Noise ColorFit Pulse Spo2

Noise ColorFit Pulse Spo2 स्मार्टवॉच ई-कॉमर्स साइट Amazon वर तब्बल ६० टक्के डिस्काउंटसह उपलब्ध आहे. डिस्काउंटनंतर या वॉचला तुम्ही फक्त १,९९९ रुपयात खरेदी करू शकता. सिंगल चार्जमध्ये याची बॅटरी १० दिवस टिकते. यामध्ये १.४ इंच फुल टच एचडी डिस्प्ले दिला आहे. तसेच, ६० पेक्षा अधिक वॉच फेसचा सपोर्ट मिळतो. वॉचला आयपी६८ वॉटरप्रुफ रेटिंग देखील मिळाले आहे. यामध्ये २४x७ हार्ट रेट मॉनिटर, स्लिप मॉनिटरिंग सारखे फीचर्स दिले आहेत.
Samsung Galaxy Watch 4

Samsung Galaxy Watch 4 ला तुम्ही ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वरून तबब्ल ४९ टक्के डिस्काउंटसह खरेदी करू शकता. या स्मार्टवॉचची मूळ किंमत २९,९९९ रुपये आहे. परंतु, डिस्काउंटनंतर तुम्ही फक्त १५,३८७ रुपयात खरेदी करू शकता. या स्मार्टवॉचला तुम्ही अँड्राइड फोनशी कनेक्ट करू शकता. यामध्ये ऑप्टिकल हार्ट रेट सेंसर, बॉडी कंपोजिशन अॅनालिसिस, हेल्थ मॉनिटरिंग आणि ९० पेक्षा अधिक वर्कआउट मोड दिले आहेत.
वाचा: Smartphone Heating: गर्मीमुळे स्मार्टफोन सतत गरम होत असेल तर, लगेच करा हे काम, पाहा टिप्स
Amazfit GTR 2e Smart Watch

Amazfit ची GTR 2e Smart Watch देखील खूपच लोकप्रिय आहे. या वॉचची मूळ किंमत १४,९९९ रुपये आहे. परंतु, ई-कॉमर्स साइट Amazon वरून ४८ टक्के डिस्काउंटनंतर तुम्ही फक्त ७,७९९ रुपयात खरेद करू शकता. यामध्ये १.३९ ऑलवेज ऑन एमोलेड डिस्प्ले दिला आहे. स्मार्टवॉच कर्व्ड डिझाइनसह येते. यात बिल्ट-इन अॅलेक्सा, बिल्ट-इन जीपीएस सपोर्टसह येते. याची बॅटरी २४ दिवस टिकते. यात ९० पेक्षा अधिक स्पोर्ट्स मोड आणि ५० पेक्षा अधिक वॉच फेस दिले आहे. तसेच, वेगवेगळे हेल्थ फीचर्स देखील मिळतात.
Titan Smart Pro Smartwatch

Titan Smart Pro Smartwatch ला देखील तुम्ही बंपर डिस्काउंटसह Amazon वरून खरेदी करू शकता. २० टक्के डिस्काउंटनंतर फक्त ११,९९५ रुपयात ही वॉच उपलब्ध आहे. या शानदार स्मार्टवॉचमध्ये एमोलेड डिस्प्ले दिला आहे. याशिवाय, जीपीएसचा देखील सपोर्ट मिळतो. यात तापमान, स्ट्रेस, स्लिप मॉनिटर, मल्टीस्पोर्ट ट्रॅकर, SpO2 सारखे हेल्थ फीचर्स दिले आहेत. एकदा चार्ज केल्यावर Titan Smart Pro Smartwatch ला तुम्ही १४ दिवस वापरू शकता.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times