6000 mAh Battery Smartphones : युजर्स जेव्हा नवीन स्मार्टफोन खरेदी करायला जातात. तेव्हा अनेक गोष्टींकडे लक्ष देतात. स्मार्टफोनची बॅटरी त्यापैकीच एक. फोनची बॅटरी किती काळ चालेल हे पाहून देखील अनेक युजर्स स्मार्टफोन्स खरेदी करतात. बहुतेक स्मार्टफोन्सची बॅटरी एका दिवसात संपते. म्हणूनच ग्राहक कायम अशा स्मार्टफोन्सच्या शोधात असतात. ज्यांची बॅटरी अधिक काळ टिकेल आणि फोन पुन्हा पुन्हा चार्ज करण्याची गरज भासणार नाही. अनेक कंपन्यांनी ६००० mAh बॅटरी असलेले स्मार्टफोन बाजारात आणले आहेत त्याबद्दल जाणून घेऊया. या लिस्टमध्ये Samsung Galaxy M3, Motorola, Realme Narzo 30a, आणि Infinix Hot 10 Play Gionee स्मार्टफोन्सचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला कमी किंमतीत ६००० mAh बॅटरी असलेल्या स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत. पाहा ही लिस्ट आणि खरेदी करा सर्वात बेस्ट स्मार्टफोन.

Gionee Max Pro

gionee-max-pro

GIONEE मॅक्स प्रो: जर तुमचे बजेट ७ हजार रुपयांपेक्षा कमी असेल आणि तुम्हाला चांगली बॅटरी असलेला फोन घ्यायचा असेल तर तुम्ही हा फोन घेऊ शकता. GIONEE मॅक्स प्रो फोनमध्ये ३ GB रॅम आणि ३२ GB स्टोरेज आहे. ६००० mah बॅटरी व्यतिरिक्त, फोनमध्ये ६.५२ -इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. फोनच्या मागील बाजूस दोन कॅमेरे आहेत. प्रायमरी कॅमेरा १३ MP चा आहे आणि सेकंडरी कॅमेरा २ MP चा आहे. सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सेल देण्यात आला आहे. हा फोन तुम्ही फक्त ६,९९९ मध्ये खरेदी करू शकता.

वाचा: Smart Tv Offers: आता प्रत्येकाच्या घरी असेल मोठा स्मार्ट टीव्ही, रेडमी डेज सेलमध्ये Premium 4K स्मार्ट टीव्हीवर मिळतोय मोठा डिस्काउंट

Motorola G10 Power

motorola-g10-power

Motorola G10 पॉवर: Motorola G10 Power ६.५१ इंच स्क्रीनसह येतो. ६००० mah बॅटरी व्यतिरिक्त, फोन ४६० प्रोसेसर आणि स्टॉक Android वर काम करतो. फोनच्या मागील बाजूस चार कॅमेरे आहेत. प्रायमरी ४८ मेगापिक्सेल आहे, तर सेकंडरी ८ मेगापिक्सेल आणि इतर दोन २-२ मेगापिक्सेल आहेत. फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा आहे. Motorola G10 Power ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजसह हा फोन तुम्हाला १०,४९९ रुपयांना मिळू शकतो. स्वस्तात फोन खरेदी करायचा असल्यास हा एक चांगला पर्याय आहे.

वाचा : १२० फिटनेस मोड्ससह Xiaomi Smart Band 7 लाँच, डिव्हाइस ठेवणार SpO2 वर वॉच, किंमत खूपच कमी, पाहा फीचर्स

Infinix Hot 10 Play

infinix-hot-10-play

Infinix Hot 10 Play: Infinix च्या या फोन मध्ये तुम्हाला ६००० mah ची बॅटरी मिळेल. यात ६.८२ इंच HD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये ४ GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज आहे. त्याची किंमत ८,२९९ आहे. म्हणजेच हा जबरदस्त फोन तुम्हाला ९ हजारात मिळू शकतो. Infinix Hot 10 Play मध्ये ६.८२ इंचाचा एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले दिला आहे. याचा स्क्रीन रिझॉल्यूशन 720 x1 640 पिक्सल आहे या फोनमध्ये Gyroscope, Ambient Light Sensor, Proximity Sensor आणि Accelerometer सह अनेक फीचर्स आहे.

वाचा: Smart Tv Launch: घरालाच थिएटर बनवेल Xiaomi चा 4K स्मार्ट टीव्ही, ८६ इंच स्क्रिन – ८ Speakers सह डॉल्बी साउंडचा अनुभव मिळणार

Realme Narzo 30 A

realme-narzo-30-a

Realme Narzo 30a: Realme Narzo 30A ची स्क्रीन ६.५१ आहे. यात दोन रियर कॅमेरे आहेत. प्रायमरी १३ मेगापिक्सेलचा आणि सेकंडरी २ मेगापिक्सेलचा आहे. तसेच, Realme Narzo 30a चा फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा आहे. यात ६००० mAh ची मजबूत बॅटरी देण्यात आली आहे. जर तुम्ही कॅमेरा गुणवत्तेशी तडजोड करू शकत असाल तर, तुम्ही हा फोन घेऊ शकता. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या वेरिएंटमध्ये तुम्हाला Realme Narzo 30a ९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल .

वाचा : Mini Fridge: बॅचलर्स आणि विद्यार्थ्यांसाठी बेस्ट आहे ‘हा’ स्वस्त मिनी फ्रिज, शेल्फवरही सहज ठेवता येतो, किंमत खपूच कमी

Samsung Galaxy M32

samsung-galaxy-m32

Samsung Galaxy M32: Samsung Galaxy M32 मध्ये ६००० mah ची बॅटरी देण्यात आली आहे. जर तुम्ही हा फोन खरेदी करण्याचा प्लान बनवला असेल तर, हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो . Samsung Galaxy M32 च्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत १३,७५० रुपये आहे. तुम्ही फोनमध्ये 1 TB SD कार्ड देखील इन्स्टॉल करू शकता. Samsung Galaxy M32 च्या मागील बाजूस चार कॅमेरे देण्यात आले आहेत.फोनचा प्रायमरी कॅमेरा ६४ MP आहे.

वाचा : या Mini Projector सह घरीच अनुभवा थिएटरची मजा, आकार ब्लूटूथ Speaker सारखा, कमी किमतीसह खरेदीवर डिस्काउंट सुद्धा

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here