Smartphones Under 20,000: भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये प्रत्येक बजेट रेंजसाठी स्मार्टफोन आहेत. जेणेकरून प्रत्येकजण ते खरेदी करू शकेल. जर आपण सर्वाधिक विकल्या जाणार्‍या स्मार्टफोन्सबद्दल बोललो, तर २०,००० पेक्षा कमी किमतीचे स्मार्टफोन सर्वात जास्त खरेदी केले जातात आणि त्यातील फीचर्स देखील खूप चांगले आहेत. ग्राहक त्यांच्या बजेट आणि गरजेनुसार स्मार्टफोन खरेदी करू शकतात. सध्या स्मार्टफोन मार्केटमध्ये स्पर्धा आणि किंमतीतील कपात यामुळे तुम्हाला २० हजार रुपयांच्या श्रेणीत चांगला प्रोसेसर आणि उत्तम कॅमेरा दर्जाचा फोन मिळू शकतो. जर तुम्हालाही या रेंजमध्ये स्मार्टफोन खरेदी करायचे असतील, तर आम्ही बाजारात २०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत. या लिस्टमध्ये Realme 8s 5G, Moto G71, Xiaomi Redmi Note 11S , OnePlus Nord CE 2 Lite 5G सारख्या जबरदस्त स्मार्टफोन्सचा समावेश आहे.पाहा संपूर्ण लिस्ट

​Moto G71

moto-g71

फोनमध्ये ६.४ इंचाचा फुलएचडी एमोलेड डिस्प्ले आहे. फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाले तर, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याच्या मागील बाजूस, क्वाड पिक्सेल तंत्रज्ञानासह ५०-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, ८-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड प्लस डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. यासोबतच, फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.फोनला पॉवर देण्यासाठी यात ५००० mAH बॅटरी आहे. जी ३३ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. फ्लिपकार्टवर Motorola Moto G71 (6GB RAM, 128GB) – Arctic ची किंमत १७,९९९ रुपये आहे.

वाचा :WhatsApp Cashback: ‘या’ युजर्सना WhatsApp देत आहे कॅशबॅक, करावे लागेल हे काम, पाहा डिटेल्स

Realme 8s 5G

realme-8s-5g

Realme 8s 5G स्मार्टफोनमध्ये ६.५ -इंचाचा FHD+ फुल स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे.फोन ९०.५ टक्के स्क्रीन टू बॉडी रेशो आणि ६०० nits पीक ब्राइटनेससह येईल. Dimensity 810 5G प्रोसेसर असलेला हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. हे डिव्हाइस ६ nm प्रक्रियेसह येईल. Realme 8s 5G स्मार्टफोनमध्ये शक्तिशाली GPU ARM Mali-G57 वापरण्यात आला आहे. फोनमध्ये ६४ MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, पोर्ट्रेट मोड आणि मॅक्रो लेन्सचा सपोर्ट देण्यात आहे. Realme 8s 5G (६ GB RAM, १२८ GB) ची किंमत फ्लिपकार्टवर १७,९९९ रुपये आहे.

वाचा : Best Plans: Jio च्या ‘या’ प्लान्समध्ये Netflix, Prime Video, Disney+ Hotstar चा आनंद घ्या फ्रीमध्ये, सोबत १५० GB पर्यंत डेटा सुद्धा

​Xiaomi Redmi Note 11S

xiaomi-redmi-note-11s

Xiaomi Redmi Note 11S 90Hz रिफ्रेश रेटसह ६.४ इंच FHD+ AMOLED डिस्प्लेसह येतो. यामध्ये ५००० mAh बॅटरी देखील आहे. जी ३३ W प्रो फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते. Redmi Note 11S च्या मागील बाजूस १०८ MP प्रायमरी सेन्सर, ८ MP अल्ट्रा-वाइड-एंगल सेन्सर, २ MP मॅक्रो सेन्सर आणि २ MP डेप्थ सेन्सरसह क्वाड-कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी समोर १३ MP सेन्सर आहे. Redmi Note 11S तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे – पहिला ६ GB+ ६४ GB १६,४९९ रुपयांमध्ये, दुसरा ६ GB+ १२८ GB १७,४९९ रुपयांमध्ये आणि तिसरा ८ GB+१२८ GB १८,४९९ रुपयांमध्ये मिळतो.

वाचा : Aadhar Sharing: सावधान ! आधार शेयरिंग नाही सेफ , Masked आधारचा वापरच सुरक्षित, असे करा डाउनलोड

​Samsung Galaxy M33 5G

samsung-galaxy-m33-5g

Samsung Galaxy M33 5G: M33 5G ६.६ -इंचाचा FHD+ Infinity-V डिस्प्ले १२० Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह उपलब्ध आहे. हे गोरिल्ला ग्लास ५ द्वारे संरक्षित आहे. डिव्हाइस ५ nm ऑक्टा-कोर Exynos प्रोसेसरद्वारे सपोर्टेड आहे. डिव्हाइस ८ GB पर्यंत RAM आणि १२८ GB इंटर्नल स्टोरेजसह येते. सॅमसंग इनबिल्ट स्टोरेज वापरून व्हर्च्युअल रॅम १६ GB पर्यंत वाढवण्याची परवानगी देतो. कमी किमतीत येणारा हा एक चांगला स्मार्टफोन आहे. फोन बेस व्हेरिएंट ६ GB+ १२८ GB सह येतो. तर, टॉप व्हेरिएंट ८ GB+१२८ GB सह येतो, ज्याची किंमत १८,९९९ रुपये आणि २०,४९९ रुपये आहे.

वाचा : Inverter Bulbs: हे वॉटरप्रूफ Inverter LED Bulb आहे भन्नाट,फीचर्स जबरदस्त, किंमतही कमी

One plus Nord CE 2 lite 5G

one-plus-nord-ce-2-lite-5g

OnePlus Nord CE 2 Lite 5G हा एक शक्तिशाली स्मार्टफोन आहे. जो १२० Hz रिफ्रेश रेटसह ६.५९ -इंचाचा FHD+ डिस्प्ले पॅक करतो . Nord CE 2 Lite स्नॅपड्रॅगन 695 5G चिपसेटद्वारे समर्थित आहे. प्रोसेसर Adreno 619 GPU सह 8GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि १२८ GB स्टोरेजसह जोडलेला आहे. CE 2 Lite मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. जो २ MP डेप्थ-सिस्ट कॅमेरा ६४ MP प्रायमरी लेन्ससह जोडलेला आहे. स्मार्टफोनमध्ये ५००० mAh बॅटरी आहे. जी, ३३ W SUPERVOOC चार्जिंग तंत्रज्ञानाला सपोर्ट करते. ६ GB + 1१२८ GB ची किंमत १९,९९९ रुपये आणि ८ GB + १२८ GB ची किंमत २१,९९९ रुपये आहे.

वाचा : Active Noise Cancellation सह येणारे हे टॉप ईयरफोन्स प्रत्येक युजर्सना आवडणारच, पाहा लिस्ट आणि किंमत

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here