दावा

काही सोशल मीडिया युजर्स एक फोटो शेअर करीत आहे. ज्यात एका हॉस्पिटलच्या आयसीयी सारख्या दिसणाऱ्या खोलीत जमिनीवर पडलेले कर्मचारी दिसत आहेत. या फोटोसोबत कॅप्शन लिहिले की, इटलीत करोना व्हायरसमुळे आता पर्यंत २०० डॉक्टर्स आणि नर्सेसचा मृत्यू झाला आहे.

टाइम्स फॅक्ट चेकच्या एका वाचकाने हा फोटो आमच्या व्हॉट्सअॅप नंबरवर पाठवून खरं काय आहे, यासंबंधी माहिती जाणून घेण्याची विनंती केली.

या कॅप्शनला ज्यावेळी आम्ही फेसबुकवर सर्च केले. त्यावेळी काही लोकांनी हा फोटो जवळपास या कॅप्शनने शेअर केला आहे.

खरं काय आहे?

या फोटोचा इटली किंवा करोना व्हायरसशी काहीही देणेघेणे नाही. हा फोटो एबीसी या हिट ठरलेल्या मेडिकल सीरिज ‘’ मधील एका एपिसोडमधून घेतलेला स्क्रीनग्रॅब आहे.

या फोटोला गुगलवर रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर ‘Grey’s Anatomy’संबंधीचे काही छापून आलेले आर्टिकल मिळतील. ज्यात या फोटोचा वापर करण्यात आला आहे.

या फोटोला TinEye सर्च इंजिनवर रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर आम्हाला
च्या एका पेजची लिंक मिळाली. ज्यात हा फोटो होता.

त्यानंतर आम्ही इटलीत करोना व्हायरसमुळे डॉक्टर आणि नर्सेस यांच्या मृत्युमुखींची आकडेवारी शोधली. आम्हाला
चा ९ एप्रिल रोजी छापून आलेले एक वृत्त मिळाले. या वृत्तानुसार, इटलीत आता पर्यंत करोना व्हायरसमुळे १०० ते १०१ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. या वृत्तात इतालवी मीडिायच्या हवाल्याने हेही सांगितले की, करोना व्हायरसमुळे जवळपास ३० नर्सेस आणि अन्य मेडिकल स्टाफचे निधन झाले आहे. म्हणजेच आता पर्यंत २०० पेक्षा कमी आहे.

निष्कर्ष

इटलीत करोना व्हायरसमुळे डॉक्टर आणि नर्सेस यांचा मृत्यू झाला आहे, असे सांगून जो फोटो सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. तो फोटो ‘Grey’s Anatomy’ या टीव्ही सीरिजमधील आहे. या फोटोचा करोना व्हायरसशी काहीही संबंध नाही, असे ‘मटा फॅक्ट चेक’च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here