भारतीय बाजारात अगदी ५ हजार रुपयांपासून ते १ लाख रुपयांच्या बजेटमध्ये येणारे शानदार फोन्स उपलब्ध आहे. अनेकजण दरमहिन्याला फोन बदलत असतात. त्यामुळे दर आठवड्याला कंपन्या देखील नवनवीन स्मार्टफोन्स बाजारात सादर करतात. सध्या स्मार्टफोन हा अत्यंत महत्त्वाचे डिव्हाइस झाला आहे. अनेक कामे स्मार्टफोनच्या मदतीने सहज करता येतात. त्यामुळे स्मार्टफोन असणे गरजेचे झाले आहे. तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल व तुमचे बजेट कमी असल्यास काळजी करण्याचे कारण नाही. बाजारात अगदी ५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणारे एकापेक्षा एक शानदार फोन उपलब्ध आहेत. या किंमतीत तुम्ही JioPhone Next, Lava Z1s, Samsung Galaxy M01 Core सारखे फोन्स खरेदी करू शकता. या फोन्सच्या मदतीने तुम्हीकॉल, मेसेज अशी नियमित कामे सहज करू शकता. फीचर फोनमधून स्मार्टफोनमध्ये अपग्रेड करणाऱ्या यूजर्ससाठी हे फोन्स चांगला पर्याय ठरतील.

​Reliance JioPhone Next

reliance-jiophone-next

JioPhone Next हा प्रगती ओएसवर काम करतो. यात ५.४५ इंच एचडी+ डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ७२०x१४४० पिक्ल आहे. यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ प्रोटेक्शन दिले आहे. यात अँटी-फिंगरप्रिंट कोटिंग देखील दिले आहे. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. तर सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. यात २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज दिले आहे. पॉवर बॅकअपसाठी ३५०० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोनची किंमत ६,४९९ रुपये आहे. परंतु, १,९९९ रुपये आणि ५०१ रुपये प्रोसेसिंग फी देऊन फोनला ईएमआयवर खरेदी करू शकता.

वाचा:TV Offers : स्मार्टफोनपेक्षा कमी किमतीत खरेदी करा ‘हा’ HD LED TV, खर्च करावे लागतील फक्त ५,९९९ रुपये,पाहा डिटेल्स

​Lava Z1s

lava-z1s

ड्यूल सिम सपोर्टसह येणारा Lava Z1s हा ३जी, ४जी, VoLTE, Wi-Fi कनेक्टिव्हिटीसह येतो. यात ऑक्टा-कोर UNISOC SC९८६३ प्रोसेसर मिळतो. याचा क्लॉक स्पीड १.६ GHz आहे. यात २ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेज मिळते. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढवू शकता. यात पॉवरसाठी ३२०० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोनमध्ये ५ इंच स्क्रीन दिली असून, याचे रिझॉल्यूशन १६००x७२० पिक्सल आहे. यात ५ मेगापिक्सल रियर आणि २ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनची किंमत ४,६९९ रुपये आहे.

वाचा: Prepaid Plans: जिओचा ग्राहकांना मोठा झटका! ‘या’ स्वस्त प्लानच्या किंमतीत केली तब्बल १५० रुपयांनी वाढ

Samsung Galaxy M01 Core

samsung-galaxy-m01-core

Samsung Galaxy M01 Core स्मार्टफोन अँड्राइड गो वर काम करतो. यात ५.४३ इंच एचडी+ टीएफटी डिस्प्ले दिला आहे. यामध्ये क्वाड-कोर मीडियाटेक ६७३९ प्रोसेसर दिला असून, यात २ जीबी आणि ३२ जीबी स्टोरेज मिळते. तर फोटोग्राफीसाठी ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा दिला आहे. पॉवर बॅकअपसाठी ३००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. या फोनची किंमत जवळपास ५ हजार रुपये आहे.

​Redmi Go

redmi-go

शाओमीच्या Redmi Go स्मार्टफोनला देखील तुम्ही ५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. फोनमध्ये १ जीबी रॅम आणि ८ जीबी स्टोरेज दिले आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढवू शकता. यात ५ इंच एचडी डिस्प्ले दिला आहे. तर फोटोग्राफीसाठी रियरला ८ मेगापिक्सल आणि फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी ३००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४२५ प्रोसेसरसह येतो. फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर फक्त २,९९९ सुरुवाती किंमतीत उपलब्ध आहे.

वाचा: Smartphone Offers: तब्बल ३५ हजारांच्या डिस्काउंटसह खरेदी करा Samsung चा ‘हा’ ५जी स्मार्टफोन, मिळतो ३२MP चा सेल्फी कॅमेरा

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here