नवी दिल्लीः जगभरात करोना व्हायरस असल्याने सर्वकाही ठप्प झाले आहे. व्यापार मंदावल्याने अनेक कंपन्यात नोकर कपातीचे संकट आले आहे. परंतु, या काळातही अॅमेझॉनने गेल्या महिन्याभरात एक लाख लोकांना नोकरीवर ठेवले आहे. तर आणखी ७५ हजार लोकांची भरती करणार आहे. अॅमेझॉनने १३ एप्रिल रोजी एक ब्लॉग पोस्टमधून ही माहिती दिली.

वाचाः

आम्ही गेल्या महिन्याभरात एक लाख पदे भरली. तसेच अमेरिकेतील विविध जागांवर हे नवीन भरती करण्यात आलेले कर्मचारी काम करणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात लोकांना अडचणीचा सामना करावा लागू नये, यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. लोकांना व्यवस्थित सेवा देता यावी यासाठी कंपनी आणखी ७५ हजार जणांची भरती करणार असल्याची माहितीही यात देण्यात आली आहे.

वाचाः

अॅमेझॉनकडून इतक्या वेगाने कर्मचाऱ्यांची नियुक्ती अशा काळात करण्यात आली. ज्यावेळी संपूर्ण जगात आर्थिक मंदीची शक्यता आहे. करोना व्हायरसमुळे अनेक उद्योगधंदे, व्यापार बंद पडले आहेत. गेल्या तीन आठवड्यात अमेरिकेत १.६८ कोटी लोक बेरोजगार झाले आहेत. अमेरिकेत असल्याने पूर्णपणे देश बंद आहे. ज्या ठिकाणी केवळ लोक काम करू शकतात. त्या ठिकाणी नोकर कपात करण्यात आली आहे. परिस्थिती सुधारल्यानंतर त्या व्यक्तींना पुन्हा कामावर बोलावण्याची शक्यता आहे. करोना व्हायरसमुळे अनेकांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. हॉस्पिटिलिटी, रेस्टॉरेंट आणि ट्रॅव्हल यासारख्या क्षेत्रांतील लोकांच्या एक तर नोकऱ्या गेल्या आहेत किंवा हे लोक सुट्टीवर पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे अशा लोकांचे स्वागत करीत आहे. तुम्हाला वाटेल तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी काम करू शकतात, असे अॅमेझॉनने म्हटले आहे.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here