One Plus Nord 2T

OnePlus Nord 2T: One Plus जूनमध्ये आपला नवीन स्मार्टफोन लाँच करेल अशी अपेक्षा आहे आणि तो OnePlus Nord 2T असेल. त्याची सुरुवातीची किंमत अंदाजे ३५,००० रुपये असण्याची शक्यता आहे. स्मार्टफोन MediaTek Dimensity 1300 प्रोसेसरद्वारे समर्थित असण्याची अपेक्षा आहे आणि १२ GB पर्यंत RAM ऑफर केली जाईल. स्मार्टफोनमध्ये १२८ GB/ २५६ GB स्टोरेज असेल. कॅमेरा सेटअपमध्ये मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप (५० MP + ८ MP + २ MP) समाविष्ट आहे. सेल्फी कॅमेरा ३२ MP शूटर असेल.
वाचा : Aadhar Card वापरतांना UIDAI ने सांगितलेल्या ‘या’ सिक्योरिटी टिप्स फॉलो केल्यास तुम्ही राहाल सेफ
Oppo Reno 8 Series

Oppo Reno 8: Oppo Reno 8 आणि Oppo Reno 8 Pro जूनमध्ये भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. Reno 8 मालिकेत १२ GB RAM आणि २५६ GB स्टोरेज असेल. Reno 8 MediaTek Dimensity 1300 SoC द्वारे समर्थित असेल तर Reno 8 Pro Qualcomm Snapdragon 7 Gen 1 SoC ऑफर करेल. दोन्ही स्मार्टफोन्सच्या मागील बाजूस ५० MP ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. दोन्ही उपकरणांवर फ्रंट कॅमेरा ३२ MP असेल Oppo Reno 8 मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी १३०० प्रोसेसर दिला आहे.
Poco F4 GT

Poco F4 GT: Poco F4 GT जून २०२२ मध्ये भारतात सादर केला जाईल आणि स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरद्वारे समर्थित असेल. प्रीमियम डिव्हाइसमध्ये 12 GB पर्यंत RAM आणि २५६ GB स्टोरेज असेल. मागील कॅमेरा ६४ MP ट्रिपल कॅमेरा सेटअप, ६.६७ -इंचाचा AMOLED डिस्प्ले, ४७०० mAh बॅटरी आणि १२० W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. स्मार्टफोनची किंमत सुमारे ४०,००० रुपये असण्याची शक्यता आहे. Poco चे स्मार्टफोन्स जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही Poco F4 GT ची वाट पाहू शकता.
Xiaomi 12X

Xiaomi 12X जो स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसरद्वारे Saported आहे आणि ४५०० mAh बॅटरीसह ५.२८ -इंच 120Hz डिस्प्ले पॅक करतो. स्मार्टफोन १२ GB पर्यंत रॅम देते तर स्टोरेज २५६ GB आहे. कॅमेर्यांच्या बाबतीत, डिव्हाइस ५० MP ट्रिपल कॅमेरा सेटअप देईल तर सेल्फी कॅमेरा ३२ MP चा आहे.
Vivo T2 : Vivo T2 जून 2022 मध्ये लाँच होईल असे सांगण्यात येत आहे आणि Vivo T1 चा उत्तराधिकारी असेल. Vivo ने मे महिन्यात आणखी दोन स्मार्टफोन Vivo T1 Pro आणि Vivo T1 44W सादर केले आहेत.
वाचा : ऑफिसमध्ये ‘इतके’ तास काम करा, अन्यथा कंपनी सोडा, Elon Musk चा कर्मचाऱ्यांना इशारा
Realme GT Neo 3T

Realme GT Neo 3T: Realme GT Neo 3T जून २०२२ मध्ये लाँच होईल अशी अपेक्षा आहे. फोनमध्ये १२० Hz रिफ्रेश रेटसह ६.६२ -इंच FHD AMOLED डिस्प्लेची अपेक्षा करू शकतो. स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट आणि १२ GB RAM आणि २५६ GB स्टोरेज असण्याची अपेक्षा आहे. स्मार्टफोन ५००० mAh बॅटरी पॅक करेल आणि ८० W जलद चार्जिंग ऑफर करेल. कॅमेर्यांच्या बाबतीत, डिव्हाइस ६४ MP ट्रिपल कॅमेरा सेटअप देईल तर सेल्फी कॅमेरा १६ MP चा आहे. बेस व्हेरिएंटसाठी स्मार्टफोनची किंमत ३५,००० रुपये असण्याची शक्यता आहे.
वाचा : तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत ? मिनिटांत करा माहित, फॉलो करा ‘ही’ प्रोसेस
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times