वाचा: Portable Air Cooler: पंख्यापेक्षा स्वस्त मिळतोय ‘हा’ पिटुकला एअर कूलर, अगदी मिनिटात करेल घर थंड; किंमत खूपच कमी
तब्बल २६ हजारात मिळतेय बादली
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर एक बादली २८ टक्के डिस्काउंटनंतर तब्बल २५,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. तर आणखी एका सेलरने ऑनलाइन रिटेल प्लॅटफॉर्मवर दोन प्लॅस्टिकचे मग चक्क १० हजार रुपये किंमतीत लिस्ट केले आहे. कदाचित हे एखाद्या त्रुटीमुळे झाले असण्याची शक्यता आहे किंवा ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी देखील असे करण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्या सोशल मीडियावर याच बादली आणि मगची चर्चा सुरू आहे. याचे फोटो देखील व्हायरल झाले आहेत. यूजर्स या महागड्या प्लॅस्टिक मग आणि बादलीमुळे Amazon ला ट्रोल करत आहेत.
ही पूर्णपणे कंपनीची चूक असल्याचे म्हणता येणार नाही. कारण, या प्लॅटफॉर्म्सवर सेलर आपल्या प्रोडक्ट्सची किंमत ठरवतात व लिस्ट करत असतात. विशेष म्हणजे वेबसाइटवर या मगची मूळ किंमत २२,०८० रुपये सांगण्यात आली आहे व ५५ टक्के डिस्काउंटनंतर ग्राहक ९,९१४ रुपयात खरेदी करू शकतात.

असेच काहीसे बादलीच्या बाबतीत पाहायला मिळत आहे. या प्लॅस्टिकच्या बादलीला ३५,९९० रुपयात लिस्ट करण्यात आले आहे. तर २८ टक्के डिस्काउंटनंतर २५,९९९ रुपयात खरेदी करता येईल. तसेच, Amazon वर अशाप्रकारे स्वस्त प्रोडक्ट्सची किंमत अधिक पाहायला मिळण्याची ही पहिली वेळ नाही. दरम्यान, कंपनीने अद्याप यावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times