Best 55-inch TV: जुन्या डब्बा टीव्हींची जागा आता स्मार्ट टीव्हींनी घेतली आहे. बाजारात अगदी कमी किंमतीत येणारे स्मार्ट टीव्ही उपलब्ध असल्याने ग्राहक देखील नियमित टीव्हीच्या तुलनेत यांना प्राधान्य देतात. कमी किंमतीत अगदी मोठ्या स्क्रीनसह येणारे स्मार्ट टीव्ही तुम्ही खरेदी करू शकता. मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीवर तुम्हाला अगदी घरीच थिएटरचा अनुभव मिळेल. सध्या थिएटरमध्ये जावून चित्रपट पाहण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे. अशा स्थितीमध्ये तुम्ही घरबसल्याच स्मार्ट टीव्हीवर चित्रपट आणि सीरिजचा आनंद घेऊ शकता. बाजारात ४३ इंच, ५५ इंच स्क्रीनसह येणारे चांगले स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहे. या टीव्हींना तुम्ही स्मार्टफोन देखील सहज कनेक्ट करू शकता. तुम्ही जर ब्रँडेड टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Xiaomi, LG, Sony चे चांगले पर्याय उपलब्ध आहेत. या कंपन्यांच्या टीव्हीविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Xiaomi 55 inch Smart TV

xiaomi-55-inch-smart-tv

Xiaomi चा ५५ इंच स्मार्ट टीव्ही दमदार फीचरसह येतो. यात ३२ जीबी स्टोरेज दिले आहे. यामध्ये ६० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारे ४के रिझॉल्यूशन ओलेड डिस्प्ले, बिल्ट-इन वाय फाय, कनेक्टिव्हिटीसाठी ३ एचडीएमआय पोर्ट दिले आहे. याद्वारे तुम्ही गेमिंग कंसोल, सेटटॉप बॉक्स आणि ब्लू रे प्लेअरला कनेक्ट करू शकता. याशिवाय, २ यूएसबी पोर्टची सुविधा मिळते. यात ३० वॉट साउंड आउटपूट, ८ स्पीकर सेटअप, डॉल्बी एटमॉस आणि डीटीएस-एक्स दिले आहे. वेगवेगळ्या अ‍ॅप्स सपोर्टसह येणाऱ्या या टीव्हीची किंमत ८९,९९९ रुपये आहे.

वाचा: Flipkart Sale: लवकरच सुरू होतोय ‘हा’ धमाकेदार सेल; टीव्ही, फ्रिजवर ७० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट, पाहा डिटेल्स

​LG 55 inch Smart TV

lg-55-inch-smart-tv

LG चे हे मॉडेल स्लिम डिझाइनसह येते. यात ५५ इंच ४के अल्ट्रा एचडी डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ३८४०x२१६० पिक्सल आहे. यात कनेक्टिव्हिटीसाठी ४ 4 HDMI पोर्ट, 3 USB पोर्ट दिले आहेत. यात साउंडसाटी ४० वॉट आउटपूट, २.२ Ch स्पीकर, Dolby Atmos, OLED सराउंड,AI साउंड प्रो आणि AI एकॉस्टिक ट्यूनिंग मिळते. यात ४K OLED, सेल्फ-लाइट पिक्सल, आय कम्फर्ट डिस्प्ले, Dolby Vision IQ आणि Atmos सारखे फीचर्स मिळतात. याशिवाय, AI ThinQ, बिल्ट-इन Google असिस्टेंट आणि Alexa, Apple Airplay 2 आणि होमकिट, होम डॅशबोर्ड व अनलिमिटेड OTT अ‍ॅप सपोर्ट दिला आहे. या टीव्हीची किंमत १,१६,५९० रुपये आहे.

वाचा: Smartphone Offers: बेस्टच ! एका क्लिकवर मिळवा One Plus च्या ‘या’ पॉप्युलर 5G स्मार्टफोनवर २ हजारांचा डिस्काउंट, पाहा डील

​Sony 55 inch Smart TV

sony-55-inch-smart-tv

Sony चा हा टीव्ही ५५ इंच ४के रिझॉल्यूशन, १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट डिस्प्लेसह येतो. यात ४K HDR, ४K १२०,XR OLED कंट्रास्ट बूस्टर, XR Triluminos pro आणि XR मोशन क्लॅरिटी मिळते. तसेच, Dolby Atmos सह ३० वॉट साउंड आउटपूट दिले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ४ HDMI पोर्ट आणि ३ USB पोर्ट मिळतात. यात Google TV, हँड्स फ़्री वॉइस सर्च, Google Play, Chromecast, नेटफ्लिक्स, व्हॅरिएबल रिफ्रेश रेट आणि ऑटो लो लेटेंसी मोड सारखे फीचर्स मिळतात. या टीव्हीची किंमत १६१,२९० रुपये आहे.

​Vu Premium 55 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV

vu-premium-55-inch-ultra-hd-4k-led-smart-android-tv

Vu च्या ५५ इंच Ultra HD (4K) LED Smart Android TV ला देखील खूपच कमी किंमतीत खरेदी करू शकता. यामध्ये ६० हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि ३८४०x२१६० पिक्सल रिझॉल्यूशन सपोर्टसह येणारा ५५ इंच डिस्प्ले दिला आहे. यात गुगल असिस्टेंट आणि क्रोमकास्ट इन-बिल्टचा सपोर्ट मिळतो. यात नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिस्नी + हॉटस्टार, यूट्यूबसारखे अ‍ॅप्स देखील मिळतात. Vu च्या या टीव्हीची मूळ किंमत ७५ हजार रुपये आहे. परंतु, डिस्काउंटसह फक्त ३६,९९९ रुपयात खरेदी करू शकता.

वाचा: Smart Tv Offers: बॉस ऑफर ! ५५ इंचाचा स्मार्ट टीव्ही २६ हजारात न्या घरी, TV ची मूळ किंमत ७५,००० रुपये, पाहा डिटेल्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here