोज हॅलो सप्रटसह इन-बिल्ट फिंगरप्रिंट स्कॅनर दिले आहे. बॅटरीसह ६५ वॉट टाइप-सी पॉवर अडॅप्टर मिळतो. लॅपटॉपची किंमत ५८,९९ रुपये आहे. यावर एकूण ५ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंटचा पायदा मिळेल. तसेच, ८ जीबी रॅम व्हेरिएंट ५४,९९९ रुपयात लिस्टेड आहे.

​Mi Notebook Ultra

mi-notebook-ultra

Mi Notebook Ultra मध्ये १५.६ इंच ट्रूलाइफ+ डिस्प्ले, ११th Gen इंटेल कोर i७-११३७०H प्रोसेसर, १६ जीबी रॅम + ५१२ जीबी स्टोरेज, ड्यूल बँड ८०२.११ ax वाय-फाय ६, ब्लूटूथ ५.१ सारखे फीचर्स दिले आहेत. यात मल्टी-टच सपोर्टसह येणारा ट्रॅकपॅड मिळतो. लॅपटॉपची बॅटरी सिंगल चार्जमध्ये १२ तास टिकते. बॅटरीसह ६५ वॉट टाइप-सी पॉवर अडॅप्टर मिळतो. यामध्ये पॉवर बटनमध्ये विंडोज हॅलो सप्रटसह इन-बिल्ट फिंगरप्रिंट स्कॅनर दिले आहे. Mi Notebook Ultra ची किंमत ६१,४९९ रुपये आहे. या लॅपटॉपला १ हजार रुपये डिस्काउंट कूपनसह खरेदी करू शकता. HDFC कार्ड आणि ईएमआयवर ५ हजार रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंटचा फायदा मिळेल.

वाचा: Smartphone Tips: भन्नाट ट्रिक! तुमचा मोबाइल नंबर लपवून कोणालाही करू शकता मेसेज-कॉल, जाणून घ्या प्रोसेस

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here