Best 5G Phone 2022: गेल्या काही वर्षात भारतीय स्मार्टफोन बाजारात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अनेक कंपन्या दरआठवड्याला नवनवीन स्मार्टफोन्स लाँच करत आहेत. कमी किंमतीत दमदार फीचर्ससह येणारे स्मार्टफोन्स सादर करण्याचा कंपन्यांचा प्रयत्न असतो. सध्या बाजारात येणारे हँडसेट्स हे शानदार कॅमेरा, डिस्प्ले, परफॉर्मेंस ऑप्टिमाइजेशन, गेमिंग परफॉर्मेंससह येतात. यासोबतच, ५जी स्मार्टफोन देखील सादर केले जात आहे. भारतात अद्याप ५जी नेटवर्क उपलब्ध झालेले नाही. मात्र तरीही ग्राहकांची ५जी फोन्सला मागणी पाहायला मिळत आहे. तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात एकापेक्षा एक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. आम्ही तुमच्यासाठी या वर्षातील आतापर्यंत लाँच झालेल्या सर्वोत्तम स्मार्टफोन्सची लिस्ट आणली आहे. जेणेकरून नवीन फोन खरेदी करताना तुम्हाला मदत होईल. २५ हजारांच्या बजेटमध्ये येणाऱ्या या स्मार्टफोन्सविषयी जाणून घेऊया.

Realme 9 Pro

realme-9-pro

Realme 9 Pro स्मार्टफोन २४,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. यामध्ये ९० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा एमोलेड डिस्प्ले दिला आहे. तर पॉवर बॅकअपसाठी ४५०० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. फोटोग्राफीसाठी Sony IMX७६६ सेंसर दिला आहे. तसेच, मीडियाटेक डायमेंशन ९२० ५जी प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. हा फोन आउट ऑफ द बॉक्स अँड्राइड १२ आधारित रियलमी यूआय ३.० वर काम करतो. दमदार फीचर्ससह येणाऱ्या या फोनला तुम्ही सनराइज ब्लू, ऑरोरा ग्रीन आणि मिडनाइट ब्लॅक रंगात खरेदी करू शकता.

वाचा – Sim Card: तुमच्या नावावर किती जणांनी घेतले आहे सिम कार्ड? या सोप्या प्रोसेसने मिळेल संपूर्ण माहिती

​Realme 9 5G Speed Edition

realme-9-5g-speed-edition

Realme 9 5G Speed Edition हा सर्वात फास्ट ५जी मिड-रेंज स्मार्टफोन आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन ७७८ ५जी प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. तसेच, यात १४४ हर्ट्ज रिफ्रेश रेटसह ६.६ इंच अल्ट्रा स्मूथ फुल एचडी डिस्प्ले दिला आहे. फोटोग्राफीसाठी ४८ मेगापिक्सल ट्रिपल नाइटस्केप कॅमेरा सेटअप आहे. पॉवर बॅकअपसाठी ३० वॉट डार्टचार्ज सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळते. या फोनला तुम्ही १९,९९९ रुपयात खरेदी करू शकता. फोन Azure Glow आणि Starry Glow रंगात येतो.

वाचा: Recharge Plan: युजर्सची मजा ! या प्लानमध्ये ३ महिने Disney+ Hotstar फ्री, सोबत ८ GB डेटा सुद्धा, किंमत खूपच कमी

​OnePlus Nord CE 2 Lite 5G

oneplus-nord-ce-2-lite-5g

OnePlus Nord CE 2 Lite 5G हा एक स्वस्त ५जी स्मार्टफोन आहे. वनप्लसच्या या फोनची किंमत फक्त १९,९९९ रुपये आहे. यामध्ये ६. ५९ इंच फुल-एचडी+ एलसीडी डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६९५ ५जी चिपसेटसह ८ जीबीपर्यंत LPDDR४X रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज दिले आहे. पॉवर बॅकअपसाठी यात ३३ वॉट SuperVOOC चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळते. हा फोन अँड्राइड १२ आधारित ऑक्सिजन ओएस १२.१ वर काम करतो.

​Redmi Note 11 Pro+ 5G

redmi-note-11-pro-5g

Redmi Note 11 Pro+ 5G स्मार्टफोन २०,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी रियरला १०८ मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल आणि सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोन स्नॅपड्रॅगन ६९५ SoC सपोर्टसह येतो. यात ६.६७ इंच फुल HD+ सुपर AMOLED डिस्प्ले दिला असून, याचा पीक ब्राइटनेस १२०० निट्स आहे. Redmi चा हा फोन तीन रंगात उपलब्ध आहे. प्रमुख ई-कॉमर्स साइटवरून तुम्ही फोनला स्वस्तात खरेदी करू शकता.

वाचा: Flipkart Sale: फ्लिपकार्टवर सुरू झाला खास सेल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ८०% डिस्काउंट; अवघ्या ९९ रुपयात मिळतील अनेक वस्तू

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here