Best Selling Products: आजकाल लोक देखील ऑफ लाईन शॉपिंग पेक्षा ऑनलाईन वस्तु खरेदी करणे अधिक पसंत करत आहेत. ऑनलाईन साईटसवर मिळणाऱ्या ऑफर्स आणि डिस्काउंटमुळे देखील ऑनलाईन शॉपिंगचा कल गेल्या काही काळात वाढला आहे. तुम्ही Online वस्तू खरेदी करत असाल तर, एक गोष्टीकडे तुमचे लक्ष गेले असेल. ती गोष्ट म्हणजे, ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon वर, तुम्हाला अनेक उत्पादनांसोबत बेस्ट सेलिंगचा टॅग लिहिलेला दिसतो. सर्वोत्तम विक्री होणारे उत्पादन असण्याचा अर्थ असा की, ते value for money आहे आणि ग्राहकांमध्ये चांगली मागणी आहे. आम्ही अशा ५ गॅजेट्सची यादी घेऊन आलो आहो. जे Amazon वर मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जात आहेत. यामध्ये स्मार्टफोनपासून ते इअरफोन्स पर्यंतचा समावेश आहे. या लिस्टवर एक नजर टाका आणि तुम्हाला कोणते खरेदी करायचे आहे ते ठरवा.

Noise ColorFit Pulse Smartwatch

noise-colorfit-pulse-smartwatch

Noise ColorFit Pulse पाचव्या क्रमांकावर असलेल्या नॉईज स्मार्टवॉचची किंमत १,९९९ रुपये आहे. स्मार्टवॉच १० दिवसांची बॅटरी लाइफ, ६० +Watch Faces , १.४ ” फुल टच एचडी डिस्प्ले, IP68 वॉटरप्रूफ रेटिंग, २४*७ हार्ट रेट मॉनिटरिंग आणि Spo2 वैशिष्ट्यांसह येते. यात पुरुष आणि महिलांसाठी स्लीप मॉनिटरिंग देखील मिळते.

ऍपल पॉवर अडॅप्टर: यादीतील चौथे गॅझेट Apple चे स्मार्टफोन पॉवर अॅडॉप्टर आहे. ज्याची किंमत १,८९९ रुपये आहे. हे USB Type-C पोर्ट आणि २० W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. याद्वारे तुम्ही सर्व प्रकारचे iPhone, iPad आणि AirPods चार्ज करू शकता.

वाचा : Inverter Bulbs: हे वॉटरप्रूफ Inverter LED Bulb आहे भन्नाट,फीचर्स जबरदस्त, किंमतही कमी

Mi Power Bank 3i

mi-power-bank-3i

Mi Power 3i: ही २०,००० mAh क्षमतेची पॉवर बँक आहे. ज्याची किंमत १,८९९ रुपये आहे. हे १८ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात आउटपुटसाठी तीन आणि इनपुटसाठी दोन पोर्ट आहेत. हे Deivce ६ ते ९ तासात पूर्ण चार्ज होते. यात पॉवर डिलिव्हर आणि १२ लेअर्स चीप प्रोटेक्शन सपोर्ट मिळेल. या पॉवर बँकचे डिझाइन कॉम्पॅक्ट आहे. यात टाइप-सी आणि मायक्रो यूएसबी पोर्ट दिला आहे. याचा चार्जिंग टाइम ६.९ तास आहे. पॉवरबँकमध्ये २०, ००० एमएएचची बॅटरी दिली असून, डिव्हाइसचे वजन ४३४ ग्रॅम आहे.

वाचा: Mera Ration App: रेशन कार्डची सर्व माहिती देतेय हे अॅप, पाहा डिटेल्स

Redmi 9A Sport

redmi-9a-sport

Redmi 9A स्पोर्ट: या Redmi स्मार्टफोनची किंमत फक्त ६,९९९ रुपये आहे. फोन ३२ GB स्टोरेजसह २ GB RAM, ६.५३ -इंच HD+ डिस्प्ले, १३ MP रिअर कॅमेरा, ५ MP फ्रंट कॅमेरा,५००० mAh बॅटरी आणि १० W वायर्ड चार्जिंगसह पॅक करतो. Redmi 9 Sport फोनमध्ये जाड बेझल देण्यात आले आहेत. या फोनचे स्टोरेज ३२ GB पर्यंत आहे. ज्यामध्ये तुम्हाला ५१२ GB पर्यंत microSD कार्ड सपोर्ट मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी, यात ३.५ mm ऑडिओ जॅक, 4G LTE, वाय-फाय आणि मायक्रो-USB पोर्ट समाविष्ट आहे.

वाचा : Active Noise Cancellation सह येणारे हे टॉप ईयरफोन्स प्रत्येक युजर्सना आवडणारच, पाहा लिस्ट आणि किंमत

Oneplus bulltes Z2

oneplus-bulltes-z2

Oneplus बुलेट्स Z2: सर्वाधिक विक्री होणाऱ्या गॅजेट्सच्या लिस्टमध्ये Oneplus बुलेट्स Z2 पहिल्या क्रमांकावर असून या वायरलेस इअरफोनची किंमत १,९९९ रुपये आहे. उत्तम आवाजासाठी यामध्ये १२.४ mm ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. यात ३० तासांचा बॅटरी बॅकअप मिळतो आणि कंपनीच्या मते, १० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये Oneplus बुलेट्स Z2 २० तास चालेल. हे सेफ फिटसाठी अँगल्ड इन-इयर स्टाइल डिझाइनसह येतात. बॉक्समध्ये इंटरचेंजेबल इयर टिप्स देखील मिळतात. Oneplus बुलेट्स Z2 नेकबँड सिलिकॉन मटेरियलद्वारे बनलेले आहेत.

वाचा : Aadhar Sharing: सावधान ! आधार शेयरिंग नाही सेफ , Masked आधारचा वापरच सुरक्षित, असे करा डाउनलोड

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here