नवी दिल्लीः भारत सरकारने करोना व्हायरसच्या संसर्ग झालेल्या व्यक्तींना ट्रॅक करण्यासाठी लाँच केलेल्या आरोग्य सेतू अॅपला काही दिवसांपूर्वीच लाँच केले होते. या अॅपने आता एक नवा रेकॉर्ड बनवला आहे. अवघ्या १३ दिवसात आरोग्य सेतू मोबाइल अॅपला देशातील ५ कोटी युजर्संनी डाऊनलोड केले आहे. त्यामुळे या अॅपचा आता जगात सर्वाधिक डाऊनलोड होणाऱ्या अॅपमध्ये समावेश झाला आहे. आरोग्य सेतू अॅपने नवा रेकॉर्ड केल्याची माहिती नीती आयोगाने आपल्या एका रिपोर्टमधून दिली आहे.

वाचाः

नीती आयोगाच्या एका रिपोर्टच्या माहितीनुसार, आरोग्य सेतू मोबाइल अॅपला अघव्या १३ दिवसात ५० मिलियन म्हणजे ५ कोटी लोकांनी डाऊनलोड केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना हे अॅप डाऊनलोड करा असे आवाहन केले होते. मोदींच्या या आवाहनानंतर अवघ्या २४ तासात ११ मिलियन लोकांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे.

पोकेमन गो अॅपचा रेकॉर्ड मोडला

आरोग्य सेतू मोबाइल अॅपने पोकेमॉन गो गेमिंग अॅपचा रेकॉर्ड मोडला आहे. २०१६ साली पोकेमॉन गो गेमिंग अॅपला १९ दिवसांत ५० मिलियन म्हणजेच ५ कोटी लोकांनी डाऊनलोड केले होते.

वाचाः

आरोग्य सेतूचा असा वापर करा

>> आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्यासाठी फोन नंबरची नोंदणी करा. फोन नंबर टाकल्यानंतर एक ओटीपी येईल. ते एन्टर केल्यानंतर अॅपची नोंदणी होईल.

>> त्यानंतर हे अॅप ब्लूटूथ आणि जीपीएसचे अॅक्सिस मागेल.

>> अॅप उघडल्यानंतर पर्सनल माहिती विचारली जाईल. ज्यात लिंग, नाव, वय, व्यवसाय आणि ३० दिवसांचा प्रवासाची माहिती विचारली जाईल. तुम्ही हे पर्याय स्कीप करू शकतात.

>> त्यानंतर भाषा निवडू शकतात. संकटाच्या या काळात स्वतः कार्यकर्ता म्हणून नोंदणी करू शकतात.

>> आरोग्य सेतू अॅप हे एक सोशल ग्राफचा वापर करतो. ज्यात हाय रिस्कची एक गट माहिती पडतो. सोशल ग्राफ लोकेशनची माहिती या आधारावर बनवली जावू शकते. ज्यावेळी तुम्ही हाय रिस्कच्या गटात आले तर तुम्हाला अलर्ट मिळेल. हाय रिस्क गटात आल्यानंतर अॅप टेस्ट सेंटरला जाण्यासाठी सूचना करेल.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here