Best Smartphone under Rs 20000: भारतीय बाजारात दरआठवड्याला अनेक स्मार्टफोन्स लाँच होत असतात. अगदी १० हजार रुपयांपासून ते १ लाख रुपयांपर्यंतचे स्मार्टफोन्स बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, खासकरून १५ ते २० हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या फोन्सला भारतीय ग्राहकांकडून पसंती मिळते. या बजेटमध्ये अनेक कंपन्या आपल्या स्मार्टफोन्सला सादर करत असतात. तुमचे बजेट देखील २० हजार रुपयांपर्यंत असल्यास या किंमतीत तुम्हाला अनेक चांगले फोन्स मिळतील. तुम्ही जर स्वतःसाठी अथवा इतरांना गिफ्ट देण्यासाठी फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. २० हजार रुपयांच्या बजेटमध्ये तुम्ही Motorola Edge 20 Fusion, Realme 9 Edition 5G, Poco X4 Pro 5G, Samsung Galaxy M33 5G आणि Redmi Note 11 Pro या स्मार्टफोन्सला खरेदी करू शकता. या फोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Motorola Edge 20 Fusion

motorola-edge-20-fusion

Motorola Edge 20 Fusion च्या ६ जीबी रॅम + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत १८,९९९ रुपये आहे. फोनमध्ये ६.६७ इंच FHD+ OLED डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. यात मीडियाटेक डायमेंशन ८०० यू प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी रियरला १०८ मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि २ मेगापिक्सल डेप्थ लेंस आहे. तर सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी ३० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे.

वाचा: Recharge Plans: अनलिमिटेड कॉलिंग, डेटासह येणारे ‘हे’ आहेत स्वस्त प्रीपेड प्लान्स, किंमत १५० रुपयांपेक्षा कमी

विवो वॉच (42मिमी) स्पेसिफि

​Realme 9 Edition 5G

realme-9-edition-5g

Realme 9 Edition 5G च्या ६ जीबी + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १९,९९९ रुपये आहे. फोनमध्ये ६.६ इंच फुल एचडी+ IPS डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन २४१२x१०८० पिक्सल, रिफ्रेश रेट १४४ हर्ट्ज आहे. याचे ब्राइटनेस ६०० निट्स आहे. फोन ८ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह येतो. यामध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. पॉवर बॅकअपसाठी ३० वॉट फास्ट चार्जिंगसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे.

​Poco X4 Pro 5G

poco-x4-pro-5g

Poco X4 Pro 5G च्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला तुम्ही १८,९९९ रुपयात खरेदी करू शकता. फोनमध्ये ६.६७ इंच HD+ सुपर AMOLED डिस्प्ले दिला असून, याचा ब्राइटनेस १२०० निट्स आणि रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. फोटोग्राफीसाठी रियरला ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला असून, यात ६४ मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सलचा समावेश आहे. तर पॉवरसाठी ६७ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे.

वाचा: Oppo Smartphones: १२ जीबी रॅम आणि ५० मेगापिक्सल कॅमेरा, Oppo ने एकाचवेळी लाँच केले तीन दमदार फोन; पाहा किंमत

​Samsung Galaxy M33 5G

samsung-galaxy-m33-5g

Samsung Galaxy M33 5G मध्ये ६.६ इंच TFT फुल एचडी प्लस LCD डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०८ आहे. तर रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. फोन ५जी चिपसेट Exynos १२८० ऑक्टा-कोर SoC सह येतो. यात पॉवर बॅकअपसाठी २५ वॉट USB Type C फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला तुम्ही फक्त १७,९९९ रुपयात खरेदी करू शकता.

​Redmi Note 11 Pro

redmi-note-11-pro

Redmi Note 11 Pro चे ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट १८,९९९ रुपयात उपलब्ध आहे. फोन ड्यूल सिम (नॅनो) सपोर्टसह येतो. हा फोन अँड्राइड ११ आधारित MIUI १३ स्किनवर काम करतो. यामध्ये ६.६७ इंच फुल-एचडी+ एमोलेड डॉट डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल, रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आणि पीक ब्राइटनेस १२०० निट्स आहे. फोन मीडियाटेक हीलियो जी९६ SoC सपोर्टसह येतो.

वाचा: Smartphone Offers: आयफोन १२ वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, चक्क अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here