Redmi 9 Activ

Redmi 9 Activ स्मार्टफोनची किंमत ९,४९९ रुपये आहे. Amazon वरून खरेदी करताना फोनवर ५०० रुपये डिस्काउंट कूपन मिळेल. याशिवाय, ९ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील आहे. हँडसेटला नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करू शकता. फोनमध्ये ऑक्टा-कोर हीलियो जी३५ प्रोसेसर, रियरला १३ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल कॅमेरा आणि फ्रंटला ५ मेगापिक्सल कॅमेरा मिळतो. यात ६.५३ इंच एचडी+ डिस्प्ले आणि ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे.
वाचा: Aadhaar Card: आधार कार्डवरील फोटो आवडला नाही? या सोप्या प्रोसेसने सहज करा बदल
realme narzo 50i

realme narzo 50i स्मार्टफोन Amazon वर ८,९९९ रुपयात उपलब्ध आहे. यावर ८,५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. फोनला नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करू शकता. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवू शकता. याशिवाय, ६.५ इंच एचडी+ डिस्प्ले मिळतो. फोटोग्राफीसाठी ८ मेगापिक्सल प्रायमरी आणि ५ मेगापिक्सल फ्रंट सेंसर दिला आहे. पॉवरसाठी ५००० एमएएचची बॅटरी मिळते.
Tecno Pop 5 LTE

Tecno Pop 5 LTE स्मार्टफोनला तुम्ही फक्त ६,५९९ रुपयात खरेदी करू शकता. फोनला नो-कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करता येईल. यावर ६,२५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. HSBC कॅशबॅक कार्डने पेमेंट केल्यास ५ टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. टेक्नोच्या या फोनमध्ये ६.५२ इंच डॉट नॉच एचडी+ डिस्प्ले दिला आहे. तर पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. यात फोटोग्राफीसाठी ८ मेगापिक्सलचा ड्यूल रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे.
Lava X2

Lava च्या या स्मार्टफोनची किंमत ६,९९९ रुपये आहे. यावर तुम्हाला ६,६०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. हँडसेटला तुम्ही नो-कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. फीचर्सबद्दल सांगायचे तर यात ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो ए२५ प्रोसेस दिला आहे. तर पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. फोनमध्ये ६.५ इंच एचडी+ आयपीएस नॉच डिस्प्ले दिला आहे. फोटोग्राफीसाठी रियरला ८ मेगापिक्सल ऑटोफोक्स ड्यूल एआय रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा मिळतो.
Redmi 10A

Redmi 10A स्मार्टफोनला तुम्ही फक्त ८,४९९ रुपयात खरेदी करू शकता. फोनवर ८,०५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. फोनला नो-कॉस्ट ईएमआय आणि HSBC कॅशबॅक कार्डसह ५ टक्के इंस्टंट डिस्काउंटसोबत खरेदी करू शकता. रेडमीच्या या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी १३ मेगापिक्सलचा रियर आणि सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात ६.५३ इंच एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले, मीडियाटेक हीलियो जी२५ ऑक्टा-कोर प्रोसेसर, ५००० एमएएचची बॅटरी, ३ जीबी रॅम + ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे.
वाचा: Xiaomi: शाओमी-रेडमीचे स्मार्टफोन वापरता? तुम्हाला ३ महिन्यांसाठी मोफत मिळेल ‘ही’ खास सर्विस
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times