OnePlus Nord CE 2 Lite

OnePlus Nord CE 2 Lite स्मार्टफोनमध्ये ६.५९ इंच IPS LCD डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन ६९५ ५जी चिपसेटचा सपोर्ट मिळतो. फोन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह येतो. यात फोटोग्राफीसाठी रियरला ६४ मेगापिक्सल प्रायमरी सेंसरसह २ मेगापिक्सलचे दोन कॅमेरा आणि फ्रंटला सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. पॉवर बॅकअपसाठी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळते. या फोनची सुरुवाती किंमत फक्त १९,९९९ रुपये आहे.
Redmi Note 11 Pro

Redmi Note 11 Pro स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंच FHD+ डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. यात फोटोग्राफीसाठी रियरला १०८ मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, ८ मेगापिक्सल अल्ट्रावाइड कॅमेरा आणि २ मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा दिला आहे. तर फ्रंटला १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी९६ चिपसेट सपोर्टसह ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज दिले आहे. ५००० एमएएच दमदार बॅटरीसह येणाऱ्या या फोनची किंमत १८,९९९ रुपये आहे.
Poco X4 Pro

Poco X4 Pro स्मार्टफोनला तुम्ही १७,९९९ रुपयात खरेदी करू शकता. या फोनमध्ये ६.६७ इंच FHD+ डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६९५ चिपसेट सपोर्टसह ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळते. फोटोग्राफीसाठी ६४ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सल अल्ट्रावाइड कॅमेरा, २ मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा आणि फ्रंटला १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. पॉवर बॅकअपसाठी ६७ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे.
वाचा: Aadhar Card वापरतांना UIDAI ने सांगितलेल्या ‘या’ सिक्योरिटी टिप्स फॉलो केल्यास तुम्ही राहाल सेफ
Realme 9 5G Speed Edition

Realme 9 5G Speed Edition स्मार्टफोनमध्ये ६.६० इंच FHD+ IPS LCD डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १४४ हर्ट्ज आहे. यात रियरला ४८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेऱ्यासह २ मेगापिक्सलचे दोन कॅमेरे दिले आहेत. तर सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. यात स्नॅपड्रॅगन ७७८जी चिपसेटसह ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज दिले आहे. तसेच, ३० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळते. हा फोन १९,९९९ रुपयात उपलब्ध आहे.
Motorola G71 5G

Motorola G71 5G स्मार्टफोनमध्ये ६.४ इंच एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. यात स्नॅपड्रॅगन ६९५ ५जी चिपसेटसह ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज दिले आहे. फोटोग्राफीसाठी रियरला ५० मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, ८ मेगापिक्सल अल्ट्रावाइड कॅमेरा, २ मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा दिला आहे. तर फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. ५००० एमएएच दमदार बॅटरीसह येणाऱ्या या फोनला तुम्ही फक्त १७,९९९ रुपयात खरेदी करू शकता.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times