Smartwatch under Rs 1000: स्मार्टवॉच आणि स्मार्टबँडचा वापर गेल्या काही दिवसात वाढला आहे. अगदी तरूणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांकडूनच नियमित घड्याळाच्या तुलनेत स्मार्टवॉचला पसंती दिली जात आहे. बाजारात अगदी कमी किंमतीत येणारे शानदार स्मार्टवॉच आणि स्मार्टबँड उपलब्ध आहे. तुम्ही जर इतरांना गिफ्ट देण्यासाठी स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाल बाजारात एकापेक्षा एक शानदार पर्याय मिळतील. विशेष म्हणजे तुम्ही १ हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणारे साथ Smart Watch आणि Smart Band देखील गिफ्ट देऊ शकता. यामध्ये तुम्हाला स्पोर्ट्स मोड, हेल्थ फीचर्सचा देखील सपोर्ट मिळेल. १ हजार रुपयांच्या बजेटमध्ये बाजारात Mi Smart Watch ID-116, Mobimint Smart Watch D20, Marvik स्मार्टवॉच, M4 Intelligence ब्लूटूथ स्मार्ट बँड आणि Melbon M6 स्मार्ट बँडला खरेदी करू शकता. या डिव्हाइसविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Mi Smart Watch ID-116 ब्लूटूथ स्मार्टवॉच

mi-smart-watch-id-116-

Mi Smart Watch ID-116 ब्लूटूथ स्मार्टवॉचची मूळ किंमत १,४९९ रुपये आहे. मात्र, ई-कॉमर्स साइट Amazon वर 60 टक्के डिस्काउंटनंतर फक्त ५९९ रुपयात उपलब्ध आहे. यावर तुम्ही ९०० रुपये डिस्काउंटचा फायदा मिळेल. यूजर्सने या या वॉचला ४.१ स्टार रेटिंग दिले आहे. Mi च्या या स्मार्टवॉचमध्ये Heart Rate आणि spo2 Monitor सारखे हेल्थ फीचर्स मिळतात. तसेच, कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लूटूथचा सपोर्ट दिला आहे.

वाचा – ऑफिसमध्ये ‘इतके’ तास काम करा, अन्यथा कंपनी सोडा, Elon Musk चा कर्मचाऱ्यांना इशारा

​Mobimint Smart Watch D20

mobimint-smart-watch-d20

Mobimint Smart Watch D20 स्मार्टवॉच तब्बल ६८ टक्के डिस्काउंटसह ई-कॉमर्स साइट Amazon वर उपलब्ध आहे. या वॉचची मूळ किंमत १,८९९ रुपये आहे. परंतु, १३०० रुपयांच्या डिस्काउंटनंतर फक्त ५९९ रुपयात खरेदी करू शकता. यूजर्सने या वॉचला ४.३ स्टार रेटिंग दिले आहे. टच स्क्रीनसह येणारी ही वॉच काळ्या रंगात उपलब्ध आहे. यामध्ये Spo२ सेंसर, हार्ट रेट, बीपी, स्लीप मॉनिटर सारखे हेल्थ फीचर्स दिले आहेत.

​Marvik स्मार्टवॉच

marvik-

Marvik स्मार्टवॉचची मूळ किंमत ९९९ रुपये आहे. परंतु, Amazon वरून तुम्ही ५० टक्के डिस्काउंटनंतर फक्त ४९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर ५०० रुपये डिस्काउंटचा फायदा मिळेल. Amazon वर यूजर्सने या वॉचला ३ स्टार रेटिंग दिले आहे. या वॉचमध्ये कॉलिंग, मेसेजचे नॉटिफिकेशन दिसते. तुम्ही सहज ब्लूटूथच्या मदतीने वॉचला स्मार्टफोनशी कनेक्ट करू शकता. या देखील तुम्हाला हार्ट रेट मॉनिटर, कॅलरी काउंटर, स्लीप मॉनिटर सारखे फीचर्स मिळतील.

वाचा: Online Shopping Tips :ऑनलाईन शॉपिंग करतांना खूप खर्च होणार नाही, अशी करा एक्स्ट्रा सेव्हिंग, फॉलो करा ‘या’ टिप्स

​M4 Intelligence ब्लूटूथ स्मार्ट बँड

m4-intelligence-

KT World च्या या स्मार्ट बँडची मूळ किंमत ९९९ रुपये आहे. परंतु, ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर ५० टक्के डिस्काउंटनंतर ४९९ रुपयात उपलब्ध आहे. म्हणजेच यावर ५०० रुपये डिस्काउंट मिळेल. यूजर्सने या स्मार्ट बँडला ४ स्टार्स रेटिंग दिले आहे. स्मार्ट बँडवर तुम्हाला Facebook, WhatsApp, LinkedIn, Instagram, आणि Twitter चे नॉटिफिकेशन मिळेल. यात कॅलरी काउंट, स्टेप ट्रॅक सारखे फीचर्स दिले आहेत. स्मार्ट बँडला तुम्ही ब्लूटूथच्या मदतीने सहज फोनशी कनेक्ट करू शकता.

​Melbon M6 स्मार्ट बँड

melbon-m6-

Melbon M6 स्मार्ट बँडला देखील तुम्ही १ हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. या वॉचची मूळ किंमत १,९९९ रुपये आहे. परंतु, तुम्ही तब्बल १४०० रुपयांच्या डिस्काउंटनंतर फक्त ५९९ रुपयात खरेदी करू शकता. यामध्ये स्टेप काउंटर, मल्टी-स्पोर्ट मोड्स, नॉटिफिकेशन सपोर्ट सारखे फीचर्स दिले आहेत. स्टँडबाय मोडवर स्मार्ट बँडची बॅटरी ३ दिवस टिकते. यात वेगवेगळे हेल्थ फीचर्स देखील दिले आहेत. तुम्ही ब्लूटूथच्या मदतीने बँडला फोनशी कनेक्ट करू शकता.

वाचा: Netflix ने बॅन केले १० लाखांपेक्षा अधिक अकाउंट, आता ‘या’ युजर्सना OTT कन्टेन्ट पाहता येणार नाही, जाणून घ्या कारण

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here