वाचाः
या आयफोनच्या लाँच आधी बऱ्याच रिपोर्ट्स लिक झाल्या आहेत. त्यात आयफोनची डिझाईन आणि फीचर्सची माहिती आहे. लाँच होणारा आयफोन हा २०१६ साली आलेल्या SE चे अपग्रेडेड व्हर्जन आहे. या आयफोनच्या डिझाईन संदर्भात आलेल्या माहिती नुसार, या फोनमध्ये iPhone 8 चे फीचर्स पाहायला मिळतील. कंपनीने आयफोन SE 2 मध्ये टच आयडी फीचर दिले होते. तसेच अनेक युजर्संना या फोनमध्ये फेस आयडी देण्याची शक्यता आहे.
वाचाः
या आयफोनमध्ये iPhone 11 सीरिजमधील A13 बायॉनिक चिपसेट दिली जाण्याची शक्यता आहे. नवीन आयफोनमध्ये ४.३ इंचाचा डिस्प्ले असू शकतो. तसेच कंपनी ३ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज आणि १२८ जीबी स्टोरेज या पर्यायामध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. या फोनची किंमत ३० हजार ४०० रुपये असू शकते. उद्या लाँचिंगवेळी या फोनमध्ये आणखी कोणते फीचर्स तसेच या फोनची किंमत किती असेल हे अधिकृतपणे स्पष्ट होईल.
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times