Jio चा १,५९९ रुपयांचा प्लान

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे १,५५९ रुपये किंमतीचा शानदार प्लान उपलब्ध आहे. या प्लानची वैधता ३३६ दिवस आहे. प्लानमध्ये तुम्हाला एकूण २४ जीबी डेटा दिला जातो. हा डेटा समाप्त झाल्यानंतर तुम्ही ६४ Kbps च्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. यात एकूण ३६०० एसएमएस दिले जातात. याशिवाय, JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारख्या जिओ अॅप्सचा मोफत अॅक्सेस मिळतो.
Jio चा २,८७९ रुपयांचा प्लान

जिओकडे वर्षभराच्या वैधतेसह येणारा २,८७९ रुपयांचा प्लान देखील आहे. या प्लानमध्ये ३६५ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा याप्रमाणे एकूण ७३० जीबी डेटा दिला जातो. डेली हाय-स्पीड डेटा समाप्त झाल्यानंतर तुम्ही ६४ केबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता. प्लानमध्ये देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा दिला जाते. तसेच, JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारख्या जिओ अॅप्सचा मोफत अॅक्सेस मिळेल.
Airtel चा १,७९९ रुपयांचा प्लान

टेलिकॉम कंपनी Airtel कडे १,७९९ रुपयांचा प्लान आहे. प्लानमध्ये १ वर्ष म्हणजेच ३६५ दिवसांची वैधता मिळते. प्लानमध्ये वर्षभरासाठी एकूण २४ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. प्लानमध्ये तुम्हाला एकूण ३६०० एसएमएस दिले जातात. या प्रीपेड प्लानमध्ये तुम्हाला Apollo २४x७ Circle, १०० रुपये Fastag वर डिस्काउंट, फ्री Hellotune आणिWynk Music चा फ्री अॅक्सेस मिळेल.
Airtel चा २,९९९ रुपयांचा प्लान

Airtel कडे २,९९९ रुपये किंमतीचा प्रीपेड प्लान उपलब्ध आहे. यामध्ये १ वर्ष म्हणजेच ३६५ दिवसांची वैधता दिली जाते. प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा याप्रमाणे एकूण ७३० जीबी डेटा मिळतो. तसेच, दररोज १०० एसएमएस आणि सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगचा फायदा मिळेल. प्लानमध्ये अतिरिक्त बेनिफिट्स देखील दिले आहेत. यात तुम्हाला Apollo २४x७ Circle, १०० रुपये Fastag वर डिस्काउंट, फ्री Hellotune आणिWynk Music चा फ्री अॅक्सेस मिळतो.
Vi चा १,७९९ रुपयांचा प्लान

टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडियाकडे देखील २ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारा शानदार प्लान आहे. कंपनीच्या १,७९९ रुपयांच्या प्लानची वैधता १ वर्ष आहे. ३६५ दिवसांच्या या प्लानमध्ये तुम्हाला एकूण २४ जीबी डेटा मिळेल. याशिवाय, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि एकूण ३६०० एसएमएस दिले जातात. या प्रीपेड प्लानमध्ये अतिरिक्त बेनिफिट्सचा देखील फायदा मिळतो. यात तुम्हाला Vi™ movies and TV चा मोफत अॅक्सेस दिला जातो.
वाचा: UMANG App: ‘या’ एका अॅपने घरबसल्या मिळेल १०० सरकारी सुविधांचा फायदा; फोनमध्ये लगेच करा डाउनलोड
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times