Smartphone Offers: स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. अॅमेझॉनने भारतीय युजर्ससाठी फॅब फोन सेल सुरू केला असून येथे युजर्सना Tecno’s Pop 5 LTE, Spark 8T आणि Spark 8 Pro सारखे स्मार्टफोन खरेदी करण्यावर प्रचंड सवलत मिळत आहे. त्याच वेळी, Amazon सेलमध्ये युजर्सना नुकताच लाँच करण्यात आलेला Tecno Phantom X स्मार्टफोन देखील ऑफर करत आहे. Fab Phones सेलमधून Tecno स्मार्टफोन्स खरेदी करण्यावर युजर्स ४० % पर्यंत सूट मिळवू शकतात. याशिवाय,HDFC बँकेच्या कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला आणखी १० % सूट मिळेल. या लिस्टमधील काही स्मार्टफोन्समध्ये ऑक्टा-कोर युनिसॉक SC9863A चिपसेटचा सपोर्ट मिळतो. तर, काहींना ८ MP सेल्फी कॅमेराचा सपोर्ट. याशिवाय, ५००० mAH बॅटरीचा सपोर्ट देखील या स्मार्टफोन्समध्ये आहे .स्मार्टफोन्सचे सर्व फीचर्स पाहा आणि स्वस्तात स्वतःसाठी जबरदस्त स्मार्टफोन खरेदी करा.

Tecno Spark 8T

tecno-spark-8t

Tecno Spark 8T: Tecno Spark 8T स्मार्टफोन ६.६ इंच FHD+ डिस्प्ले आणि १०८० × २४०८ पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. युजर्सना ५० MP प्रायमरी कॅमेरा आणि AI सेकंडरी कॅमेरा सोबत Tecno Spark 8T मध्ये समोर ८ MP सेल्फी कॅमेरा मिळतो. यात MediaTek Helio G35 चिपसेटच्या सपोर्टसह ४ GB रॅम आणि ६४ GB इंटर्नल स्टोरेज आहे. Tecno Spark 8T स्मार्टफोन ५००० mAh बॅटरीसह येतो. जो १० W जलद चार्जिंगद्वारे समर्थित आहे. यूजर्स फॅब फोन सेलमध्ये ८,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.

वाचा : या Mini Projector सह घरीच अनुभवा थिएटरची मजा, आकार ब्लूटूथ Speaker सारखा, कमी किमतीसह खरेदीवर डिस्काउंट सुद्धा

Tecno Phantom X

tecno-phantom-x

Tecno Phantom X स्मार्टफोन ६.७ इंच AMOLED डिस्प्ले, ९० Hz रिफ्रेश रेट आणि १०८० x २३४० पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. यूजर्सना यामध्ये MediaTek Helio G95 चिपसेटचा सपोर्ट मिळतो आणि हा फोन ८ GB रॅम आणि २५६ GB इंटरनल स्टोरेजमध्ये येतो. याशिवाय, यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी ४८ MP आणि ८ MP ड्युअल फ्रंट कॅमेरासह ५० MP + १३ P + ८ MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. त्याच वेळी, त्याची ४७०० mAH बॅटरी जलद चार्जिंगला सपोर्ट करते. Amazon च्या ऑनलाइन सेलमध्ये हा फोन २५,९९९ रुपयांना खरेदी करता येईल.

वाचा : Smartphone Safety: तुम्हीही स्मार्टफोन वापरतांना ‘या’ चुका करत असाल तर, स्मार्टफोन लवकर खराब होणार, पाहा डिटेल्स

Tecno Spark 8 Pro

tecno-spark-8-pro

Tecno Spark 8 Pro: Tecno Spark 8 Pro स्मार्टफोन ६.८ इंच IPS LCD डिस्प्ले आणि १०८० ×२४६० पिक्सेल रिझोल्युशनसह येतो. युजर्सना यात ४८ MP प्रायमरी कॅमेरा आणि २ MP कॅमेराचा ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. त्याच वेळी, समोर ८ MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. यात MediaTek Helio G85 चिपसेटच्या सपोर्टसह ६ GB रॅम आणि १२८ GB इंटर्नल स्टोरेज आहे. ५००० mAh बॅटरीचा हा Tecno Spark 8 Pro स्मार्टफोन तुम्ही Amazon Fab फेस्ट सेलमध्ये ९,६९९ रुपयांना खरेदी करू शकता .

वाचा : Dual WhatsApp Accounts: मस्तच ! कोणतेही App डाउनलोड न करता एकाच फोनमध्ये वापरा २ WhatsApp, करा ‘ही’ सेटिंग

Tecno Pop 5 LTE

tecno-pop-5-lte

Tecno Pop 5 LTE: पॉप 5 हा LTE टेक्नोचा ट्रेंडिंग स्मार्टफोन आहे. हा फोन ६.५२ इंच HD डिस्प्ले देण्यात आला आहे. Tecno Pop 5 LTE ७२० × १५६० पिक्सेल रिझोल्युशनसह येतो. यूजर्सना यात ऑक्टा-कोर युनिसॉक SC9863A चिपसेटचा सपोर्ट मिळतो आणि हा फोन २ GB रॅम आणि ३२ GB इंटरनल स्टोरेजमध्ये येतो. यात ८ MP पप्रायमरी कॅमेरा आणि २ MP कॅमेरासह ५ MP फ्रंट कॅमेरा आहे. याशिवाय, ५००० mAH बॅटरीचा सपोर्ट देखील यात आहे. हा फोन Amazon Fab Phones सेलमध्ये ६,५९९ रुपयांना उपलब्ध आहे.

वाचा : Mini Fridge: बॅचलर्स आणि विद्यार्थ्यांसाठी बेस्ट आहे ‘हा’ स्वस्त मिनी फ्रिज, शेल्फवरही सहज ठेवता येतो, किंमत खूपच कमी

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here