RedmiBook Pro

शाओमी लेवल अप सेलचे सर्वात मोठे डिस्काउंट रेडमी बुक प्रो लॅपटॉपवर मिळत आहे. ज्यात 11th जनरेशन इंटेल कोर i5 प्रोसेसर, 8GB रॅम आणि स्टोरेजसाठी 512GB SSD आहे. लॅपटॉपची किंमत ५९ हजार ९९९ रुपये आहे परंतु, भारतात याला ४९ हजार ९९९ रुपयात विकले जात आहे. सेलमध्ये लॅपटॉप ७ हजार रुपयाच्या सूट सोबत उपलब्ध आहे. याची किंमत ४२ हजार ९९९ रुपये आहे. एचडीएफसी बँक कार्ड माध्यमातून ४ हजार रुपयाची अतिरिक्त सूट दिली आहे. या सेलमध्ये याची किंमत ३८ हजार ९९९ रुपये आहे. यूजर्संना या सेलमध्ये ९ महिन्याचा नो कॉस्ट ईएमआय ऑप्शन सुद्धा मिळणार आहे. ९ महिन्यासाठी प्रति महिना ४ हजार ३३३ रुपये आहे. म्हणजेच या लॅपटॉपला ११ हजार रुपयांपर्यंत कमी किंमतीत खरेदीची संधी आहे.
वाचा: iPhone 12 वर आतापर्यंतची सर्वात धमाकेदार ऑफर ! नवीन स्वस्त किंमत पाहून तुम्हीही म्हणाल एकच नंबर
RedmiBook 15

स्टँडर्ड रेडमीबुक १५ च्या 256GB आणि 512GB SSD स्टोरेज व्हेरियंटसाठी या सेलमध्ये ६ हजार रुपयाची सूट मिळते. लॅपटॉप मध्ये 11th जनरेशनचे इंटेल कोर i3 प्रोसेसर, आणि 8GB स्टोरेज उपलब्ध आहे. 256GB साठी ३२ हजार ९९९ रुपये आणि 512GB स्टोरेजच्या लॅपटॉपसाठी ३५ हजार ९९९ रुपये मोजावे लागतील. एचडीएफसी बँक कार्ड धारकांना दोन्ही व्हेरियंटवर ३५०० रुपयाची अतिरिक्त सूट मिळू शकते. ज्यात याची किंमत २९ हजार ४९९ रुपये आणि ३२ हजार ४९९ रुपये होते. दोन्ही लॅपटॉपला ९ महिन्याच्या कॉस्ट ईएमआय वर खरेदी करू शकता.
Mi Notebook Pro

शाओमी लेवल अप सेल मध्ये मी नोटबुक प्रोचे दोन व्हेरियंट आणि एमआय नोटबुक अल्ट्राचे दोन व्हेरियंटवर डिस्काउंट मिळत आहे. या व्हेरियंट्स मध्ये 11th जनरेशन इंटेल कोर i5-पॉवर्ड Mi नोटबुक प्रो चा समावेश आहे. ज्यात 8GB आणि 16GB रॅम वेरिएंट आहे. दोन्ही 512GB SSD आधारित स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे. Mi नोटबुक प्रो च्या 8GB व्हेरियंटवर १ हजार रुपयाची सूट मिळते. याची किंमत ५५ हजार ९९९ रुपये आहे. तर लॅपटॉपच्या 16GB व्हेरियंटवर ३ हजार ५०० रुपयाची सूट मिळते. याची किंमत ५७ हजार ९९९ रुपये आहे. दोन्ही व्हेरियंटमध्ये एचडीएफसी बँक कार्ड माध्यमातून ४ हजार रुपयाची सूट मिळते. याची किंमत अनुक्रमे ५१ हजार ९९९ रुपये आणि ५३ हजार ९९९ रुपये आहे. या दोन्ही लॅपटॉपवर ९ महिन्याची नो कॉस्ट ईएमआय ऑफर सुद्धा दिली जाते.
Mi Notebook Ultra

मी नोटबुक अल्ट्रा 8GB किंवा 16GB रॅम आणि 512GB एसएसडी स्टोरेज सोबत 11th जनरेशन इंटेल कोर i5 प्रोसेसर सोबत येतो. 8GB रॅम व्हेरियंटसाठी २ हजार रुपये आणि 16GB रॅम व्हेरियंटसाठी ५५०० रुपयाची सूट मिळते. इंटेल कोर १७ पॉवर्ड एमआय नोटबुक अल्ट्रा वर सूट मिळत नाही. परंतु. यावर एचडीएफसी बँकेच्या कार्ड आधारित ऑफर लागू होतात. अल्ट्राची किंमत 8GB व्हेरियंटसाठी ५७ हजार ९९९ रुपये आणि 16GB रॅम व्हेरियंटसाठी ५९ हजार ९९९ रुपये आहे. एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून ४ हजार रुपयाची अतिरिक्त सूट यूजर्संना मिळते. मी नोटबुक अल्ट्रा ५३ हजार ९९९ रुपये आणि ५५ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times