नवी दिल्लीः स्मार्टफोन कंपनी ऑनर Honor ने चीनमध्ये Honor ३० सीरिज लाँच केली आहे. या सीरिज अंतर्गत कंपनीने Honor 30, आणि Pro+ हे तीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. भारतात हे फोन कधी लाँच करण्यात येतील, याबाबत कंपनीने अद्याप काहीही स्पष्ट केले नाही. परंतु, लवकरच भारतात हे फोन लाँच करण्यात येतील, अशी माहिती मिळत आहे. या सीरिज मध्ये ५जी कनेक्टिविटी आणि ४० वॅट फास्ट चार्जिंग यासारखे फीचर मिळणार आहेत.

वाचाः

किंमत

Honor 30 च्या ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्मार्टफोनची किंमत ३२ हजार रुपये आहे. तर ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ३४ हजार रुपये आहे. तसेच ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत ३७ हजार रुपये आहे.

Honor 30 Pro च्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४३ हजार रुपये, तर ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४७ हजार ६०० रुपये आहे.

Honor 30 Pro+ च्या ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५४ हजार रुपये तर १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत ६० हजार रुपये ठेवण्यात आली आहे. या स्मार्टफोनची विक्री येत्या २१ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे.

वाचाः

खास वैशिष्ट्ये

Honor 30 मध्ये ६.५३ इंचाचा OLED डिस्प्ले दिला आहे. आणि 30 Pro+ मध्ये QHD+ रिझॉल्यूशनसह ६.६७ इंचाचा OLED डिस्प्ले दिला आहे. तसेच या तिन्ही स्मार्टफोनमध्ये ४०००एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. तसेच ४० वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे. Honor 30 मध्ये HiSilicon Kirin 985 प्रोसेसर दिला आहे. तर Honor 30 Pro आणि 30 Pro+ Kirin 990 5G प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी Honor 30 मध्ये क्वॉड रियर कॅमेरा दिला आहे. तसेच सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. Honor 30 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. तर 30 Pro+ मध्ये ५० मेगापिक्सलचा UltraVision MX700 मेन सेन्सर, १६ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलिफोट कॅमेरा दिला आहे.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here