Best flagship Smartphone 2022: भारतीय बाजारात अनेक कंपन्या आपल्या स्मार्टफोन्सला सादर करत आहेत. अगदी १० हजारांच्या बजेटपासून ते १ लाख रुपयांपर्यंतचे फोन्स बाजारात उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे कंपन्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सला देखील सातत्याने सादर करत आहेत. भारतीय ग्राहकांकडून महागड्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सला मोठी पसंती दिली जात आहे. Apple आणि Samsung हे प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटमधील लोकप्रिय ब्रँड्स मानले जातात. परंतु, Xiaomi, Vivo सारख्या इतर कंपन्या देखील फ्लॅगशिप डिव्हाइसला सादर करत आहेत. फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या किंमती देखील जास्त असतात. तुम्ही ५० हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणारे प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात काही चांगले पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही या बजेटमध्ये Vivo X80, OnePlus 9RT, Xiaomi 11T Pro, Samsung Galaxy S21 FE आणि Apple iPhone 12 सारखे फोन्स खरेदी करू शकता. या फोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Vivo X80

vivo-x80

Vivo X80 हा ४nm मीडियाटेक डायमेंसिटी ९००० प्रोसेसरसह येणारा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे. यात ६.७ इंच १२० हर्ट्ज एमोलेड डिस्प्ले, ८० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट, रियरला ५० मेगापिक्सल Sony IMX८६६ मुख्य कॅमेरा, १२MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि २MP पोर्ट्रेट सेंसर दिला आहे. या फोनची सुरुवाती किंमत ५४,९९९ रुपये आहे. मात्र, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला ५० हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता.

वाचा: Active Noise Cancellation सह येणारे हे टॉप ईयरफोन्स प्रत्येक युजर्सना आवडणारच, पाहा लिस्ट आणि किंमत

​OnePlus 9RT

oneplus-9rt

OnePlus 9RT स्मार्टफोनला काही महिन्यांपूर्वीच कंपनीने लाँच केले आहे. या फोनच्या ८ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत ४२,९९९ रुपये आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. यात १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्टसह येणारा एमोलेड डिस्प्ले दिला आहे. फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. तर OnePlus 9RT स्मार्टफोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची बॅटरी दिली आहे. हा फोन दमदार फीचर्ससह येतो.

​Xiaomi 11T Pro

xiaomi-11t-pro

Xiaomi 11T Pro हा वॅल्यू फॉर मनी फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. फोनच्या बेस मॉडेलची सुरुवाती किंमत ३९,९९९ रुपये आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. शाओमीच्या या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी १०८ मेगापिक्सल मुख्य कॅमेऱ्यासह ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ६.६७ इंच एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. पॉवर बॅकअपसाठी १२० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे.

वाचा: Mera Ration App: रेशन कार्डची सर्व माहिती देतेय हे अॅप, पाहा डिटेल्स

​Samsung Galaxy S21 FE

samsung-galaxy-s21-fe

Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन या वर्षाच्या सुरुवातीला Exynos २१०० SoC सह भारतात लाँच झाला आहे. फोनमध्ये १२ मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. वॉटर रेसिस्टेंटसाठी आयपी६७ रेटिंग मिळाले आहे. फोन ६.४ इंच १२० हर्ट्ज एमोलेड डिस्प्ले, २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचच बॅटरीसोबत येतो. यात १५ वॉट वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळेल. या फोनला सध्या तुम्ही ऑफर्ससह जवळपास ४५ हजार रुपयात खरेदी करू शकता.

​Apple iPhone 12

apple-iphone-12

तुम्ही जर आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी आहे. वेगवेगळ्या ई-कॉमर्स साइट्सवर Apple iPhone 12 जवळपास ५० हजार रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध आहे. iPhone 13 सीरिज लाँच झाल्यानंतर iPhone 12 च्या किंमतीत मोठी कपात झाली आहे. यामध्ये ए१४ बायोनिक चिप, ६.१ इंच ओलेड डिस्प्ले आणि १२ मेगापिक्सलचा ड्यूल कॅमेरा सेटअप दिला आहे. Apple iPhone 12 ला तुम्ही खूपच कमी किंमतीत खरेदी करू शकता.

वाचा: Best Plans: Jio च्या ‘या’ प्लान्समध्ये Netflix, Prime Video, Disney+ Hotstar चा आनंद घ्या फ्रीमध्ये, सोबत १५० GB पर्यंत डेटा सुद्धा

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here