बनावट स्कीमबाबत मेसेज

इंस्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp वर आपण दिवसभर असंख्य मेसेज इतरांन पाठवत असतो. यातील काही मेसेज हे वेगवेगळ्या स्कीमबाबत देखील असतात. मात्र, बनावट जाहिरात, योजनांचे मेसेज पाठवताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. WhatsApp वर पैसे कमवण्यासंदर्भात वेगवेगळे मेसेज येत असतात. तसेच, २१ दिवसात पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवणारे मेसेज देखील येतात. अशा मेसेजला चुकूनही फॉरवर्ड करू नये. अन्यथा तुमचे अकाउंट ब्लॉक होऊ शकते. तसेच, फसवणुकीसाठी जेल देखील होईल.
वाचा – WhatsApp : व्हॉट्सअॅपचा भारतीय यूजर्सला मोठा झटका, बॅन केले तब्बल १६ लाख अकाउंट्स; ‘हे’ आहे कारण
बनावट अकाउंट बनवू नका

इंस्टंट मेसेजिंग अॅपवर तुम्ही मोबाइल नंबर वापरूनच अकाउंट क्रिएट करू शकता. इतरांना मेसेज केल्यावर तुमचा मोबाइल नंबर इतरांना समजतो. मात्र, अनेकजण बनावट अकाउंट बनवून इतरांना त्रास देत असतात. बनावट अकाउंटच्या मदतीने इतरांना सातत्याने मेसेज केले जातात, त्रास दिला जातो. त्यामुळे बनावट WhatsApp Account कधीही बनवू नये. फेक अकाउंटला वैतागलेले इतर यूजर्स तक्रार करू शकतात. एखाद्या व्यक्तीने तुमच्या फेक अकाउंटविरोधात तक्रार केल्यास जेल देखील होऊ शकते.
WhatsApp हॅक करण्याचा प्रयत्न करू नका

WhatsApp हे सर्वात सुरक्षित मेसेजिंग प्लॅटफॉर्म समजले जातात. यावरील मेसेज देखील एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतात. म्हणजेच इतर कोणालाही मेसेजबाबत समजत नाही. काहीजण WhatsApp हॅक करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अशी चूक कधीही करू नये. WhatsApp हॅक करण्याचा प्रयत्न हा गुन्हा मानला जातो. यासाठी कंपनी तुमच्याविरोधात लीगल नोटीस देखील पाठवू शकते. त्यामुळे WhatsApp ला हॅक करण्याचा अथवा बनावट अकाउंट तयार करण्याचा प्रयत्न कधीही करू नये.
हिंसक मेसेज फॉरवर्ड करू नका

इंस्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp चा वापर करताना कोणतीही पडताळणी न करताना मेसेजला फॉरवर्ड करू नये. फेक मेसेज फॉरवर्ड केल्यास तुमच्याविरोधात कारवाई केली जाऊ शकते. तसेच, धर्म व पुजा स्थळांना नुकसान पोहचवण्यासंदर्भातील मेसेज देखील व्हॉट्सअॅपवरून पाठवू नये. हिंसेला प्रोत्साहन देणारे मेसेज फॉरवर्ड केल्यास तुमच्याविरोधात कारवाई केली जाऊ शकते. याशिवाय, तुम्हाला जेल देखील होईल. त्यामुळे मेसेजिंग अॅपवर कोणताही मेसेज फॉरवर्ड करताना त्याची पडताळणी नक्की करा.
आक्षेपार्ह कंटेट शेअर करू नये

WhatsApp चा वापर करताना एक चुकीचा मेसेज तुम्हाला महागात पडू शकतो. WhatsApp वर आपण अनेक ग्रुपशी जोडलेले असतो. अशा ग्रुपवर किंवा एखाद्या व्यक्तीला अश्लील कंटेंट शेअर करू नये. जर एखाद्या व्यक्तीने तुमच्याविरोधात तक्रार केल्यास तुम्हाला जेलची वारी घडू शकते. बनावट फोटो, हिंसेला प्रोत्साहन देणारे फोटो, धार्मिक भावना दुखावतील असा कंटेंट कधीही शेअर करू नये. अन्यथा तुमच्याविरोधात कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे WhatsApp वापरताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times