iPhone SE 2 मधून U1 गायब
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आयफोन लाइनअपचा भाग बनलेल्या U1 अल्ट्रा वाइडबँड चिपच्या नावाने अॅपलच्या वेबसाइटवर दिसत असलेलला iPhone SE 2 ची खास वैशिष्ट्ये दिसत आहेत. सेल्युलर अँड वायरलेस कनेक्शन सेक्शन मध्ये U1 चिपचे नाव देण्यात आले नाही. खरं म्हणजे, U1 चिप लोकलाइज्ड जीपीएसप्रमाणे काम करते. म्हणजे एकदम लोकेशन ट्रॅकिंगला मदत करण्याचे काम करते. यासाठी खूप कमी बॅटरी खर्च होते. तसेच यासाठी सेल टॉवर्स आणि सॅटेलाइटच्या बाऊन्सची गरज सुद्धा लागत नाही.
शॉर्ट रेंज रेडिओ टेक्नोलॉजी
अॅपल स्वतः याला लिव्हिंग रूमच्या स्केलवर जीपीएस म्हणते. या टेक्नोलॉजीला AirDrop चे नवीन व्हर्जन यासारखे काही सॉफ्टवेअर फीचर्स सुद्धा इंटीग्रेट केले जावू शकते. याच्या मदतीने iPhone 11 च्या कोणत्याही फाईल पाठवण्यासाठी केवळ डिव्हाईस त्याच्याकडे पॉइंट करावे लागते. तसेच याशिवाय U1 चिप अॅपलच्या नवीन टाइल यासारखे AirTags गॅझेटचे काम करण्यासही मदत मिळू शकते. याला कंपनीने यावर्षीच्या अखेर पर्यंत लाँच करण्याचे ठरवले आहे. याच्या मदतीने शॉर्ट रेंजमध्ये चांगली रेडियो टेक्नोलॉजी पाहायला मिळते.
iPhone 11 सारखे फीचर्स
नवीन iPhone SE 2 मध्ये U1 चिप संदर्भातील काही फीचर्स आणि गॅझेटलना सपोर्ट करू शकणार नसतील. परंतु, या फोनमधील बाकी सर्व फीचर्स iPhone 11 यासारखीच आहेत. यात अॅपल कंपनीने कोणतीही कसर ठेवली नाही. iPhone 11 लाइनप्रमाणे Wi-Fi 6, Bluwtooth 5.0, NFC आणि एक्सप्रेस कार्ड सपोर्ट दिला आहे. अॅपलने नवीन आयफोनमध्ये iPhone 11 लाइनमध्ये मिळणाऱ्या अॅपल A13 बायोनिक चिप देण्यात आला आहे. कंपनीचा हा लेटेस्ट आणि सर्वात पॉवरफुल प्रोसेसर आहे. ऑथेंटिकेशनसाठी या आयफोनमध्ये फेसआयडीच्या जागी टचआयडी देण्यात आला आहे.
iPhone SE 2 चा कॅमेरा
अॅपलने या नवीन iPhone SE 2 मध्ये ४.७ इंचाचा रेटिना एचडी डिस्प्ले दिला आहे. त्याच्यासोबत एचडीआर १० प्लेबॅक आणि डॉल्बी व्हिजनचा सपोर्ट मिळणार आहे. तसेच यात टच आयडी दिली आहे. iPhone SE 2 मध्ये ए१ बायोनिक प्रोसेसर आहे. यात सिंगल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. जो १२ मेगापिक्सलचा आहे. आणि याचा अपर्चर एफ/१.८ आहे. त्यामुळे युजर्स ४ के व्हिडिओग्राफी करू शकतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये ७ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
या रंगात फोन मिळणार
कॅमेऱ्यासोबत एचडीआर आणि पोर्ट्रेट यासारखे फीचर्स मिळणार आहेत. हा फोन वॉटर आणि डस्टप्रूफ आहे. यासाठी नवीन आयफोनला आयपी ६७ रेटिंग मिळाली आहे. हा आयफोनम ब्लॅक, व्हाईट आणि रेड या तीन रंगात उपलब्ध होणार आहे. कंपनीने यात दमदार बॅटरी दिली आहे. फोनची बॉडी ग्लास आणि एयरोस्पेस ग्रेड अॅल्युमिनियमने बनलेली आहे. फोनमध्ये वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट आहे. हा आयफोन केवळ ३० मिनिटात ५० टक्के चार्ज होतो. त्यासाठी वेगळा १८ वॅटचा चार्जर खरेदी करावा लागेल.
फोनची किंमत
अॅपल कंपनीचा बहुचर्चित iPhone SE 2 या फोनमध्ये ड्युअल सिम कार्डचा समोर्ट मिळणार आहे. ज्यात एक सिम ई-सिम असणार आहे. iPhone SE 2 ६४ जीबी, १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज या तीन पर्यायात उपलब्ध करण्यात आला आहे. या फोनची सुरुवातीची किंमत ४२ हजार ५०० रुपये आहे. म्हणजेच ६४ जीबी स्टोरेजचा फोन खरेदी करावा लागणार आहे. आयफोन एसई२ ची डिझाईन आयफोन ८ सारखीच आहे. फोनची लाँचिंग झाली असली तरी या फोनची विक्री कधीपासून सुरू करण्यात येणार आहे, याबाबत कंपनीने अधिकृत कोणतीही माहिती दिली नाही.
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times