Rule Change June 2022: दरवर्षी अनेक महत्त्वाच्या नियमात बदल होत असतात. तसेच, काही गोष्टी बंद होतात, तर काही गोष्टी यूजर्सच्या सुविधेसाठी सुरू केले जातात. अशाच काही मोठे बदल १ जून २०२२ पासून पाहायला मिळणार आहेत. यातील बदल प्रामुख्य टेक्नोलॉजी जगताशी संबंधित आहेत. याचा परिणाम आपल्या दैनंदिन आयुष्यावर देखील पडणार आहे. त्यामुळे या बदलांबाबत माहिती करून घेणे गरजेचे आहे. १ जूनपासून ४ मोठे बदल होणार आहेत. Google सह काही सर्विस कायमच्या बंद होणार आहेत. एकेकाळी लोकप्रिय असलेले Internet Explorer ब्राउजर देखील जून महिन्यात कायमचे बंद होणार आहे. याशिवाय, Amazon आणि Apple देखील विशिष्ट सेवा बंद करणार आहेत. एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात देखील बदल होणार आहेत. नागरिकांना कार्डलेस सुविधेचा फायदा मिळणार आहे. १ जूनपासून होणाऱ्या या ४ बदलांबाबत सविस्तर जाणून घेऊया.

​बंद होणार Internet Explorer

-internet-explorer

एकेकाळी लोकप्रिय ब्राउजर असलेल्या Internet Explorer चा आता फारसा वापर होताना दिसत नाही. या ब्राउजरची लोकप्रियता कमी झाल्याने कंपनीने Internet Explorer ला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ जूननंतर इंटरनेट एक्स्प्लोररला कायमचे बंद केले जाईल. सध्या Google Chrome, Microsoft Edge आणि Mozilla Firefox सारख्या नवीन ब्राउजरचा वापर केला जात आहे. मात्र, जे लोक अद्याप Internet Explorer वर निर्भर होते, त्यांना मात्र समस्येचा सामना करावा लागेल.

वाचा: Redmi 11 5G : धुमाकूळ घालायला येतोय Redmi चा स्वस्त स्मार्टफोन, फीचर्स जबरदस्त; किंमत असेल फक्त १३,९९९ रुपये

​Amazon वरून ई-बुक्स खरेदी करता येणार नाही

amazon-

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वरून अनेक वेगवेगळ्या वस्तू खरेदी करता येतात. Amazon वरून पुस्तकांची देखील मोठी विक्री केली जाते. परंतु, १ जून २०२२ पासून या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून ग्राहकांना ई-बुक्स खरेदी करता येणार नाही. पुढील महिन्यापासून अँड्राइड अ‍ॅप यूजर्स Amazon वरून ई-बुक्स खरेदी करू शकणार नाहीत. याचे कारण नवीन गुगल प्ले स्टोर पॉलिसी (Google Play Store Policy) आहे. तसेच, Amazon ने अ‍ॅपल अ‍ॅप स्टोर बिलिंग धोरणांनुसार २०११ मध्ये आयओएस डिव्हाइसवरून डिजिटल बुक बायिंग सपोर्ट हटवला होता.

वाचा: iPhone 13 : धमाकेदार ऑफर! फ्लिपकार्टवर खूपच स्वस्तात मिळत आहे आयफोनचे ‘हे’ टॉप मॉडेल; जाणून घ्या किंमत

​अ‍ॅपल बंद करत आहे कार्डचा वापर

Apple देखील १ जून २०२२ पासून आपल्या काही नियमांमध्ये बदल करत आहे. आता यूजर्सला १ जूनपासून भारतात Apple आयडीचा वापर करून सबस्क्रिप्शन आणि अ‍ॅप खरेदी करण्यासाठी कार्डचा वापर करता येणार नाही. म्हणजेच, भारतीय ग्राहक क्रेडिट व डेबिट कार्डचा उपयोग करून अ‍ॅप स्टोरवरून अ‍ॅप खरेदी करू शकणार नाही. सोबतच, आयक्लाउड+ आणि अ‍ॅपल म्यूझिक सारखे अ‍ॅपल सबस्क्रिप्शन कार्डने पेमेंट करता येणार नाही.

​मोबाइलने काढता येईल एटीएममधून पैसे

आता नागरिकांना एटीएममधून कार्डशिवाय पैसे काढता येणार आहेत. आरबीआयने यासाठी नवीन नियम जारी केला आहे. १ जून २०२२ पासून मोबाइलच्या मदतीने एटीएममधून रोख रक्कम काढता येईल. या प्रक्रियेमध्ये यूजर्स विना डेबिट आणि क्रेडिट कार्डचे एटीएममधून पैसे काढू शकतात. केवळ स्मार्टफोनचा वापर करून एटीएममधून पैसे काढणे शक्य होईल. यामुळे कार्डद्वारे होणारी फसवणूक रोखण्यास मदत होईल. ही सुविधा देशभरातील एटीएममध्ये उपलब्ध असेल.

वाचा: Infinix Hot 12 Play: ७ जीबी रॅमसह येणाऱ्या ‘या’ फोनचा आज पहिला सेल, किंमत फक्त ८,४९९ रुपये; फीचर्स जबरदस्त

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here