Smartphone Offers : भारतात सध्या स्मार्टफोन मार्केटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त स्मार्टफोन उपलब्ध आहेत. युजर्सच्या बजेट आणि गरजेनुसार आजकाल कंपन्या स्मार्टफोन्स लाँच करत असून यात भन्नाट फीचर्स देखील देण्यात येतात. चांगला स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी पुन्हा एक चांगली संधी आहे. Flipkart Electronics Day Sale Flipkart वर पुन्हा सुरु झाला आहे. Flipkart चा हा सेल २९ मे 2022 पर्यंत चालेल. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये स्मार्टफोनवर उत्तम ऑफर्स उपलब्ध आहेत.आज आम्ही तुम्हाला या फ्लिपकार्ट सेलमध्ये १५,००० रुपयांपर्यंतच्या किमतीत उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत. या लिस्टमध्ये Vivo T1 5G, Redmi Note 10T 5G, Realme C35, मोटोरोला जी 60, मोटोरोला e40 सारख्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोन्सवर देण्यात येत असलेल्या डिस्काउंटबद्दल सविस्तर.

Motorola E40

motorola-e40

सेलमध्ये, MOTOROLA e40 १,००० रुपयांच्या सवलतीसह ९,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. यात ४ GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज आहे. यासोबत ९,२५० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही आहे. फोनमध्ये तीन रियर कॅमेरे आह. ज्यात प्रायमरी लेन्स ४८ मेगापिक्सेल आहे. Moto E40 स्मार्टफोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी आहे. जी १० W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. फोनच्या तळाशी एक यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे. फोन एकाच चार्जवर दोन दिवसांच्या बॅटरी लाइफसह येतो. याशिवाय, २ एमपी डेप्थ सेन्सर आणि २ एमपी मायक्रो व्हिजन कॅमेरा देण्यात आला आहे.

वाचा : Budget Tabs: मस्तच ! १० हजार रुपयांपेक्षाही स्वस्त आहेत हे ४ Tablets, सॅमसंग ते Lenovo च्या बेस्ट डिव्हाइसेसचा पर्याय, पाहा लिस्ट

Realme C35

realme-c35

Realme C35 या सेलमध्ये १३,९९९ रुपयांऐवजी ११,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. या किंमतीत, ४ GB रॅमसह ६४ GB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध असेल. डिव्हाइसच्या स्टोरेजला तुम्ही मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवू शकता. फोन अँड्राइड ११ आधारित Realme UI R एडिशनवर काम करतो. यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला असून यात ५० मेगापिक्सल मुख्य लेंस, एक मॅक्रो लेंस आणि पोर्ट्रेट लेंस आहे. फ्रंटला ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. यात जलद चार्जिंगसह ५००० mAh बॅटरी देखील आहे.

वाचा : Smartphone Sale: ५० MP कॅमेरा ५००० mAh बॅटरीसह येणाऱ्या Infinix च्या ‘या’ लेटेस्ट स्मार्टफोनचा पहिला सेल आज, खरेदीवर मिळणार ऑफ

Moto G 60

moto-g-60

हा Motorola फोन १४,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. या फोनमध्ये ६ GB रॅमसह १२८ GB स्टोरेज मिळेल. या फोनची नियमित किंमत २१,९९९ रुपये आहे. यासोबत १४,२५० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही उपलब्ध आहे. या मोटोरोला फोनमध्ये तीन रियर कॅमेरे देखील आहे. ज्यात प्रायमरी लेन्स १०८ मेगापिक्सेल आहे. यात ३२ -मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. Moto G60 स्मार्टफोनमध्ये ६.८ इंच फुल एचडी+ डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी यामध्ये Qualcomm Snapdragon ७३२G ऑक्टा-कोर चिपसेटचा सपोर्ट मिळतो.

वाचा : Upcoming Smartphone: कमी किंमतीत जबरदस्त स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत Redmi , ५० MP कॅमेरासह मिळणार मजबूत प्रोसेसर

Redmi Note 10T 5G

redmi-note-10t-5g

Redmi Note 10T 5G: Redmi चा हा फोन मोठ्या ऑफर्ससह विकला जात आहे. Redmi Note 10T 5G चे ४ GB RAM आणि ६४ GB स्टोरेज व्हेरिएंट १६,९९९ रुपयांऐवजी २० टक्के सूटसह ११,९९९ रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. एक्सचेंज ऑफर म्हणून, Redmi Note 10T 5G स्मार्टफोनच्या खरेदीवर जुना किंवा सध्याचा फोन एक्सचेंज करून ११,२५० रुपयांपर्यंतची बचत केली जाऊ शकते. तुम्हाला रेडमीचे स्मार्टफोन्स आवडत असतील तर Redmi Note 10T 5G हा तुमच्यासाठी स्वस्तात मस्त एक चांगला पर्याय ठरू शकतो.

वाचा: iPhone Offers: अर्ध्या किमतीत iPhone 12 आणि iPhone 13 होणार तुमचा, या साईटवरून करा खरेदी, पाहा डील

Vivo T1 5G

vivo-t1-5g

Vivo T1 5G: Vivo चा हा नवीन फोन २० टक्क्यांपर्यंत डिस्काउंटसह खरेदी करता येईल. सेलमध्ये ४ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेजसह Vivo T1 5G व्हेरिएंट १५,९९० रुपयांना खरेदी करता येईल. यासोबत १५,२५० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही उपलब्ध आहे, म्हणजेच तुमच्या जुन्या फोनची किंमत एक्सचेंज ऑफरमध्ये सर्वोत्तम असल्याचे आढळल्यास, हा फोन फक्त ७४० रुपयांमध्ये तुमचा असू शकतो. HDFC बँक क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डसह १००० रुपयांची त्वरित सूट देखील Vivo T1 5G वर देण्यात येत आहे.

वाचा : Inverter: लाईट नसतांना विजेशिवाय चालतील फॅन-लॅपटॉप-कूलर, घरी आणा ‘हे’ खास सोलर इन्व्हर्टर, किंमत नाही जास्त, पाहा डिटेल्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here